Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

ती

आ — आर्णव, Sun, 03/07/2021 - 03:04
हिरवी गर्द वनराई, भोवताली पर्वत रांगा ते भिरभिरणारे पक्षी, ती संथ प्रवाही गंगा डोळे भरून पाहताना, ते स्मरणी साठवताना मज ती अचानक दिसली, विवस्त्र स्नान करताना भोळी आदिवासी अबला, स्वच्छंद तिच्या जल क्रिडा ना भोवतालची जाण, संकोच, भीती ना पीडा सौंदर्य मिसळले होते, सृष्टी ने तिच्या यौवनात कोलाहल होता उठला, माझ्या अस्थिर मनात क्षण मोहाचा सामोरी, क्षण नाजूक परी अघोरी क्षण लपवणे ही चोरी, क्षणात पाटी कोरी क्षणभर गढूळ झालो मी, ती क्षणाचीच कसोटी क्षणी भानावर ज्या आलो,तो क्षण किमती कोटी कोटी त्या दिवशी पर्वत, वारा, व्योम, सूर्य अन पाणी हे सर्व तिला पाहून, विरक्त राहीले होते मग मी ही विलीन झालो, त्या पंचमहाभुतात निसर्ग होऊन तिला मी, अनासक्त पाहिले होते

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1551 views

💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी Sun, 03/07/2021 - 13:30 नवीन
क्षण मोहाचे विचलित करिती मजला झुगारुन दे सर्व संस्कार मिळालेले तुजला क्षणभर भान हरपले माझे पाहुनी भीत्तीचित्राला कळले मज नसे मर्यादा कलाकार आणी कल्पनेला सुंदर कल्पना, सुरेख विचार
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 03/07/2021 - 13:32 नवीन
क्षण मोहाचे विचलित करिती मजला झुगारुन दे सर्व संस्कार मिळालेले तुजला क्षणभर भान हरपले माझे पाहुनी भीत्तीचित्राला कळले मज नसे मर्यादा कलाकार आणी कल्पनेला सुंदर कल्पना, सुरेख विचार
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा