Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

डेस्टिनेशन ∞

अ — अनन्त्_यात्री, Sat, 03/06/2021 - 11:16
अनंताच्या यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे चांदणचुर्‍याचे भूकलाडू हिमनगांचे तहानलाडू (तहानभूक हरपू दे पण) रसद टकाटक तयार आहे प्रकाशवर्षी मोजपट्टी डार्कमॅटरचा भव्य फळा धूमकेतूचा खडूतुकडा होल्डाॅलमध्ये भरला आहे दिशा कोन ढळून जातील घड्याळ काटे उलटे फिरतील उद्याच्या बातम्या काल कळतील याची तयारी ठेवली आहे मुक्कामाला पोचलो तर दृृृष्ट तिथे काढतील माझी त्यासाठी मी कृृृष्णविवरछाप काजळडब्बी घेतली आहे आता फक्त यान कुठचे इंधन साठवायला कॅन कुठचे उकडले तर फॅन कुठचे ह्या प्रश्नांशी लढतो आहे अनंताच्या यात्रेसाठी फक्त निघायचं बाकी आहे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3736 views

💬 प्रतिसाद
स
सरीवर सरी गुरुवार, 03/11/2021 - 08:09 नवीन
हिमनगांचे तहानलाडू (तहानभूक हरपू दे पण).. छानच!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 08:50 नवीन
आवडले .... (राजकीय दृष्टीने, 2-3 मे पर्यंत थांबूया...)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/11/2021 - 08:58 नवीन
भारी !
प्रकाशवर्षी मोजपट्टी डार्कमॅटरचा भव्य फळा धूमकेतूचा खडूतुकडा कृृृष्णविवरछाप काजळडब्बी
उल्लेखनीय हे !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 03/11/2021 - 12:19 नवीन
आता फक्त यान कुठचे इंधन साठवायला कॅन कुठचे उकडले तर फॅन कुठचे ह्या प्रश्नांशी लढतो आहे
सोप्या प्रश्र्णाचे उत्तर अवघड करुन का शोधत आहात? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 03/13/2021 - 09:46 नवीन
पसंत पडलेल्या सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा