Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तोरण मरणाचे

ग — गणेशा, Sun, 02/21/2021 - 15:25
नोट :मूर्ख या कर्नलतपस्वी यांच्या कवितेला रिप्लाय देताना हि कविता लिहिली गेली.. या कवितेचे श्रेय त्यांना आणि त्या मुळ कवितेलाच.. --- . आयुष्याच्या क्षितिजापाशी भावनांचा उडतो कल्लोळ.. मागे जीवनाचे सैल धागेदोरे अन पुढे असते तोरण मरणाचे पक्षी उडून जातात घरट्यात अन स्तब्धता उरते मागे... हसत दिवस जातो खोटाच अन मग रात्र सावरण्यास येते.. प्रकाश शोधण्या जीवन संपते अन क्षितिजावरती कळते शेवटी अंधार असतो खरा सोबती तोच सुरुवात..अन तोच शेवट.. - शब्दमेघ, मुक्त..स्वैर..स्वछंदी..जीवन २१-०२-२०२१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4321 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Mon, 02/22/2021 - 04:50 नवीन
लिहित रहा, वाचत आहेच.
  • Log in or register to post comments
स
सरीवर सरी Mon, 02/22/2021 - 05:21 नवीन
हसत दिवस जातो खोटाच अन मग रात्र सावरण्यास येते.. लिहीत रहा...वाचत आहे.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 02/22/2021 - 06:51 नवीन
काय चाललंय काय आज.. दिवस भारी दिसतोय. :-) नुकतीच दुसर्‍या धाग्यावर दिलेला प्रतिसाद इथेही लागू पडतोय म्हणून वाटलं, इतकंच. http://www.misalpav.com/comment/1095950#comment-1095950
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 02/22/2021 - 07:24 नवीन
कविता आवडली.. . छान लिहिलीये.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 02/22/2021 - 10:16 नवीन
कडक! (गणेशा, तुमची लेखणी लिहिती राहावी, अशी विनंती)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/22/2021 - 16:19 नवीन
सर्वांचे मनपूर्वक आभार.. तुमच्या अश्या प्रेमामुळेच कधी तरी लिहिण्याचा मोह आवरता येत नाही हे नक्की...
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 02/23/2021 - 11:26 नवीन
व्वा, व्वा....
प्रकाश शोधण्या जीवन संपते अन क्षितिजावरती कळते शेवटी अंधार असतो खरा सोबती तोच सुरुवात..अन तोच शेवट..
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Tue, 02/23/2021 - 12:32 नवीन
खूपच छान कविता
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 03/01/2021 - 17:33 नवीन
आपल्या प्रतीसादा बद्दल धन्यवाद. जवळपास पंचेचाळीस वर्षे हिन्दी भाषेची जवळीक त्यामुळे मराठी दुरावली नाही पण शब्द समृध्दी अल्प. सेवानिवृत्त नंतर मराठी साहित्य भरपूर प्रमाणात उपल्ब्ध, मिसळपाव चे सदस्यत्व घेतल्यानंतर लिहिण्यासाठी हुरूप आला. सर्व मीपाकरांचे धन्यवाद. काही हिन्दी लेखन पण शेअर करत आहे, कृपया अभिप्राय द्यावा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा