Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

वार्‍याने पेटते रान आता हे ..

ग — गणेशा, Sun, 02/21/2021 - 10:20
घामाच्या चिंब भरलेल्या सदर्‍याला ठिगळे अनेक रंगबेरंगी.. पोटाच्या खळगीसाठी उगाच चालली बेसुमार झीज पायाची .. वार्‍याने पेटते रान आता हे कशास विचार फुका.. होरपळले शेत जरी हे ढेकळाचा रंग काळा तो काळाच.. ठिंणगी बनलेला विचार तुझा तू दूर आकाशातील तारा .. ओसाड ह्या जगण्यावरती उगा बुजगावण्यांचा पहारा.. दगडाला कुठे फुटतो पाझर ? कुठे शोधु देवपण त्याच्यात ? जन्मलो मातीत या पुन्हा मातीत मिटण्यासाठी... -- शब्दमेघ (शीघ्रकाव्य, २१-०२-२०२१)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4161 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Sun, 02/21/2021 - 12:04 नवीन
खूप दिवसांनी लिहिलंस, एकदम मस्त
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Sun, 02/21/2021 - 12:23 नवीन
खूपच छान
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 02/21/2021 - 12:49 नवीन
छान आहे कविता. आवडली, निराशेचा सूर असला तरीही :)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 02/22/2021 - 10:19 नवीन
निराशेचा सूर असलेले वाचायला आवडत नाही. पण कविता आवडली, मस्त आहे. अवांतर - इतका संवेदनशील माणूस धुळवडीच्या धाग्यांवर कशाला फिरकतो काय माहिती!
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sun, 02/21/2021 - 16:22 नवीन
होरपळले शेत जरी हे पण ह्या वर्षी तरी पाऊस चांगला झाला त्यामुळे सगळीकडे पिक चांगली आलीयेत.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 02/21/2021 - 18:58 नवीन
कविता शेती वर नाहीये...
वार्‍याने पेटते रान आता हे कशास विचार फुका.. होरपळले शेत जरी हे ढेकळाचा रंग काळा तो काळाच..
आज काल लोक स्वतःचे डोके न वापरता कोणाचे ही ऐकून उगाच पेटतात.. कोणासाठी हि..अतिरेकी जणू.. कसलाच विचार करत नाही.. ( फुका म्हणजे विनाकारण ) आणि ती जी माणसे आहेत त्यांना काही भावना असतात का नाही? आणि जरी त्यांना मन असले जणू हिरव्या शेता सारखे पण असल्या बुद्धिहीन वागण्याने ते होरपळले तरी काय? हि पेटलेली माणसे कुठे कोणत्या जाती धर्माची असतात.. ती असतात माणुसकिला काळिमा फासणारी..माणुस असतात पण काळी ठीककूर.. मानवता हिन वाऱ्याने पेटते रान आता हे.. म्हणजे कसलीही कोणाची हि हाक आली की माणसे पेटून उठतात...
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Mon, 02/22/2021 - 10:12 नवीन
विस्कटुन सांगितल्याबद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/22/2021 - 03:46 नवीन
कुठे कुठे थोडी गंडल्यासारखी वाटली. बहूतेक परत एकदा शांतपणे वाचावी लागेल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/22/2021 - 04:24 नवीन
यमक आणि लय यांचा कुठे हि वापर नाही.. जसे विचार तसे फास्ट लिहिलेले आहे..त्यामुळे नसेलच आवडली. लय बद्ध किंवा आखीव कविता नाहीये.. त्यात खूप दिवसांनी लिहिलं आणि जसे वाटेल ते, शब्द हि फिरवले नाही.. शब्द फिरवून लिहिण्यात मज्जा येत नाही
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/22/2021 - 04:48 नवीन
कोणातेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही... किंवा त्यावर जास्त विचार करण्याचीही गरज नाही... जसे वाटले जसे सुचले तसे तु लिहिलेस.. त्याचे कौतुक आहे म्हणून प्रतिक्रीया लिहिली...नाहीतर वाचुन तसाच पुढे गेलो असतो.. तूला जे काही सांगायचे आहे ते माझ्या पर्यंत पोचले की कदाचित आवडेल.. तो पर्यंत धीर धरणे इष्ट... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा