Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

आपलेच दात.....

म — मका म्हणे, Sat, 02/20/2021 - 17:30
लहानपणी दुधाचे दात पडून त्या जागी नवीन यायचे. वाईट वाटायचं एखादा दात पडून गेला की काही वेळ कधी कधी तर, असा पडलेला दात, आठवण म्हणून जपून ठेवायचो दिवसेंदिवस सवयीने जीभ तिथं जायची आणि मग आता तिथे काहीच नाही हे लक्षात आल्यावर परत यायची काही दिवस तर तो एक चाळाच होऊन बसला होता मनाला मग पुन्हा त्या जागी एक नवीन दात दिसायला लागायचा हळुहळु.. हा दात इतर आधीच असलेल्या दातांमध्ये स्वतःला सामावून घ्यायचा याचा आकार, ठेवण निराळी असायची हा अधिक तजेलदार, बळकट आणि सशक्त असायचा, इतरांच्या तुलनेत आरशात स्वतःला पाहताना या नवीन दातामुळे चेहऱ्याला आलेल्या वेगळेपणाकडे लक्ष जायचं... काही नवे, काही जुनेच असे घेऊन जगलो कितीक वर्ष आनंदाने.... अनेक कडू गोड गोष्टी चघळल्या एकत्रच चुकून दातांखाली आल्या काही जखमा घाईत, ठुसठुसत राहिल्या बराच वेळ... अपमान गिळले, निराशा चाखली चवीने अगदी एकमेकांना सुद्धा खाल्लं रागात इतकं होऊनही आपले कोण आणि बाहेरच्यांना दाखवायचे कोणते हे भान जपलं.... आता बालपणीचे दात पडायचं वय निघून गेलंय आणि आहेत ते पडायला अवधी आहे अजून पण तरीही काही जागा रिकाम्या का वाटताहेत आतून ? सवयीने मनाच टोक जाऊन शोधून येतंय कुणाला तरी अकारण पूर्वीसारखी चव नाही लागत आहे आता त्याच पदार्थांची, सगळे दात शाबूत असूनही... हे काहीतरी अवेळी घडून गेलंय, कोणीतरी पडून गेलंय एका एकसंध ओळीतून त्या रिकाम्या जागी जाऊन शोधांवस वाटतंय काहीतरी.... या अधल्या मधल्या रिकाम्या जागा अस्वस्थ करतात मनाला ..... अशीच अजून काही वर्षे जातील, अन मग हळूहळू सगळेच दात पडून जातील, जगलो ज्यांच्यासोबत इतका काळ... काहींना तर उपटून काढावंच लागेल.... मग एक भयाण पोकळी तयार होणार काही काळ आणि मग आयुष्यात येईल कसलेच लागेबांधे नसलेल्या दातांची एक साचेबद्ध रांग कवळीच्या रूपात.... या कवळीच्या दातांखाली नाही चावले जात म्हणे आपलेच ओठ.....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1220 views

💬 प्रतिसाद
र
रंगीला रतन Tue, 04/27/2021 - 12:38 नवीन
या कवळीच्या दातांखाली नाही चावले जात म्हणे आपलेच ओठ..... सहीच!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा