Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जेव्हा अदम्य ऐसी

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 02/18/2021 - 13:57
जेव्हा अदम्य ऐसी निद्रा कवेत घेते आकाशभाषितांना ध्वनिचित्ररूप येते अंधार भिनत जाता भवताल स्तब्ध होते संवेदनांस अवघ्या व्यापून साक्षी उरते दिग्बंध सैल होती तर्कास काम नुरते कालौघ थांबतो अन् आभास सत्य होते अज्ञातशा स्वरांचा अनुनाद ऐकू येतो एकेक जाणिवेचा अस्पष्ट बिंदू होतो निद्रा अशी कृृृृपाळू अंकी तिच्या मी क्लांत मी शून्य एरवी, पण निद्रेत मी अनंत

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3231 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Fri, 02/19/2021 - 06:53 नवीन
अज्ञातशा स्वरांचा अनुनाद ऐकू येतो एकेक जाणिवेचा अस्पष्ट बिंदू होतो अप्रतिम.. शब्द अवघड असले तरी त्यामागचा अर्थ जबरदस्त आहे.. खूप दिवसांनी कविता विभाग उघडला.. मस्त वाटले कविता वाचुन...
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 02/19/2021 - 13:22 नवीन
कवितेचं शीर्षक पाहिलं आणि ओळखलं की तुमचीच कविता असणार. मी शून्य एरवी, पण निद्रेत मी अनंत.. क्या बात!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 02/19/2021 - 13:59 नवीन
आवडली, खुपच आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 02/19/2021 - 18:14 नवीन
सुदंर
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 02/19/2021 - 18:15 नवीन
सुदंर
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 02/21/2021 - 11:11 नवीन
सर्व कवितारसिकांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 02/21/2021 - 12:20 नवीन
आवडले. :-)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा