Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शुन्य टिंब एक

न
नीळा
Mon, 02/15/2021 - 14:55
💬 3 प्रतिसाद
सगळ्यात महत्वाचे म्हणजे माफी मागणे. पहिल्यांदा ज्या आयडी चा अकाऊंट माम्ही हॅक केलाय म्हणजे नीळायांचा..सर माफ करा पण माम्हचा पण नाईलाज आहे…माम्हची कहाणी ऐकली की तुला कळेलच…समजुन पण घ्यालच. दुसरी गोष्ट म्हणजे ईतर सगळ्या वाचकांना…. माम्हची भाषा तोडकी मोडकी वाटते ना?…म्राठी हि काही माम्हची योनभाषा नाही…आणि माम्हच्या दुनिया मधल्या काही संकल्पना.. शब्द तुच्या भाषेत नाहीतच. तर थोड समजुन घ्या… हळूहळू सवय होईल, माम्हालाहि आणी तूलाही. ईथेच कहाणी षांगायच मुख्य कारण म्हणजे यक्क. युनायटेड पासुन ईतक्या लांब असलेल्या, युनीनेट वरच काय….आमच्या नकाशावर पण नसलेल्या… एका बाजूला असलेल्या…जेमतेम पसरलेल्या नेटवर्कमध्ये यक्क माम्हला शोधत येईल हि शक्यता कमीच आहे. पण यदादकाचीत शोधलच यक्कने माम्हाला तर चांगलच आहे..ते पण एक सांगायचे आहे तुला. सुरवाती पासुन सगळे संगतवार सांगतो….माम्हचे नाव….म्राठीमधे लिहीणे कठीण आहे….माम्हच्या ईकडे अवकाशाचा रंग असतो त्या वरुनच माम्हचे नाव ठेवले आहे.. रकच्याने ही आयडी चोरायचे ते पण एक कारण आहे….जवळीक वाटली.. अवकाश आणि काल यात एक छोटी खीडकी मीळते माम्हला कधीतरी…आणी फक्त या नेटवर्क वर येता येते कसेबसे. पण हे नेटवर्क युनीनेटला जोडलेले नाही. तरीही चांगली माणूस आहात तु..माम्हला मदत कराल अस वाटतय. आणि नाहीतरी …काय म्हणता तु…दिल का बोझ तरी हलका होईल… या सगळ्याची सुरवात झाली माम्हाला झीब भेटण्याने.झीब माम्हच्या बरोबरच होत शीकायला. खुप हुशार होत ते पण नंतर ते भयंकर आजारी असल्याचे कानावर आल. त्यांच्या पैकी सर्क्युलेशन खराब झाल होत.. अरे हो एक महत्त्वाचे सांगितले नाही माम्ही. माम्हचे शरीर तु सारखेच आहे जवळपास.. फक्त थोडेफार बदल आहेत. तुच्या शरीरातील सीस्टीमस..रेस्पी… सर्क्युलेशन, डायजेशन सगळ्या माम्हच्या शरीरात आहेत..सगळीकडे युनायटेड भर तशाच आहेत बहुतेक तुझ्या सगळ्या सीस्टीमस एकच सेंट्रल प्रोसेसर कंट्रोल करतो..मेंदु म्हणतो तु म्राठीत. माम्हच्या प्रत्येक सीस्टीमला एक छोटासा वेगळा मेंदु हाताळतो…आणि म्हणून मुख्य मेंदूला आलतु फालतु काम करायला नाही लागत. फक्त वीचार करायचा….कदाचित तुमचा मेंदू हालचाल.. अन्नपचन…सेक्स.. रीप्रोडकशन या बेअकली कामात गुतुन रहातो म्हणून तुम्ही ईतके मागास आहात…. काय म्हणता तुम्ही…असो! आता थोड कठीण आहे समजावून स़ागणे….प्रयत्न करतो माम्ही. तु आणी तुझ शरीर तु वेगळ मानतो..बोलताना माझा हात…माझ डोक..माझ ह्रदय.. अस बोलतो तु…आणी मग आमच घर…आमची सोसायटी.. आमची गच्ची वगैरे… माम्हचा प्रत्येक सीस्टीम हाताळणारा मेंदू पण हळूहळू थोडा प्रगत झाला आहे…प्रत्येक मेंदु थोडा थोडा वीचार करायला लागला स्वतंत्र पणे पण मग गोंधळ होऊनये म्हणून मुख्य मेंदु सगळ्यांना साभाळतो…म्हणजे तुच्या भाषेत मी पण आणि आम्ही पण… मला म्राठीतला मी आणि आम्ही पण पटला नाही…तुच्या भाषेत शब्दच नाही तसा…म्हणुन माम्ही अस वापरतो. तर माम्ही युनायटेड च्या कडेवर बाहेरच्या बाजूला असलेल्या एका सीस्टीम चे आहोत. माम्ही आमच्या जगाला जे म्हणतो त्याचा अनुवाद म्राठी मध्ये साधारण जमीन…धरा असा करता येईल. तुमच्या जगासखच आहे आमच जग…म्हणुनच तर माम्ही….ते येईलच पुढे. तर शीक्षण पुर्ण करून नोकरीच्या शोधात होतो माम्ही. एका ठीकाणी गेलो होतो मुलाखातीला तीथे झीब भेटल अचानक. तसच गबाळ्या कपड्यात होत. पण त्याच्त्य डोळ्यात तेच तेज होत. आणि थोडा हरवले पणा. क्रमशः

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2073 views

💬 प्रतिसाद (3)
क
कंजूस Mon, 02/15/2021 - 15:04 नवीन
सम्जलं न्हाय.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 02/15/2021 - 15:14 नवीन
वाचताना अगदी काळानिळा व्हायला झालंय..
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 02/15/2021 - 16:46 नवीन
ममाम्ही मन लावून वाचलं..पुढचा भागपण वाचू.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा