Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धम्मालपंती प्रवेशिका – ५

स
साहित्य संपादक यांनी
Mon, 02/15/2021 - 10:24  ·  स्पर्धा
स्पर्धा
५. मिपाकर संदीप चांदणे यांची कन्या धाकटी कन्या मानसी (वय ४ वर्षे) हिचे एक चित्र. 1 . . ५.अ मिपाकर संदीप चांदणे यांचा भाचा आरव (वय ५ वर्षे) ह्याचे एक चित्र. 2. . . ५.ब मिपाकर संदीप चांदणे यांची जेष्ठ कन्या मुग्धा (वय ७ वर्षे) हिची काही कणीक शिल्पे. 3 . . 4 . . 5 . . 6 . . 7 ह्या पालीने दोन सीन्स क्रिएट केले घरात. झाले असे की, एका रविवारी मुग्धाची आत्तू येणार होती भेटायला. तर मुग्धाचा सकाळी उठल्यापासूनच आत्तूला घाबरवण्याचा प्लॅन सुरू होता. तिने बाबाला तसे हळूच कानात सांगितले सुद्धा. बाबाने 'येस्स' म्हटल्याबरोबर तिची तयारी सुरू झाली. खरं बाबाला याची कल्पना नव्हती की, पहिल्यांदा त्याच्यावरच ह्याचा प्रयोग होणार आहे. सीन १) बाबा अंघोळ करून बेडरूममध्ये येतो. घालायची कपडे आधीच बेडवर टाकून ठेवलेली असतात त्यातला शर्ट घालण्यासाठी उचलतो तर शर्टखाली पाल. तो एवढ्या मोठ्याने दचकून मागे सरकतो की मागच्या कपाटाला धडकून कपाटावरच्या दोन चार वस्तू त्याच्या टाळक्यात. की लगेच बाजूला उभ्या तीन कार्टूनांचा दंगा सुरू! बाबाही मग ती खोटी पाल उचलून त्यांच्या दंग्यात सामील होतो. सीन २) दुपारी साडेबाराच्या सुमारास मुग्धाची आत्तू घरी येते. हाश्श हुश्श करून सोफ्यावर बसते. मुग्धाच तिला ग्लासात पाणी आणून देते आणि आत्तू पाणी पीत असतानाच हळूच तिच्या मागे जाऊन सोफ्यावर उभा राहून वरून पाल तिच्या मांडीवर टाकते. आत्तू फुर्रर्र करून पाण्याचा फवारा समोर बसलेल्या आजोबांच्या अंगावर उडवते. बोनस सीन ३) आजी किचनमध्ये असते. ती ह्या आवाजाने हॉलमध्ये येऊन मुग्धाच्या पाठीत एक जोरदार धपाटा घालते. मग तिचे रडे थांबवण्यासाठी बाबा तिला आईस्क्रीम खायला बाहेर घेऊन जातो.

वाचनखूण लावा
| 12384 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 12384 views

ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/15/2021 - 11:17 नवीन
पालीचा किस्सा भयंकर आवडल्या गेला आहे कणकेचा या पेक्षा दुसरा कोणताही सदूपयोग असूच शकत नाही. इतर कणीक शिल्पेही आवडली. मधे मधे उभ्या आडव्या काड्यांचा अधार दिला तर कणकेचा दोन मजली वाडा / बंगला सुध्दा बांधता येईल आरव आणि मानसीची निरागस चित्रेही आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 02/15/2021 - 11:31 नवीन
पाल प्रकरणाने धुमाकूळ घातलेला दिसतोय अगदी, सगळ्या कलाकृती, चित्रं खूप खूप आवडली सांगा बच्चे कंपनीला :)
  • Log in or register to post comments
व
विश्वनिर्माता Mon, 02/15/2021 - 12:06 नवीन
हाहा छान किस्से
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 02/15/2021 - 12:09 नवीन
कणीक शिल्पे आणि गमती भारी आहेत.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 02/15/2021 - 12:09 नवीन
मस्त कलाकृती ! +१ पालीचा धुमाकूळ .... खतरनाक !
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 02/15/2021 - 13:53 नवीन
चित्रे, कणिकशिल्पे आणि पालीचा किस्सा सगळेच एकापेक्षा एक भारी
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/16/2021 - 19:35 नवीन
मस्त.. आणि पाल प्रकरण पण भारीच.. लहान लहान गोष्टीत खूप मोठ्ठा आनंद असतो...:-))
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Wed, 02/17/2021 - 11:17 नवीन
पालीचा किस्सा भारीये !
  • Log in or register to post comments
A
Ajit Gunjal Wed, 02/24/2021 - 17:36 नवीन
Mast मस्त भारी किस्सा Marriage Anniversary Wishes in Marathi
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 04/23/2021 - 16:30 नवीन
हवालदिल -कासावीस ?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 04/28/2021 - 13:51 नवीन
पालीचा धुमाकूळ .... भारी आहे ! कणीक शिल्पे आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/28/2021 - 13:56 नवीन
कणीक शिल्पे आवडली. प्रयोग आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
भ
भागो गुरुवार, 05/26/2022 - 05:23 नवीन
+१ अहो इथे स्पर्धा चालू आहे. मतदान करा.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे गुरुवार, 05/26/2022 - 05:29 नवीन
15 Feb 2021 ला प्रकाशित केलेल्या धाग्यावर अजुनही मतदान चालू आहे?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा