Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

असंही व्हॅलेंटाइनचं सेलिब्रेशन...

म — मनस्विता, Mon, 02/15/2021 - 10:11
उगवला प्रेमिकांच्या सोहळ्याचा दिन वाजत गाजत त्याच्या हृदयाची वाढली होती धडधड तिच्याही काळजात होत होतं लकलक कारण तो होता ट्रेडमिलवर धावत आणि तिच्या लेकीच्या व्हॅनचा हॉर्न होता वाजत दिले तिने त्याला आवर्जून फूल पण होतं ते डब्यातलं कोबीचं फूल निघाला मग तो एकटाच लॉंग ड्राईव्हवर कारण होतं त्याचं ऑफिस नगर रोडवर पोहोचला एकदाचा तो ऑफिसला होतीच 'ती' तिथे सोबतीला सुरु झालं त्याचं आणि तिचं गूज म्हणला तो तिला दिवसभराची राणी माझी तूच तिचाही 'तो' होता घरात सोबतीला देईना तिला एकही क्षण फुरसतील कॉम्प्युटरची सिस्टीम होती त्याची 'शिरीन' अन घरकामाचा रगाडा तिचा 'फरहाद' मावळला दिनकर अन झाला त्यांचा कॅन्डल लाईट डिनर कारण होती MSEB ची कृपा त्यांच्यावर तो शिरला निद्रादेवीच्या कुशीत अन ती बसली लेकीचा प्रोजेक्ट करीत म्हणे उगवला होता प्रेमिकांच्या सोहळ्याचा दिन वाजत गाजत...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2759 views

💬 प्रतिसाद
म
माहितगार Mon, 02/15/2021 - 12:26 नवीन
कविता उत्तमच आहे, कविता आणि कवितेतील व्यथा वास्तव असूही शकतात. पण .. १४ फेब २०२१ ही तशी रविवारी , सहसा शाळा ऑफीसला सुट्टी असण्याच्या दिवशी आली होती, अर्थात कवि कवियत्रींवर काळाचे बंधन घालावेच असा अट्टाहास निश्चित नाही.
  • Log in or register to post comments
म
मनस्विता Sun, 02/28/2021 - 06:41 नवीन
तुमचा मुद्दा बरोबर आहे. ही कविता २०१८ साली लिहिली होती. पूर्वप्रकाशित असा उल्लेख करायचा राहिला.
  • Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर Sun, 02/28/2021 - 09:41 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 02/28/2021 - 17:44 नवीन
ह्यामुळं एकदम रिलेट करता आलं! एकदम संसारी "गृहस्था"च्या वास्तवाची जाणीव करून देणारी टोकदार कविता!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा