Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आज काय घडले... पौष व. १४ सुभाष 'चंद्रा'स ग्रहण?

A
Ashutosh badave
Sun, 02/14/2021 - 07:04
shubhashchandra शके १८६२ च्या पौष व. १४ रोजी वंगभूमीचे सुपुत्र सुभाषचंद्र हे आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याचा पुकारा सर्व देशभर झाला. १६ जानेवारीपासून मौन धारण करून ते आपल्या खोलीत चिंतनात मग्न झालेले होते. व्याघ्राजिनावर बसून 'गीता', 'चंडी' व इतर धर्मग्रंथांचे पारायण करीत ते संन्यस्त वृत्तीने वागत होते. दि. २६ ला सकाळी त्यांच्या खोलीशी गेलेल्या लोकांना आढळून आले की, आदल्या दिवशी ठेवलेली फळे, दूध, पाणी ही जशीच्या तशीच आहेत. काहीच हालचाल दिसेना, म्हणून लोक आंत गेले. तो काय ? सुभाषचंद्र बिछान्यावर नाहीत! सर्व नातेवाईक घाबरून गेले. बेलूर, दक्षिणेश्वर, पांदेचरी येथे तारा करण्यांत आल्या, पण सुभाषबाबूंचा शोध लागला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर खटला सुरू होणार होता. सरकारने तीन तास घराची झडती घेतली, अटक करण्याचे वॉरंट काढले, पण कोणालाही यश आले नाही. सारी भारतीय जनता चिंतामग्न झाली, सुभाषचंद्र कोठे गेले ? ध्येयवादित्वाचा, त्यागाचा, कर्तृत्वाचा, संघटनेचा, चतुरतेचा, नेतृत्वाचा आदर्श कोठं हरपला ? सदैव आपल्या प्रकाशाने तळपत असणाऱ्या या चंद्राला ग्रहण कां लागलें ? त्यांच्याविषयी सर्वांना फार प्रेम वाटे, त्यामुळे जनतेच्या मनात अनेक शंका-आशंकांची वादळे निर्माण झाली. विद्याभ्यास चालू असतांना सुभाष असेच अदृश्य झाले होते. गंगा-यमुनाकाठची पवित्र क्षेत्रे व हिमालयाची गिरिकंदरें गुरूच्या शोधार्थ हिंडूनहि मनःशांति लाभली नाही म्हणून हे परत आले होते. त्यांची वृत्ति मूलतःच तात्त्विक स्वरूपाची, गूढचिंतनात्मक आणि रामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांच्या शिकवणीत मुरलेली असल्यामुळे ते पुनः एकदा अदृश्य होऊन अध्यात्मसाधनांत गुंग झाले की काय असा तर्क करण्यांत आला. सुभाषबाबूंनी या वेळी केलेले धाडस जगप्रसिद्ध आहे. मुक्या व बहिऱ्या अशा झियाउद्दिन पठाणाच्या वेशानें काबूलला जाणे, बर्लिनला राजकारण करणे, सिंगापूरला आझाद हिंद सेना स्थापन करणे या घटना जगाला थक्क करून सोडणाऱ्या होत्या. २६ जानेवारी १९४१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 608 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 14 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा