Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मरण...

J — Jayagandha Bhatkhande, Mon, 02/08/2021 - 13:15
मरण... रिपोर्ट वाचून झाल्यावर, यमधर्म दिसे दारावर, मग आली भानावर, केलीच पाहिजे आवराआवर... तशी होती ती गोलमटोल, हळूहळू होत गेली अबोल, चेहऱ्यावर दिसे हसरा भाव, मनात सलत असे घाव... कोणी म्हणत नव्हते सरक, पण वागण्यात सर्वांच्या जाणवे फरक, मावळली गालीची हसरी खळी, आता आळीमिळी गुपचिळी... आयुष्यभराच्या आठवणींचा, कसा सोडवायचा गुंता, सतावत सारखे हेच विचार, अन् मनात दाटे चिंता... कळलं नाही तिला शेवटी, काय झाली चूक, बदल दिसे शरीरावर, मन झालं मूक... झोपली नव्हती ती, झाली होती क्लांत, दवाखान्याच्या शय्येवर, तिला मिळाली होती उसंत.. आकाशात दूर कुठेतरी, तेजस्वी तारा निखळला, गाली तिच्या एक, चुकार अश्रू ओघळला... डॉक्टरांना येताना पाहून, मुलगा थोडा घुटमळला, "किती वेळ राहिला" विचारताना, नवरा जरासा अडखळला... अचानक सगळं शांत झालं, हृदय तिचं थांबलं....... कोणीतरी कुजबुजलं, "बरं झालं, मरण नाही लांबलं..." जयगंधा... ६-२-२०२१.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4932 views

💬 प्रतिसाद
र
राघव Tue, 02/09/2021 - 02:40 नवीन
वास्तव आणि चित्रदर्शी.
  • Log in or register to post comments
J
Jayagandha Bha… गुरुवार, 02/18/2021 - 13:34 नवीन
धन्यवाद..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 02/19/2021 - 07:01 नवीन
खूपच आर्त लिहिली आहे.. डोळयांसमोर मरण दिसते आहे, आणि मग सगळ्या घटना, चिंता, लेखाझोका समोर येताना शहारा येतो... तुमची मी पहिलीच कविता वाचली बहुतेक.. लिहीत रहा.. वाचत आहे...
  • Log in or register to post comments
J
Jayagandha Bha… Fri, 02/26/2021 - 04:50 नवीन
मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 02/19/2021 - 07:49 नवीन
कविता खूपच छान जमली आहेत. पण इतक्या सिरीयस विषयावर आहे कि छान म्हणवत नाहीये.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 02/20/2021 - 12:14 नवीन
Exactly
  • Log in or register to post comments
J
Jayagandha Bha… Fri, 02/26/2021 - 04:50 नवीन
मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments
J
Jayagandha Bha… Fri, 02/26/2021 - 04:51 नवीन
मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा