Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

हाकामारी

क — कर्नलतपस्वी, Sun, 02/07/2021 - 17:54
गोष्ट लहानपणची लहानपणी ऐकली होती एक गोष्ट हाकामारी तीच नाव खुप होती दुष्ट खुप घाबरलो होतो ऐकल्यावर पण खरी होती कळले मोठे झाल्यावर एक दिवशी आई म्हणाली लवकर घरी ये हाकामारी येईल रस्त्यावर दिसलास तर तुला उचलून नेईल विचारल हाकामारी म्हणजे ग काय ? कधीतरी येतो तीचा फेरा गावावर आणी फुली मारते दारावर हवेत येती ,मुलं धरती नसतात तीला पाय आशी म्हणली होती तेव्हा माझी माय साऱ्या लहान थोरांना आहे तीचा धाक तीला फक्त तोंड आसत नसतात तीला पाय आवाज देईल तुला पण ओ नको देऊ नाहीतर घेऊन जाईल तुला पकडून तुझा पाय आठवतं मला आस म्हणाली होती माय जरी मोठा झालो तरी सगळ आठवतं हाकामारीच्या नावाने आजुन मन घाबरतं अंधाराच्या आधी गाव घरात लपायचे दारांचे अडसर सुद्धा चिडीचूप व्हायाचे एक दिवस अचानक दंवडी झाली शाळा कॉलेज मंदिराची दार बंद झाली वरतून हुकुम आला बाहेर पडू नका घरून काम करा अन घरूनच शिका हाथ धुवा मास्क लावा काळजी घ्या सुरक्षित रहा सरकारी तंबी आली आला करोनाचा फेरा जग तीने व्यापले तीच्या धाकाने सगळ्याना कापरं भरले भरले दवाखाने ओस पडले बाजार मरू लागले पटापटा पसरला चहूकडे आजार तेव्हां कळले की हाकामारी आसती आणी आईची गोष्ट कधी खोटी नसती आसती माझी माय तर विचारल असतं तीला हिच का ग हाकामारी जिच्या पासून तू वाचवल होतं मला ........ ३-११-२०२०

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4535 views

💬 प्रतिसाद
र
रंगीला रतन Tue, 04/27/2021 - 20:24 नवीन
आसती माझी माय तर विचारल असतं तीला हिच का ग हाकामारी जिच्या पासून तू वाचवल होतं मला नि:शब्द!!
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/28/2021 - 18:13 नवीन
लहानपणीची आठवण आणि सध्याची भीषण परिस्थिती यांची घातलेली सुरेख सांगड आवडली.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 04/30/2021 - 12:48 नवीन
हाकामारीच्या गोष्टीने मुलांना अनोळखी लोकापासून दूर राहून सुरक्षीत रहाता यावे असा अप्रत्यक्ष उद्देश्य असेलही पण प्रत्यक्षात ती एक अंधश्रद्धा होती, हाकामारीच्या अफवेला लहानच नाही मोठेही घाबरत स्वतःच्या घरातल्या माणसांना दरवाजा उघडणार नाहीत एवढी दहशत होती कारण अंधश्रद्धेनुसार हाकामारी रामायणातील मारिच कथे स्टाईल घरातल्यांच्या आवाजातून हाक देई असाही काही भाग या अंधश्रद्धेत असावा. अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक तथ्य यांना एकाच तागडी तोलण्याचा मोह शक्यतोवर टाळणे अधिक श्रेयस्कर असावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 04/30/2021 - 16:17 नवीन
ओ कोरोना कल आना
असे लिहायची वेळ येइल नाही ;)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 05/21/2021 - 12:38 नवीन
हाकामारी हा लहानपणीचा अनुभव, महामारी हा मोठेपणाचा. तरी संदेश एकच घरी रहा सुरक्षित रहा. साहित्या कडे शास्त्र म्हणून न पहाता भावना म्हणून बघितल्यास अंधश्रद्धा व विज्ञान या मध्ये गल्लत होणार नाही.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/30/2021 - 12:55 नवीन
कविता छान. हाकामारी आणि महामारी असे सरळसोट यमक टाळल्याचे अभिनंदन. =)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 05/21/2021 - 12:43 नवीन
गोष्ट आसल्यामुळे यमक, अनुप्रास वैगेरेची जरूरच भासली नाही. मोठेपणीचा अनुभव बघता मन लहानपणात गेले आणि दिवंगत आईशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागले, त्यामधुन सुचलेले विचार.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 09/27/2024 - 18:34 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
न
नठ्यारा Sun, 09/29/2024 - 19:31 नवीन
वर माहितगार म्हणालेत ते खरंय :
अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक तथ्य यांना एकाच तागडी तोलण्याचा मोह शक्यतोवर टाळणे अधिक श्रेयस्कर असावे असे वाटते.
करोना ही एक अंधश्रद्धाच आहे. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा