Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

माणदेशातील शिलेदार वारुगड

व
व्लॉगर पाटील
Tue, 02/02/2021 - 05:24
💬 2
माणदेशातील शिलेदार वारुगड । मराठी vlog सातारा फलटण महादेव डोंगर रांगेत असलेला गिरिदुर्ग प्रकारातील, जवळपास ३००० फूट उंच असलेला किल्ला म्हणजे "वारुगड". विजापूरच्या वाहुतुकीवर नियंत्रणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी २ किल्ले बांधले , एक संतोषगड आणि हा वारुगड. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि दहिवडी पासून जवळ असेलेला हा किल्ला. वारुगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी १० ते १५ मिनटे लागतात आणि जर जाधववाडी मार्गे आलो तर जवळपास २ तासाचा ट्रेक आहे. गडावरती जाण्यासाठी सिमेंट च्या पायरचा बांधकाम सुरु आहे. गडाच्या मुख्य दरवाजा जवळ भक्कम तटबंदी , दोन बुरुज व दरवाज्याचे अवशेष आहेत. गडावरती पोहचलं कि सदरचे अवशेष दिसतात. तसेच एक मंदिर , पाण्याचे टाके आणि स्थानिक सुरु केलेलं तटबंदीच काम असा बालेकिल्ल्याचा परिसर आहे. गडावरून वारुगड गाव, वारुगड माची, सीताबाईचा डोगर, शिखर शिंगणापूर आणि जर वातावरण स्वच्छ असेल तर पुरंदर वज्रगड ही दिसतात. बालेकिल्ल्यावरन खाली येताना गडाचे ३ ४ बुरुजाचे अवशेष हि दिसतात. गडावरती एक पाण्याचे टाके , तिथे लिहलेल्या माहितीवरून समजलं कि ते पाण्याचं टाकं पांडवकालीन आहे , पांडवांनी ते एकाच रात्रीत बांधलं होत अशी आख्यायिका आहे. आपण जर गडावर दुसऱ्या मार्गे आलो तर आपण फलटण दरवाज्यातून आत येतो. फलटण दरवाजाला भक्कम तटबंदी आहे आणि सोबतच दरवाजाचे अवशेष हि आहेत. या रस्त्याने जर आलो तर आपल्याला १ ते २ तासाचा ट्रेक करावा लागतो. वारुगड माची - वारुगडाला असलेल्या माचीला संपूर्ण तटबंदी आजही भक्कम स्थितीत आहे, तटबंदीवर काही बुरुजाचे अवशेष हि दिसतात. वारुगड गावात एक भव्य भैरवनाथाचं मंदिर आहे. मंदिराच्या समोर २ ३ वीरगळी हि आहेत. तसेच दगडात कोरलेलं एक कासव पण आहे. तसेच मंदिर भव्य असल्यामुळे जर कोणी स्टे साठी जात असाल तर राहण्याची सोय पण होते. जेवण/खाण्या साठी हॉटेल नसल्यामुळे जेवण घेऊन जाणंच उत्तम. गडावरची पाहण्याची ठिकाणे - - वारुगड बालेकिल्ला - वारुगड माची - पांडव कालीन पाण्याचे टाके - फलटण दरवाजा - भैरवनाथ मंदिर पोहचण्याचा मार्ग - पुणे - शिरवळ - लोणंद - फलटण - वारुगड - १३७ कि. मी. सातारा - कोरेगाव - पुसेगाव - निढळ - वारुगड - ६६ कि. मी. अधिक माहितीसाठी संपूर्ण विडिओ लिंक आणि आपणास या गडाबद्दल अजून काही माहिती असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा -

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3313 views

💬 प्रतिसाद
व
विंजिनेर Tue, 02/02/2021 - 18:56 नवीन
पाटील, भारीये फॉर्म्याट तुमचा, अजून येवुद्या व्हिड्यु असे
  • Log in or register to post comments
व
व्लॉगर पाटील Wed, 02/03/2021 - 13:47 नवीन
धन्यवाद , नक्कीच येत राहतील असे विडिओ ..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा