Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

हाक आभाळाची येता

अ — अनन्त्_यात्री, Mon, 02/01/2021 - 12:37
रूटीनाचे गंजलेले यंत्र अखंड घुमते जुन्या व्रणावर रोज नवी जखम करते अनावर भोवंडून शिणलेल्या प्राणासाठी वाटेवरच्या झाडाची साथ वाटे मला मोठी त्याचा मायाळू विस्तार घाले हिरवी फुंकर एक रंगीत पाखरू झुले उंच फांदीवर इवल्याश्या कंठातून काढी तरल लकेरी हाक आभाळाची येता झेपावते दिगंतरी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3077 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Mon, 02/01/2021 - 13:11 नवीन
काय टोटल लागली नाय. पण ठीक. सं - दी - प
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 02/01/2021 - 16:21 नवीन
त्याचा मायाळू विस्तार घाले हिरवी फुंकर एक रंगीत पाखरू झुले उंच फांदीवर .. मस्त रुटीन शब्दाऐवजी दुसरा मराठी शब्द छान वाटेल..रोजचाच ?
  • Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर Mon, 02/01/2021 - 17:25 नवीन
रूटीन म्हणजे नित्यक्रम कविता छान आहे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 02/02/2021 - 04:59 नवीन
रूटीनाचे गंजलेले यंत्र अखंड घुमते कोणते बरे गंजके यंत्र असेल असे जे अखंड घुमत असते? हे समजले की बाकी कविता समजायला कठीण नाही. आवडली, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 02/02/2021 - 07:08 नवीन
नित्यक्रम कितीही कंटाळवाणा अन् यांत्रिक (गंजलेला व यंत्रवत) असला तरी तो अखंड चालू ठेवावाच लागतो यातून येणार्‍या वैफल्याला रूटीनाचे अखंड गंजके यंत्र ...
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 02/05/2021 - 08:13 नवीन
माऊली, "हाक निसर्गाची येता" यासाठी खच्चून कच्चामाल तयार आहे =))
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 02/06/2021 - 12:10 नवीन
इडंबन तुमीच लिवा नं भौ
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा