खादी आणि हातमाग
भारत एके काळी वस्त्र निर्माणातील आघाडीचा देश होता. सुती कपड्यांचा शोध भारतातूनच लागला असावा कारण ग्रीक लोक जेंव्हा भारतात आक्रमण करायला आले तेंव्हा सुती कपडे पाहून त्यांना विलक्षण नवल वाटले. झाडावर उगवणारी लोकर अश्या पद्धतीने त्यांनी कापसाचे वर्णन केले होते आणि चित्रे सुद्धा काढली होती. (कापसा प्रमाणे नारळाचे झाड भारतांत मार्को पोलोने पहिले आणि लिहिले कि ४ मजली घरापेक्षा उंच असे एक झाड आहे ज्याला अजिबात फांद्या नाहीत पण टोकाला फक्त पाने आहेत आणि ह्याची फळे माणसाच्या डोक्यापेक्षा मोठी आहेत. आणि ह्या फळांच्या आत थंडगार गोड पाणी आहे आणि चविष्ट गॉड पदार्थ. हे त्याचे वर्णन मानून घेण्यास इटली तील लोकांनी साफ नकार दिला आणि असे झाड
त्याच बाजूला जापान देशांत सुद्धा वस्त्रोद्योग महत्वाचा होता. मी इथे साधारण ५०० वर्षे मागची गोष्ट लिहत आहे. भारत आणि जपानचा महत्वाचा फरक म्हणजे व्यापार आणि विदेशी लोकांना स्वागत देणे ह्यांत भारत आघाडीवर होता. मान न मान में तेरा मेहमान म्हणून विविध इस्लामिक आक्रमक देशांत स्थायिक झाले होते आणि त्याच वेळी युरोप (समुद्र मार्गे) आणि अफगाणिस्तान मार्फत बऱ्यापैकी व्यापार चालला होता.
जपानी लोकांना विदेशी लोकांचा भयंकर तिटकारा होता आणि आपल्या बाहेर जे जग आहे त्याला ओळखून त्यांच्याशी व्यवहार करण्याचा त्यांचा इरादा नव्हता. पण मेजी काळांत हे सर्व बदलले. जपानी राजा ने टोकियो मध्ये आपले बस्तान बसवले पण राजकारणाची संपूर्ण सूत्रे जपानी सामुराई ह्यांच्या हातांत गेली. अर्थात नक्की हा बदल कसा घडला हे विस्तारांत मी इथे लिहू शकत नाही पण थोड्क्यात इंग्लंड हि जगातील सर्वांत मोठी शक्ती आहे आणि आम्हाला सुद्धा इंग्लंड च्या च बरोबरीने बनायचे आहेत हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळे इंग्लंड जे करेल तेच आम्ही करू अश्या पद्धतीने त्यांनी इंग्लंड चा अभ्यास सुरु केला. काही काळांतच त्यांनी जपान मधील क्लास व्यवस्था पूर्ण पणे बंद केली सर्वाना सामान अधिकार दिले आणि एक नवीन प्रकारची कर पद्धती आणली. खाणकाम, वस्त्रोद्योग, शिक्षण व्यवस्था, जलसंसाधन, रेल्वे, टेलिग्राम आणि त्याच बरोबर विदेशी गुंतवणुकीला वाव दिला. (लास्ट सामुराई हा टॉम क्रूस ह्याचा चित्रपट जरूर पाहावा). स्त्रियांना जपान मध्ये दुय्यम वागणूक दिली जायची त्यांना शिकायला देत नसत आणि शिकलीच तर त्यांची लिहिण्याची स्क्रिप्ट वेगळी होती. ह्याच मुळे जपानी भाषेंत आज एकूण तीन वेगळ्या लिप्या शिकाव्या लागतात कांजी, कॅटाकाना आणि हिरंगाना. हिरंगाना बऱ्यापैकी संस्कृत वर आधारित आहे.
इंग्लंड ला जपानवर कब्जा करायचा होता पण इथे एक महत्वाची अडचण आली. १८५७ चे भारतीयांचे युद्ध आणि त्याआधी अमेरिकेचे स्वातंत्र्य ह्यामुळे इंग्लंड कडे मानवी बळाची चणचण होती आणि जपानी सामुराई मंडळींनी अमेरिकन लोकांना आणि सैनिकांना काम देण्यास सुरुवात केली. त्याशिवाय युद्धतंत्रांत जपानी लोक खूपच उजवे होते आणि भारताच्या तुलनेत जास्त संघटित होते. विदेशी लोकांबरोबर व्यापार सुरु होतांच अनेक जपानी लोकांनी आपले पारंपरिक धंदे सोडून नवीन धंद्यात प्रवेश केला आणि विदेशी व्यापाऱ्याकडून नवीन प्रकारचे व्यवसाय आत्मसात केले.
जपानी लोकांनी नक्की इंग्लंड ची कॉपी का केली ? तर बहुतेक जपानी विद्वानांनी इंग्लंड मध्ये प्रवास केला नव्हता पण त्यांना माहिती होती कि इंग्लंड जगातील सर्वांत मोठी शक्ती आणि श्रीमंत देश आहे. ह्यासाठी त्यांनी ऍडम स्मिथ ह्या स्कॉटिश विचारवंताचा अभ्यास केला. ऍडम स्मिथ हे आधुनिक अर्थशास्त्राचे जनक मानले जातात आणि मुक्त आर्थिक व्यवस्था आणि भांडवलशाही ह्यांचे सुद्धा जनक मानले जातात. (ऍडम स्मिथ ह्यांना ब्रिटिश राणीने भारताला आपण गुलाम बनवावे का ह्या विषयाचा अभ्यास करायला सांगितले होते. ऍडम स्मिथ ह्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचा कडाडून विरोध आणि भारतात राजकीय हस्तक्षेप करणे एकूण ब्रिटिश समाजासाठी नुकसानीचे आहे असे सांगितले होते).
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. ह्या काळांत भारतात अनेक उद्योग धंदे ब्रिटिशांनी निर्माण केले होते. रुपया हे चलन बऱ्यापैकी प्रचलीत होते. जहाज बांधणी, विमान उद्योग, औषध निर्मिती आणि वस्त्रोद्योग ह्यांत भारताचे स्थान बऱ्यापैकी होते.
स्वातंत्र्यानंतर भारतात आर्थिक सुधारणा घडवून आणण्याची क्षमता भारतीयांत होती. जपान ने ज्या पद्धतीने प्रगती केली होती त्याच पद्धतीने भारत प्रगत आकारू शकला असता. पण भारतीयांचे दुर्दैव होते कि दूरदृष्टी आणि बुद्धिमत्ता ह्यांत भारतीय नेतृत्व फारच कमी पडले. त्यांना सोवियत च्या केंद्रीकरणाचे जास्त प्रेम होते. दिल्लीत राहून आपण प्रत्येक भारतीयाने काय केले पाहिजे हे सर्व काही "प्लॅन" करू शकू अशी त्यांची अपेक्षा होती आणि त्याच वेळी विदेश आणि व्यापार ह्यांच्या विषयी संशयास्पद वृत्ती भारतीय नेत्यांची होती.
सर्वांत विचित्र गोष्ट म्हणजे नेहरू, बोस, गांधी ते आंबेडकर पर्यंत सर्व भारतीय नेत्यांनी इंग्लंड मध्ये अभ्यास केला होता. त्यांनी इंग्लंड मध्ये अनेक वर्षे राहून इंग्लडच्या वैभवाचा अनुभव घेतला होता. पण तरी सुद्धा इंग्लंड चीच पद्धत आपण राबवावी असे त्यांना उलट वाटले नाही. ह्याला कारण कदाचित असे असू शकते कि युनिव्हर्सिटी सिस्टम हि कदाचित नेहमीच ज्ञानास अपायकारक असते. प्रत्यक्ष आयुष्यांत फेल झालेले लोक प्राध्यापक बनून हस्तिदंती मनोर्यातून आपली मते व्यक्त करतात आणि JNU प्रमाणे नेहमीच आपल्या देशाच्या विरुद्ध प्रचार करतात. त्याच प्रमाणे इंग्लंड मध्ये शिकलेले भारतीय नेते कदाचित इंग्लडच्या किती वाईट आहे किंवा भांडवलशाही किती वाईट आहे हेच ऐकत आले असावेत.
(टीप : अमेरिका जगांतील सर्वांत प्रगत देश आणि प्रगत समाज असला तरी आपण अमेरिकन विद्यापीठांत गेलात तर तिथे तुम्हाला मार्क्स कसा बरोबर होता हे जास्त शिकवले जाते. )
१९४७ मध्ये भारतीयांनी आपल्या देशाचा पाया "बाबू वाक्यम प्रमाणं" ह्या तत्वावर घातला. ह्या बीजाने म्हणता म्हणता विषवल्लीचे रूप घेतले आणि एकदा विशालकाय झाल्यावर ह्या विषवल्लीला खत पाणी देणे सुद्धा आवश्यक होते. आता सुद्धा दर वर्षी गांधी च्या जन्मदिवसाला सर्व भारतीय राजकारणी मंडळी बसून शेकडो वर्षं मागे ज्या पद्धतीने माणूस सूत निर्माण करत होता तीच पद्धत वापरून (चरखा) सूत करतात.
अर्थांत प्रतीकात्मक दृष्ट्या त्यांत काहीच चुकीचे नाही पण दुर्दैवाने हे फक्त प्रतीकात्मक नसून वस्त्रनिर्मिती ह्यावरच्या भारतीय धोरणाचे सुद्धा ते प्रतीक आहे. १९४८ भारतीय बाबूंनी ठरविले कि भारतीय विणकर ह्यांना सरकारने औद्योगिकरणापासून वाचवले पाहिजे. त्यांनी हातमाग आणि विणकरी लोकांना प्रचंड सवलती तर दिल्याचं पण आधुनिक तंत्रज्ञानाला भारतात येण्याला बंदी सुद्धा घातली. १९४८ ते १९८० पर्यंत भारतातील हातमागांची संख्या वाढून दुप्पट झाली. अनेक गावांत १०-१२ लोक मिळून दिवसभर सूत कातून त्याला स्मूथ करण्याचे काम करत असत. हेच काम त्या काळाचे एक मशीन सुमारे १० मिनिटांत करू शकत होते.
अर्थांत हातमागाने कपडे करण्यात काहीही गैर नाही. समस्या हि होती कि हा संपूर्ण व्यवसाय अश्यासाठी अस्तित्वांत होता कि सरकारने जबरदस्तीने इतर मार्गबंद केले होते. आधुनिक यंत्रणा भारतांत वापरली जात नव्हती असेच नव्हे तर हि यंत्रणा कशी निर्माण करायची, त्यात सुधार कसे करायचे आणि ह्या विषयावर सुद्धा भारतीय लोक पूर्ण पणे अनभिद्न्य होते.
त्याशिवाय भारतातील इतर लोक सुद्धा प्रचंड गरीब होते त्यामुळे निकृष्ट पद्धतीने निर्माण केलेले महाग कपडे त्यांना विकत घ्यावे लागत होते आणि एक अर्था नेसंपूर्ण भारतीय जनता आणखीन गरीब होत होती.
त्याच वेळी आपण १९८० मधील जपान मध्ये जाऊन पाहुया. जपान ने फक्त इंग्लंडहून आधुनिक तंत्रन्यान आणले असे नाही तर त्याचा भरपूर अभ्यास सुद्धा केला. १९८० मध्ये जपानने एक असे मशीन विकसित केले होते कि आपण वाट्टेल ते चित्र कागदावर काढून दिले कि कॆमेराने ते चित्र स्कॅन होत होते नंतर ते चित्र कपड्यावर येण्यासाठी धागे कसे गुंतवावेत हे कम्प्युटर शोधत असे. मग त्या पद्धतीने यार्न विणून हे ह्या चित्राची नक्षी असलेली सिल्क ची वस्त्रे हे मशीन काही तासांतच निर्माण करत असे. आणि हे मशीन फक्त ३ लोक चालवत असत आणि वर्षाला लक्षावधी अत्यंत उत्कृष्ट प्रकारचे कपडे निर्माण करत असत.
हे मशीन त्याकाळांतील जगांतील सर्वांत प्रगत असे मशीन होते. त्यातून निर्माण होणारे रेशमी कपडे सर्वांत चांगल्या दर्जाचे असून स्वस्त सुद्धा होते. पण त्याच वेळी रेशमी कपड्यावर जपानी इतिहास विणून दाखवायची जी जपानी परंपरा होती त्याचे रक्षण तर होत होतेच पण त्याशिवाय आता हे काम सोपे झाल्याने जास्त किचकट आणि चांगली कथा कपड्यावर विणून दाखवल्या जात होत्या. ह्या मशीन वर काम करणार्यांना भरपूर पगार तर मिळत होताच पण रेशमी कपडे जास्त प्रमाणात बनवले जात होते नि विकले जात होते.
२०२० मध्ये सुद्धा भारत अजून जपानची बरोबरी करू शकत नाही. कपड्यांच्या निर्माणात बांगलादेश आणि व्हिएतनाम भारतापेक्षा पुढे आहेत. चीन तर खूपच पुढे आहे.
दुर्दैव हे आहे कि १९८० मध्ये विणकरांची जी स्थिती होती तीच २०२० मध्ये आहे. भारतीय प्रधान मंत्री निकृष्ट दर्जाचे हातमागावर विणलेले कपडे भारतीय जनतेला घ्यायला सांगत आहेत. हातमागावर काम करणाऱ्या लोकांना टीचभर पैसे मिळतात महिनाभर काम करून निर्माण केलेली २० हजार रुपयांची साडी भारतीय महिला महाग म्हणून घेतात पण ती निर्माण करणाऱ्या माणसाला त्यातून आपल्या परिवाराला पोटभर खाऊ घालायला सुद्धा शक्य होत नाही.
१९८० च्या आधी भारतातील बहुतेक कपडे हे हातमागावर निर्माण होते होते. १९८० मध्ये नाईलाजाने भारत सरकारला पावरलूम ला परवानगी देणे भाग पडले पण त्यावर सुद्धा निर्बंध होते. तरीसुद्धा १९८५ पर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त कपडे पॉवरलूम्स वर निर्माण होऊ लागले होते. २०२० मध्ये बहुतेक कपडे भारतांत पवरलूम्स वर निर्माण होत आहेत.
सूत कसे निर्माण करावे, पावरलूम कुठल्या पद्धतीची असावी ह्यावर भारत सरकारने खूपच निर्बंध घातले आहेत त्यामुळे ह्या क्षेत्रांत भारतीय लोकांना काहीही सुधारणा करून नवीन प्रकारचे लूम्स निर्माण करणे शक्य होत नाही. आपण १०० कोटींची र&ड करून केली नवीन मशीन आणि घातली सरकाने बंदी तर पैसे खड्यात जातील म्हणून विविध भारतीय कंपन्या बांगलादेश किंवा व्हिएतनाम मध्ये गुंतवणूक करणे पसंद करतात.
२०१५ मध्ये भारत सरकारने जागतिक हातमाग दिवस निर्माण केला. अनेक विद्वानांनी भारत सरकारने २०० वर्षांपूर्वीच्या हातमागानं प्रोत्साहन न देता आधुनिक तंत्रज्ञानाला चालना द्यायला पाहिजे असा सल्ला दिला आणि भाजप सरकारने सुद्धा तो गांभीर्याने घेतला होता. पण त्यांच्या ह्या खेळीला नेहमीच्या डाव्या मंडळींनी हाणून पाडले आणि पुन्हा भाजपा नेहमी प्रमाणे शेपूट घालून जैसे थे झाली आणि महान नेता पुन्हा खादी आणि हातमाग ह्या विषयावर "virtue सिग्नलिंग" करण्यात मग्न झाला. त्याची री ओढून अनेक भक्तमंडळी सध्या खादी कशी चांगली आणि हातमाग कसे चांगले हे लोकांना ऐकवत आहेत.
अनेक भारतीय लोक विनाकारण ह्या निकृष्ट दर्जाच्या व्यवसायांत अडकून पडले आहेत हीच एक वाईट गोष्ट नाही. हातमाग ह्या विषयावर मग काहीही रिसर्च होत नाही. नवीन मशीन्स शोधली जात नाहीत आणि कोणीही भांडवल द्यायला जात नाही. मग आपल्या शेतीप्रमाणेच हा व्यवसाय दिवसेंदिवस आणखीन खराब होत जातो. त्याशिवाय साड्यांची उपलब्धता कमी होते, नवीन डिसाईन्स येत नाहीत आणि साडी हा प्रकारच थोडा अनकूल होत जातो. २०-२५ हजाराची साडी आम्हा लोकांना महाग वाटते पण आधुनिक तंत्रज्ञानाने हीच साडी ३००० हजार रुपयांत निर्माण होऊ शकते. असे झाले तर जास्त महिला साडी घालू शकतात. मग जास्त नफा कसा करावा ह्या नादात नवीन प्रकारच्या साड्या निर्माण होतात आणि त्यामुळे साडी आधुनिक बनते नाहीतर साडी हा प्रकार काकूबाईचा पेहराव बनून राहतो.
पण आधुनिक तंत्रज्ञान सोकाळले तर काय होईल ? बहुतेक कपडे स्वस्त आणि जास्त दर्जाचे होतील. पण त्याच वेळी श्रीमंत लोकांना आपली श्रीमंती दाखविण्याची जी हौस आहे ती राहिलच त्यामुळे "हॅण्डमेड" किंवा "आर्टिसन" ह्या प्रकाराला हि मंडळी वाट्टेल तो भाव देऊन विकत घ्यायला तयार होतील. एकूण हातमागांची संख्या देशांत कमी झाली तरी त्यातून येणारा रेव्हेन्यू हा कैक पटीने वाढेल आणि विणकराला खूप जास्त पैसे मिळतील. मुक्त आर्थिक व्यवस्थेने सर्वांचाच फायदा होतो. जनतेला तर फायदा होतोच पण त्या शिवाय विणकराला फायदा होतो. जगातील सर्वोकृष्ट कपडे पुन्हा एकदा भारत बनवू शकतो असा आत्मविश्वास देशाच्या जनतेत निर्माण होऊ शकतो. फक्त IT मागे न लागता एक दुसरे क्षेत्र भारतीय युवा लोकांसाठी उघडू शकते.
मिल्टन फ्रीडमन ह्यांनी हा खालील एपिसोड १९८० मध्ये केला होता. त्यांत भारतीय विणकर दाखवले आहेत. काही महिने आधी मोदी सरकारने हातमाग विषयी जाहिरात प्रकाशित केली होती ४० वर्षे उलटली तरी भारतीय विणकर बिचारा आहे तिथेच आहे असे त्या जाहिरातीतून मला दिसले म्हणून हा लेखन प्रपंच. माझ्या मते हा एपिसोड प्रत्येक शाळेंत मुलांना दाखवायला पाहिजे आणि त्यावर निबंध स्पर्धा घेतली पाहिजे.
https://youtu.be/CWgNe8v6KFc?t=378
टीप : एके काळी ब्रिटिश सरकारने भारतीय विणकरांचे हात कापले होते कारण ते जास्त चांगले कपडे निर्माण करत होते (म्हणे). आधुनिक तंत्रज्ञानाला बंदी घालून भारत सरकारने सुद्धा एक प्रकारे भारतीय विणकरांचे हात कापले आहेत.
🗣 चर्चा
(79)
म
मुक्त विहारि
Sat, 02/06/2021 - 02:54
नवीन
ह्या मानसिकते मुळे आणि, नेताजी सुभाष चन्द्र बोस आणि सरदार पटेल यांना, नेहरूंनी बाहेरचा रस्ता दाखवल्या मुळे, कुणीही त्यांना विरोध करत न्हवते ... राष्ट्रा पेक्षा नेहरू स्वतःला मोठे समजायला लागले आणि त्याची शिक्षा आपण अद्याप भोगत आहोत ...
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Sat, 02/06/2021 - 04:41
नवीन
त्यापेक्षा जास्त शक्यता रशियाच्या जवळ गेल्यास रशियाचे गुलाम व्हायची होती हे हंगेरी, चेकोस्लोव्हाकिया आणि पूर्व युरोपातील इतर देशांच्या अनुभवावरून लक्षात यायला हरकत नसावी.
भारतात ईस्ट इंडीया कंपनी व्यापारी म्हणून आली आणि नंतर तेच ब्रिटिश भारतात राज्यकर्ते बनले त्यामुळे नेहरूंना परदेशांशी व्यापार आणि परदेशी भांडवल या दोन्ही गोष्टींचे वावडे होते. कदाचित त्या काळाची मानसिकता म्हणून तसे करणे गरजेचे होते असे समजून घेतले तरी नंतरच्या काळात काय कारण होते? नेहरूंच्या काळात सगळ्या गोष्टींची टंचाई होती म्हणून लायसेन्स-कोटा राज ठेवणे गरजेचे होते असे मानले तरी नंतरच्या काळात हळूहळू ती टंचाई कमी होत गेली होती. मग इंदिरा गांधींच्या काळात अर्थव्यवस्था खुली करायला हरकत नव्हती. हे मी म्हणत नाही तर हिंदुस्तान युनिलिव्हरचे माजी सी.ई.ओ गुरचरण दास यांनी इंडिया अनबाऊंड या पुस्तकात लिहिले आहे. पण कुठचे काय. अर्थव्यवस्था खुली करणे दूरच राहिले इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचे अतोनात नुकसान करून ठेवले. इंदिरा इतकेच करून थांबल्या नाहीत तर कोळसावगैरे इतर अनेक उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले आणि आणखी नुकसान करून ठेवले.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 02/06/2021 - 04:48
नवीन
हे दोन्ही मुद्दे, माझ्या दृष्टीने योग्य होते....
बॅन्का खाजगी असतील तर, आर्थिक घोटाळे होण्याची शक्यता वाढते ...
खनिज संपदा, ही सरकारी अखत्यारीतच हवी ... युरेनियम, सोने, तेल, इत्यादी सगळ्यांवर सरकारी अंकूश आणि मालकी हवीच...
मला इंदिरा गांधी यांचे काही निर्णय अजिबात पटले नाहीत, पण हे दोन्ही निर्णय आवडले ...
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Sat, 02/06/2021 - 05:02
नवीन
म्हणजे सरकारी बँकांमध्ये घोटाळे व्हायची शक्यता कमी असते असे म्हणायचे आहे का? स्वतः मोदींनी लोकसभेत युपीए काळातील फोन बँकिंगचा उल्लेख केला तो अर्थमंत्रालयातून सरकारी बँकांना अमुक एका उद्योगाला कर्ज द्या म्हणून फोन जायचे त्या संदर्भात होता. इंदिरांच्या काळातच संजयच्या मारूती उद्योगला सरकारी बँकांनी कशी कर्जे दिली हे स्पष्टच आहे. त्याबद्दल प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आर.बी.आय गव्हर्नरना (मला वाटते जगन्नाथन की असे काहीतरी नाव होते त्यांचे) पदावरून काढण्यात आले. २०१७ मध्ये सरकारने या सगळ्या बँकांमध्ये २.१ लाख कोटी आणि २०१९ च्या बजेटमध्ये आणखी ७० हजार कोटी टाकले होते. त्यापूर्वी असेच करदात्यांचे हजारो कोटी रूपये त्यात ओतले जात आले आहेत. घोटाळ्यांविरूध्द आर.बी.आय चे सुपरव्हिजन कडक पाहिजे- खाजगी किंवा सरकारी बँका याचा काही संबंध नाही.
समांतर उदाहरण- नेहरूंच्या काळात सुरवातीला विमा कंपन्या खाजगी होत्या. अशाच एका खाजगी विमा कंपनीत रामकृष्ण दालमियांनी मनी लाँडरींग केले हा मुद्दा फिरोज गांधींनी लोकसभेत मांडला. त्याला उत्तर म्हणून नेहरूंनी विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करून एल.आय.सी ची स्थापना केली. एल.आय.सी मध्ये घोटाळे झाले नाहीत असे आहे का? एल.आय.सी ची स्थापना झाल्यानंतर वर्षभरातच हरिदास मुंधरांच्या कंपनींचे शेअर्स एल.आय.सी ने त्या शेअर्सची बी.एस.ई वर जी किंमत चालू होती त्यापेक्षा जास्त दराने विकत घेतले होते. कारण काय तर हरिदास मुंधरांची अर्थमंत्री टी.टी.कृष्णम्माचारी यांच्याशी जवळीक होती. त्यातून नंतर अर्थमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता (आणि आपण ज्या लालबहादूर शास्त्रींना सार्वजनिक जीवनातील शुचितेचे आदर्श मानतो त्यांनीच कृष्णम्माचारींना मंत्रीमंडळात परत घेतले होते). असो. मुद्दा तो नाही. मुद्दा हा की खाजगी कंपनीत घोटाळा झाला म्हणून नेहरूंनी सगळ्या विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले. आता या सरकारी कंपनीत घोटाळा झाल्यावर नेहरू काय करणार होते? आंतरराष्ट्रीयीकरण? आणि एका खाजगी कंपनीत घोटाळा झाला म्हणून सगळ्या उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करायचे? सत्यम कॉम्प्युटर्समध्ये घोटाळा झाला म्हणून इन्फोसिस, विप्रो, टीसीएस सगळ्यांचे राष्ट्रीयीकरण करून टाकायचे? ही सरकारी दादागिरी म्हणजे दरोडेखोरी नाहीतर काय आहे?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 02/06/2021 - 05:14
नवीन
शक्यता वाढते,
तुमची दोन्ही उदाहरणे पटली ... त्यामुळे ती गोष्ट सांगत नाही ...
बॅन्कांचे राष्ट्रीयकरण होऊन देखील, हर्षद मेहताने घोटाळा केलाच की, विजय मल्ल्याने पण केला ...
पण, हेच खाजगी बॅन्का असत्या तर, जास्तच घोटाळा झाला असता.. हर्षद मेहताच्या काळात, कराड बॅन्क तर, पुर्ण बुडाली ... पेण अर्बन बॅन्क, हे सध्याचे ताजे उदाहरण ...
आर्थिक घोटाळे करणे,हा फार पुर्वी पासूनचा धंदा आहे ... सरकारी अखत्यारीत असतील तर, थोडा फार अंकूश नक्कीच लागू शकतो...
सत्यम काम्प्युटरचे उदाहरण पटले.....
- Log in or register to post comments
स
साहना
Sat, 02/06/2021 - 09:54
नवीन
> बॅन्का खाजगी असतील तर, आर्थिक घोटाळे होण्याची शक्यता वाढते ...
घोटाळे कोण करतो आणि कोण त्याचा भुर्दंड भरतो हे महत्वाचे आहे. सरकारी बँकांतील गोंधळ गुपचूप लपवला जातो, भारत सरकार करदात्यांचे पैसे भरून सरकारी बँक वाचवते.
ह्या उलट खाजगी बँक आहेत. इथे धांदली झाली तर बँकांचे समभागधारकांचा पैसा बुडतो त्यामुळे चांगल्या चालणाऱ्या बँकात लोक जास्त पैसे गुंतवतात आणि त्यावरून कुठली बँक चांगली चालत आहे हे समजते. बँकांना इन्शुरन्स असल्याने खाजगी असो वा सरकारी बँक ग्राहकांचे पैसा चुकून कधी बुडतात.
पण बहुतेक बँका सरकारी अधिपत्याखाली असल्या कि त्यांचा कामचुकारपणा वाढतो, कर्जे चुकीच्या गोष्टींना दिली जातात आणि त्याचे डॉमिनो एफकेत सर्वत्र पसरतात. अनेक बँकांना सरकार जबरदस्तीने शेतकऱ्यांना कर्जे देण्यास भाग पडते. हाच पैसा नाहीतर इतर जास्त फायदेशीर गोष्टीं गुंतवणूक म्हणून गेला असतात. शेतकरी मग कर्ज बुडवतो आणि करदाते मग त्याची भरपाई करतात.
खनिज उद्योगाचे सुद्धा तसेच आहे. इथे सरकारी रेग्युलेशन आवश्यक आहे पण मालकी आवश्यक अजिबात नाही. अरुण शौरी ह्यांनी अनेक धंद्यांचे खाजगीकरण केले त्यांत अल्युमिनियम खनिजाची सुद्धा एक कंपनी होती. खाजगी करण होतंच कंपनीची उत्पादन क्षमता १० पटीने वाढली आणि पगार तिप्पट झाले.
कोळश्याच्या साठ्यांत भारत ५ व्या नंबरवर आहे आणि तरीसुद्धा भारत चक्क कोळसा आयात करतो. ह्याच्याइतकी नामुष्की नाही. कोळसा ह्या इंधनाचे दिवस संपले आहेत. बहुतेक राष्ट्रे वेगाने इतर ऊर्जास्रोतांकडे बघत आहेत. २०२० मध्ये मोदी सरकारने कोळश्याच्या खाणी खाजगी करण्याचा प्रयत्न केला पण ह्या धंद्याला भविष्य नसल्याने कुणीही रस दाखविला नाही. हेच ३० वर्षे मागे केले असते तर प्रमाणात कोळसा निर्यात करून भारताने एन्व्हाना बऱ्यापैकी पैसे निर्माण केले असते.
कोळसा महत्वाचा आहे म्हणून भारत सरकारने कोळश्याच्या खाणकामावर आणि निर्यातीवर अनेक बंधने घातली. परिणामतः भारतातील कोळशाचे उत्पादन खूपच कमी झाले. आज परिस्थिती अशी आहे कि भारतांत कोळसा भरपूर आहे पण त्याचा उपयोग नाही. कोळसा कमी वापरावा म्हणून सर्व जग प्रयत्न करत आहे आणि भारतातील खाणीत असलेला प्रचंड कोळसा विनावापर तसाच राहील असे वाटते. मागील ५० वर्षांत भारत किमान ४०० अब्ज डॉलर्स चा कोळसा सहज विकू शकला असता.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 02/03/2021 - 07:50
नवीन
डी आर डी ओ या सरकारी संस्थेने क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्तम केली होती. अग्नी आणि पृथ्वी या दोन क्षेपणास्त्रांचा विकास केला त्या वेळेस डॉ अब्दुल कलाम हे त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी हुशार आणि कल्पक अशा अभियंत्यांना भराभर बढती आणि पगारवाढ देऊन उत्तम काम करण्यास उद्युक्त केले आणि हा प्रकल्प आश्चर्यकारक रीतीने पुढे गेला होता.
यानंतर डॉ अब्दुल कलाम याना अणुबॉम्ब प्रकल्पावर नेल्यावर त्याच खात्यातील दुद्धचार्यानी आणि त्यांचे मायबाप असणाऱ्या संरक्षण मंत्रालयातील खाबू बाबूंनी या तरुण आणि हुशार अभियंत्यांची मुस्कटदाबी केली. यामुळे निराश झालेल्या या अभियंत्यांनी राजीनामा दिला. या हुशार लोकांना रेथीऑन, जनरल डायनॅमिक्स, नॉर्थरोप, ग्रमन सारखया अमेरिकी कंपन्यांनी आपल्या बंगलोर मधील कार्यालयात नोकऱ्या दिल्या( बरेच अभियंते सुरुवातीस अमेरिकेत जाण्यास तयार नव्हते पण शेवटी खात्यात मिळणाऱ्या वागणुकीमुळे वैफल्य आणि नैराश्य आले) आणि काही कालावधी नंतर त्यांना भरपूर पगार आणि नागरिकत्वाचे आमिष देऊन उचलून अमेरिकेत नेले. यामुळे देश आपल्या या अतिशय हुशार आणि देश प्रेमी लोकांना मुकला.
यानंतर झरीतील शुक्राचार्य असलेल्या काँग्रेसच्या सरकारात असणाऱ्या राजकारणी आणि बाबू लोकांनी आपला प्रकल्प आस्ते कदम कसा चालेल याची सर्वतोपरी काळजी घेतली.(म्हणजे जास्तीत जास्त आयात करता येईल आणि आपल्याला मलिदा खाता येईल) यात प्रकल्पाला होणारा वित्त पुरवठा कमी करण्यापासून ते महत्त्वाचे सुटे भाग आयात करण्यावर निर्बंध घालण्यापर्यंत सर्व तर्हेचे काड्या घालण्याचे काम येते.
हीच स्थिती तेजस या भारतीय विमानाची आहे.
मोदी सरकार आल्यावर या सरकारी कुरणावर चरणाऱ्या बोकडांची तोंडे बंद करण्यात आली.
जर अणुऊर्जा आणि अवकाश क्षेत्रात भारत इतका पुढे जाऊ शकतो तर इतर क्षेत्रात का नाही याचे उत्तर इथे आहे. अवकाश आणि अणुऊर्जा येथे कोणीही देश तुम्हाला तंत्रज्ञान विकत नाही त्यामुळे आपल्या शास्त्रज्ञांना हे तंत्रज्ञान इथेच विकास करायला लागले आणि त्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली आहे.
गेल्या ५-६ वर्षात संरक्षण क्षेत्रात भारताने एवढी भरारी का आणि कशी मारली याचे कारण आता आपल्याला समजेल. श्री मोदी यांनी शक्यतो बाहेरून आयात करण्याच्या सामग्री वर बंधने आणली आणि सर्व संरक्षण प्रकल्पातील दलाल आणि अडते याना फाटा मारला. राफेल बद्दल ठणाणा होण्यामागे हे एक फार महत्त्वाचे कारण आहे.
भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात आकाश, नाग, LRSAM, ब्राह्मोस सारखी क्षेपणास्त्रे आणि तेजस हे विमान याना मोठा पाठिंबा दिल्यामुळे गेल्या काही वर्षात भारताने या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/03/2021 - 08:45
नवीन
मोदी जर असे, देशाचे संरक्षण करण्याचे प्रयत्न करत असतील तर, मोदी द्वेष करणार्यांचे काय होणार?
देशाच्या संरक्षणा पेक्षा, मोदीद्वेष जास्त महत्वाचा, असे मानणारी पण काही मंडळी असू शकतात ....
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Wed, 02/03/2021 - 09:49
नवीन
ती माणसे पाहिजेतच.
त्याच्यामुळे कितीतरी खरी माहिती इथल्या टेबलावर येत असते.
राजेशभाऊना मी कितीतरी वेळेस त्यासाठी दुवा देत असतो.
मोदी द्वेष संपला की मोदी संपले
:-)))
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/03/2021 - 12:22
नवीन
सहमत आहे
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Wed, 02/03/2021 - 13:21
नवीन
😄
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 02/03/2021 - 20:47
नवीन
बरोबर आहे. त्याशिवाय आपल्या अकलेचे तारे तोडून हि मंडळी आपण किती मूर्ख आणि द्वेषी आहोत हे सतत दाखवून देत असतात. मोदींची लोकप्रियता हि मोदींच्या कतृत्वापेक्षा ह्या लोकांच्या दळभद्री वागणुकीने जास्त वाढली आहे.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
गुरुवार, 02/04/2021 - 04:44
नवीन
🎯
फक्त गेली २० वर्षे या गोष्टीचा मोदी वापर करून घेत आहेत हे मोदींचे वैशिष्ट्य.
आपला वापर करून घेतला जात आहे याचा संशय येऊ न देणे हे मोदींचे कतृत्व.
😀
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 02/03/2021 - 19:49
नवीन
विद्यार्थी दशेंत असताना मी भारतीय सैन्याच्या आर्मी टेकनॉलॉजि बोर्ड साठी काम केले होते. एक निमित्ताने मेरठ, देवळाली आणि त्यानंतर लदाख इथे आमच्या प्रकल्पाचे टेस्टिंग केले होते. ब्रिगेडियर महोदय आमच्या लॅब चे माजी विद्यार्थी होते त्यामुळे अतिशय उघड पणे बोलायचे.
DRDO एक अत्यंत भ्रष्ट आणि कामचुकार संस्था आहे. मिलिटरी ला फक्त क्षेपणास्त्रे हवी असतात असे नाही अनेक छोट्या गोष्टी सुद्धा हव्या असतात उदाहरणार्थ चांगल्या दर्जाचे बूट, सॉक्स, थर्मामीटर इत्यादी. प्रोजेक्ट १०० कोटी पेक्षा कमी असला तर DRDO ला त्यांत काहीही रस नसतो. त्यामुळे आर्मीने कितीही विनंत्या केल्या तरी त्यावरचे काम होत नाही. मग आर्मी टेकनॉलॉजि बोर्ड ची निर्मिती झाली. IIT ला प्रकल्प द्यायचा तर टेंडर वगैरेचे गरज नाही त्यामुळे बहुतेक काम IIT कडे यायचे. मी ज्या प्रकल्पावर काम करायचे ती गोष्ट अमेरिकेत अमेझॉन वर $१० ला मिळते. चंदीगड मध्ये एक कंपनी आहे तीच हि गोष्ट निर्माण करून अमेरिकेत विकते. पण आर्मी त्या कंपनीकडून ह्या गोष्टी घ्यायला घाबरते कारण खाजगी कंपनी असल्याने काम कितीही चोख केले तरी कुणी ना कुणी भ्रष्टचाराचा आरोप करेल आणि मग तपासाचा ससेमिरा मागे लागेल हि भीती असते. त्यामुळे हि गोष्ट आर्मी एका दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत एका डेनिश कंपनीकडून आयात करत होती. ह्याचा खर्च आर्मीला प्रति आयटम सुमारे $६०० होत होता.
DRDO ने २० वर्षे ह्या प्रकल्पावर काम करून काहीही निर्माण केले नव्हते. आमच्या IIT मधील टीम ने ३ वर्षांत करून दाखवले. खरे तर ६ महिन्यात काम झाले होते पण आर्मी टेस्टिंग करायला २.५ वर्षे लागली.
मागील अनेक वर्षे DRDO हि भ्रष्टाचाराची बजबजपुरी बनली आहे. येथील सर्वांत मोठे डिपार्टमेंट ह्यांची लायब्ररी आहे आणि डोझनवारी क्लार्क इथे कामाला आहेत कारण प्रत्येक नवीन मंत्री आपल्या लोकांना ह्या नोकरीवर चिकटवतो. भारत गरीब असला तरी DRDO चे वार्षिक बजेट जवळ जवळ अमेरिकेच्या DARPA इतकेच आहे.
मग अग्नी किंवा नाग मिसायल्स कशी बनवली जातात हा एक प्रश्न आहे.
धोब्याचे प्रेत घराबाहेर काढले असताना ध्याब्याकडे खरे कपडे काय होते हे गावाला कळते अश्या अर्थाची एक म्हण गोव्यांत आहे. माझ्या मते DRDO च्या क्षेपणास्त्राचे सुद्धा तेच आहे. युद्धांत हि खरोखर चालतील तेंव्हा त्यांची स्तुती करायची त्याआधी त्यांना सारिटीफिकेट देऊन फायदा नाही.
अब्दुल कलाम सारखे धडाडीचे नेते फार कमी आढळून येतात, आले तरी हे सरकारी खात्यांत काम करतील ह्याची शक्यता कमीच असते. अनेकदा असे नेते DRDO च्या विविध नियमांना फाट्यावर मारून वेगाने काम करतात आणि त्यासाठी अत्यंत बुद्धिवान अश्या लोकांची मदत कधी कधी DRDO च्या कक्षेच्या बाहेर घेतात. उदाहरण म्हणजे काही एम्बइडेड सिस्टम्स DRDO च्या क्षमतेच्या पलीकडील होत्या, अश्या सिस्टम्स मग IISC, IIT ह्यांच्या Phd विद्यार्थ्यांना ह्यांना देण्यात आल्या, हे विद्यारथी हुशार तसेच phd च्या मागे असल्याने त्यांनी त्या डिसाईन करून दाखवल्या. हे विद्यार्थी मग अमेरिकेत गेले पण DRDO चा फायदा झाला. वेळ वाया गेला तरी काम शेवटी झाले. तरी सुद्धा भारतीय क्षेपणास्त्रांतील तंत्रज्ञान बऱ्यापैकी जुनाट आहे. अर्थांत आम्हाला पाकिस्तान बरोबर युद्ध करायचे असल्याने त्यांच्यापेक्षा थोडे जास्त चांगले असले कि झाले.
विविध क्षेपणास्त्रांचे काम अधिक वेगाने झाले असते आणि जास्त अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आम्ही बनवू शकलो असतो पण इथे भारत सरकारचे आडमुठे धोरण पुन्हा एकदा आडवे येते. नॉन टच थर्मामीटर मध्ये IR सेन्सर असतो. ह्या सेन्सरने आपण गरम गोष्टी आणि थंड गोष्टी ओळखू शकतो. ह्या प्रकारच्या काही सेन्सर च्या आयातीवर भारत सरकारने पूर्ण पणे बंदी घातली होती. सेन्सर्स बेकायदेशीर पणे ४ पट किंमत दिल्यास लॅमिंग्टन रॉड वर उपलब्ध होते पण आम्ही त्यांचा उपयोग आमच्या प्रोजेक्ट मध्ये करू शकत नाही. बंदी का ? तर म्हणजे हिट सीकिंग मिसाईल बनवली जाऊ शकतात. अर्थांत बनवणारा अतिरेकी काही इम्पोर्ट लायसन्स मागायला जाणार नाही लॅमिंग्टन रोड वर ४क्स किंमत देऊन घेईलच. त्याच प्रमाणे विविध प्रकारचे रेडिओ
हीच गोष्ट शेकडो इलेकट्रोनिक कंपोनेंट ची आहे. ह्यांच्यावर भारतात संपूर्ण आयात बंदी आहे त्यामुळे IIT वगैरे ह्या विषयांत जास्त रिसर्च करू शकत नाहीत. रिसर्च साठी विशेष परवानगी घेऊन आयात करायची सोया आहे पण ती परवानगी मिळेल पर्यंत विद्यार्थी पास होऊन गेलेले असतात. DRDO ला काहीही पडून गेलेले नसते. ते आपले कूर्मगतीने आप्तस्वकीयांना नोकरीची सोया करत प्रगती करतात.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 02/04/2021 - 05:11
नवीन
भारतीय क्षेपणास्त्रांतील तंत्रज्ञान बऱ्यापैकी जुनाट आहे
बाकी भ्रष्टाचार इ वर मी काही बोलणार नाही परंतु आपली माहिती बरीच जुनी आहे.
उदा भारतीय क्षेपणास्त्रांतील तंत्रज्ञान बऱ्यापैकी जुनाट आहे.
BrahMos is the world's fastest anti-ship cruise missile in operation.
भारताने पाच अणुस्फोट केले ते काही दिवाळीसाठी नव्हते. अग्नी आणि पृथ्वी या क्षेपणास्त्रातुन डागता येणाऱ्या अणुबॉंब ची प्रतिरूपे होती. उगाच का पाश्च्यात्य राष्ट्र्रानी तुमच्यावर निर्बंध टाकले. त्यांची मक्तेदारी संपली याचे ते प्रतीक होते.
पृथ्वी आणि अग्नी ही आजमितीला जगातील सर्वात स्वस्त क्षेपणास्त्र म्हणता येईल अशी आहेत ३ आणि ५ कोटी रुपये फक्त किंमत आहे. याच्या तुलनेत पाश्चात्य क्षेपणास्त्रे हि ५० ते १०० पट महाग आहेत.
लष्करात सामील झाल्यापासून त्यांच्या दोन्ही च्या कमीत कमी ३० ते ४० चाचण्या झाल्याआहेत. इतक्या सफल चाचण्यानंतर हि युद्धात खरोखर चालतील का असा प्रश्न विचारणे म्हणजे एकतर आपला पूर्वग्रह आहे किंवा अज्ञान आहे.
इतर सुद्धा अनेक प्रणाल्या आहेत ज्या बऱ्यापैकी अत्याधुनिक आहेत. अर्थात कोणत्तेही पाश्चात्य माध्यम त्यांचे कौतुक करणार नाही कारण त्यामुळे आपले साहित्य चौपट किमतीने कसे विकता येईल आणि आपल्या एकंदर प्रतिसादात हा कल(bias) दिसून येतो.
बाकी एकंदर आय आय टी चे भारतात फार मोठे स्तोम माजवले गेले आहे त्याचा पण आपल्या प्रतिसादात उल्लेख दिसतोच आहे. भारताची बुद्धिमत्ता हि काही एकाच संस्थेची बटीक नाही.
इसरो किंवा अणुऊर्जा आयोगात आय आय टी चे विद्यार्थी नसताना सुद्धा त्यांनी एवढे मोठे कार्य कसे केले? डॉ अब्दुल कलाम हे सुद्धा आय आय टी चे नाहीत.
पेनुकोंडा किंवा तिरुतुराई पुंडी गावातील प्राथमिक शिक्षकाचा मुलगा अत्यंत हुशार असला तरी तो तेलगू किंवा तामिळ माध्यमात जिप च्या शाळेत शिकतो त्याला आय आय टी चे कोचिंग परवडत नाही पण हुशारीमुळे विजयवाडा किंवा तिरुनेलवेली च्या सरकारी अभि यांत्रिकी महाविद्यालयात शिकतो आणि बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे सुरक्षित अशा सरकारी नोकरीत येतो. केवळ फर्डे इंग्रजी येत नाही किंवा आय आय टी चा नाही म्हणून तो हुशार नाही हा प्रचंड गैरसमज सुशिक्षित लोकांमध्ये पसरलेला आहे. अशा अनेक अबोल पण प्रचंड हुशार विद्यार्थ्यांनी तांत्रिक बाबतीत फार मोठ्या प्रमाणात काम केले आहे, त्यांना या बाबूंनी खाबूशाहीच्या शृंखलातून आणि आय आय टी, IISc चे नसल्याच्या मानसिक शृंखलातून मुक्त करणे आवश्यक आहे.
आपल्या देशातील डॉक्टर काही आय आय टी, IISc चे नाहीत पण आज जागतिक स्तरावर त्यांचे कार्य अत्यंत स्पृहणीय आहे.
किंवा वाणिज्य क्षेत्रात सीए कंपनी सेक्रेटरी कायदा क्षेत्रात यात कार्यरत लोक काही आय आय टी, IISc चे नाहीत.
या लोकांनी अशा अहंगंडातून बाहेर येणे आवश्यक आहे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 02/04/2021 - 05:18
नवीन
खरे नी अगदी योग्य मत मांडले आहे त्यांच्या मताशी पूर्ण सहमत.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 02/04/2021 - 05:19
नवीन
माझा एक मित्र, संरक्षण दलात कामाला आहे...
त्याच्या मते, DRDO, HAL, मध्ये, हे सरकार आल्यापासून, बरेचसे सकारात्मक निर्णय घेतल्या गेले आहेत....
नेहरूंनी केलेल्या चुकीचे परिणाम, नेहरू संरक्षणदलच बरखास्त करायला निघाले होते, निस्तरायला वेळ हा लागणारच ....
- Log in or register to post comments
स
साहना
गुरुवार, 02/04/2021 - 06:44
नवीन
> इसरो किंवा अणुऊर्जा आयोगात आय आय टी चे विद्यार्थी नसताना सुद्धा त्यांनी एवढे मोठे कार्य कसे केले? डॉ अब्दुल कलाम हे सुद्धा आय आय टी चे नाहीत.
आय आय टी किंवा आय आय इस ह्यांचा उललेख निव्वळ उदाहरणादाखल होता. आर्मी टेकनॉलॉजि बोर्ड च्या गाईडलाईन नुसार IIT/IISc ला काँट्रॅक्त्त देताना त्यांना ५ कोटीपर्यंतच्या प्रोजेक्ट ना टेंडर इत्यादी लागत नाही. त्यामुळे बहुतेक वेळा ह्यांना प्राधान्य दिले जाते.
क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाविषयी मी अज्ञ आहे. जी माहिती इतर आर्मी मंडळी कडून मिळाली त्यावरच मी बोलू शकते.
- Log in or register to post comments
म
मामाजी
गुरुवार, 02/04/2021 - 08:45
नवीन
डॉ.. प्रदिप कुरूलकर, DRDO मधे आकाश मिसाईल सिस्टीम मधे कार्यरत असलेले एक तंत्रज्ञ यांनी दिलेल्या दोन व्याख्यानांची लिंक देत आहे..
१ https://youtu.be/55JHly1mZHY
२ https://youtu.be/PMTldASc1pc
- Log in or register to post comments
ज
जिन्क्स
Fri, 02/05/2021 - 09:37
नवीन
उत्तम आणि माहितीपुर्ण प्रतिसाद
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 02/03/2021 - 12:47
नवीन
मस्त लेख. खूपच आवडला.
या लेखात उल्लेख असलेला मिल्टन फ्रीडमन यांचा व्हिडिओ त्यांच्या 'फ्री टू चूज' या १० भागातील सिरीजवरील आहे. ही सिरीज १९८० मध्ये अमेरिकेत टिव्हीवर दाखवली गेली. मुळात ही सिरीज त्याच नावाच्या पुस्तकावर आधारीत आहे. कोणत्याही देशाने बाकी काही नाही पण या पुस्तकात दिलेली त्रिसुत्री- सरकारी उद्योगांचे खाजगीकरण, करकपात आणि फ्री ट्रेड अंमलात आणली तरी त्या देशाची अर्थव्यवस्था भरारी घेऊ शकते हे इस्टोनियाचे माजी पंतप्रधान मार्ट लार यांनी दाखवून दिले. १९९२ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी ते पंतप्रधान बनले तेव्हा सोव्हिएट रशियातून फुटल्यानंतर असलेल्या परिस्थितीचा आणि सोव्हिएटकालीन प्लॅन्ड इकॉनॉमी आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी गाळात गेलेली अर्थव्यवस्था याचा सामना त्यांना करावा लागला. मुख्य म्हणजे पंतप्रधान मार्ट लार यांना अर्थशास्त्रातील काहीही कळत नव्हते. त्यांनी फक्त फ्रीडमनसाहेबांच्या पुस्तकातील सूत्रे अंमलात आणली आणि त्यातून इस्टोनियाची अर्थव्यवस्था काही वर्षातच उत्तर युरोपातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था झाली.
सोव्हिएटकाळात इतकी वाट लागली होती की त्यामुळे मार्ट लारना ही पावले उचलायला फार विरोध झाला नाही. पण इतर देशात तशी परिस्थिती नाही. त्यातूनही वाईट म्हणजे ज्या भांडवलशाही धोरणांमुळे अमेरिका-युरोपात समृध्दी आली हे विसरून गेल्या काही वर्षांत त्यांना समाजवाद किती चांगला हे भिकेचे डोहाळे लागले आहेत. त्यातूनच बर्नी सँडर्स, एओसीसारखे तद्दन गुडघ्यातले राजकारणी इतकी लोकप्रियता मिळवू शकले. अॅडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जॉन स्टुअर्ट मिल वगैरे महारथींच्या देशात इंग्लंडमध्येही समाजवादी धोरणांचे प्राबल्य आहे. ज्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये फ्रेडरीक हायेकसाहेबांसारखे प्रोफेसर होते तिथेच नंतर हॅरॉल्ड लास्कीसारखे गंडलेले लोक प्रोफेसर झाले आणि आता ते विद्यापीठ तर समाजवाद्यांचा गड मानला जाते- इतके की हार्वर्ड-बर्कले त्यापुढे फिके पडेल. अमेरिकेतल्या डेमॉक्रॅटिक पक्षाचे तर काही विचारूच नका. रिपब्लिकन पक्षाच्या आणखी दुसर्या तर्हा. मागे कुठेतरी वाचले होते त्याप्रमाणे Tough times lead to great leaders, great leaders bring good policies, good policies lead to good time and good time leads to bad leaders यातील चौथ्या फेजमध्ये अमेरिका आहे असे दिसते. आपल्याकडे कायमच टफ टाईम असूनही (आर्थिक बाबतीत) ग्रेट लीडर मात्र झालेच नाहीत.
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 02/03/2021 - 20:46
नवीन
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 02/03/2021 - 12:48
नवीन
राजकीय पक्षांनी सैन्य दल,लष्करी व्यवस्था ह्याचा वापर राजकीय फायद्या साठी करूच नये ते भविष्यात महागात पडेल.
लष्कर हे राजकारण पासून अलिप्त च हवे.
अगदी देश अंतर्गत शांतता राखण्यासाठी सुद्धा लष्कराचा वापर बाकी असे ज्ञानी लोक सांगतात त्याला काही तरी कारण आहे.
फायटर विमान,सैन्य कारवाई,आणि अशा गोष्टी चे राजकीय भांडवल नको.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 02/04/2021 - 03:16
नवीन
आपल्या परमपूज्य कॉंग्रेसच्याच काळात झाला होता ...
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 02/03/2021 - 22:52
नवीन
खादी आणि हातमाग.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
गुरुवार, 02/04/2021 - 04:38
नवीन
😀
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 02/04/2021 - 09:14
नवीन
धोटा = स्पिंडल.
- Log in or register to post comments
क
काळे मांजर
Wed, 02/10/2021 - 11:44
नवीन
आमच्या आजा व बा चे यंत्रमाग होते
त्यांच्यासाठी
https://youtu.be/BW3z_U_uTxQ
- Log in or register to post comments
क
काळे मांजर
Wed, 02/10/2021 - 14:53
नवीन
हातमाग यंत्रमाग आऊटडेटेड झाले
आता सगळ्यांना प्रिंटेड कपडे आवडतात , त्यात डिझाइन्स भरपूर असतात , साड्या , धोत्रे , चादरी असे मोठे आयताकार असतात , त्यांना युनिक प्रोडक्शन म्हणून माग वापरतात
--------
कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम
एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी, जानकीचा नाथ
राजा घनश्याम
दास रामनामी रंगे, राम होई दास
एक एक धागा गुंते, रूप ये पटास
राजा घनश्याम
विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम
गुप्त होई राम
हळू हळू उघडी डोळे, पाही तो कबीर
विणोनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम
त्या वस्त्रोद्योगाचे असेच झाले , धोतर , नऊवारी वापरणारे खपले , तसे मग 16 चे 8 , 8 चे 4 करून एक दिवस माग मोडीत गेले
आणि मग शेला विणून राम गायब झाला तसे माग , मागवाले , कामगार , कांड्या भरणारे , बीम वहीफणी करणारे , माग दुरुस्त करणारे जॉबर हेही लोक गायब झाले
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2