Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आज काय घडले... पौष शु. १३ केशवस्वामींचे निधन !

A
Ashutosh badave
गुरुवार, 01/28/2021 - 12:23
केशव स्वामी शके १६०४ च्या पौष शु. १३ रोजी समर्थपंचायतनांतील प्रसिद्ध सत्पुरुष भागानगरकर केशवस्वामी हे समाधिस्थ झाले! महाराष्ट्रांतील संतांत तीन पंचायतने प्रसिद्ध आहेत. निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई व चांगदेव हे ज्ञानेश्वर-पंचायतन, एकाजनार्दन, रामजनार्दन, जनीजनार्दन, विठा रेणुकानंद व दासोपंत हे एकनाथ-पंचायतन व रामदास, जयरामस्वामी, रंगनाथस्वाभी, केशवस्वामी व आनंदमूर्ति हे रामदास-पंचायतन. या शेवटच्या पंचायतनांतील केशवस्वामीखेरीज इतर सर्व संत सातारा प्रांतांत शेजारीशेजारी राहत असत, त्यामुळे त्यांच्या वारंवार गांठी-भेटी होत असत; परंतु केशवस्वामींचे वास्तव्य मात्र हैद्राबादेस असे. केशवस्वामी मूळचे मराठवाड्यातील कल्याणीचे. आत्मारामपंत कुलकर्णी व गंगाबाई या सच्छील दांपत्याच्या पोर्टी केशवस्वामींचा जन्म झाला. असे सांगतात की, केशवस्वामी वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोलतच नव्हते. परंतु पुढे श्रीमत् शंकराचार्य यांच्या कृपेवरून केशवस्वामी बोलू लागले. समर्थांप्रमाणे यांनाहि गाण्याची अत्यंत आवड होती. केशवस्वामी 'स्वामी' असले तरी प्रपंची होते. ते व त्यांची पत्नी नेहमी भगवद्भक्तीत दंग असत. जनतेत धर्मश्रद्धा निर्माण करण्यासाठी, हे स्वतः कविता रचून कीर्तने करीत.असत. त्यांच्या पद्यांतून वरवर शृंगाराची छटा असे. गीतगोविंदकते जयदेव कवि यांचेच अवतार म्हणूनहि लोक यांना समजत. यांच्या काव्याबद्दल राजाराम प्रासादी भक्तमंजरीमालेत म्हणतात, "जंग जाली कीर्ति । धन्य कृपाळु केशवमूर्ति । उद्धारावया यया जगतीं । जयदेव कवि अवतरला ।। पूर्वी शृंगार देवाचा । वर्णितां लाचावली वाचा । तोचि अभ्यास पडता साचा । अनुकार कवनाचा तोचि पै॥ अध्यात्मयुक्त शृंगारिक । भाषण जयाचे नेमक । जाहलें काव्य तेंचि चोख । प्रासादिक सकल जनां । केशवस्वामींची कविता श्री. नरहरशास्त्री खरशीकर यांनी प्रसिद्ध केली आहे. १ जानेवारी १६८३

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 698 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 17 hours ago
  • सुंदर !!
    5 days 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा