Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तुम्हे अल्फाजों मे..... २

व
विजुभाऊ
Wed, 01/27/2021 - 03:22
💬 3 प्रतिसाद
मी कॉफीचा कप घेऊन येतो आणि म्हणतो. मी का आलो माहिती आहे? काल फोनवर विसरलो होतो. हॅलो म्हणायचं. ते सांगायला.... आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........ ..................... चकोर शाह.
मागील दुवा http://misalpav.com/node/48162 माझ्या कडे बघताना तुझे डोळे विस्फारतात. तू एक दीर्घ श्वास घेतेस आणि हसत सुटतेस. तू म्हणजे ना अस्सा आहेस म्हणत लटक्या रागाने माझ्या पाठीत एक गुद्दा घालतेस. आणि हसता हसता रडायला लागतेस. एक बोट नाचवत "पुन्हा असं करू नकोस माझ्याशी . शप्पथ आहे तुला माझी.असं म्हणत बिनदिक्कत माझ्या शर्टच्या बाहीने डोळे पुसतेस. एरवी शर्टची इस्त्री जपणरा मी तुला ते खुशाल करू देतो. तुझं ते हाताचं बोट नाचवत शप्पथ आह माझी म्हणताना मला तू एकदम छोटी शाळकरी मुलगी वाटतेस. अगदी . दुसरी ब मधली. अशीच असशील ना तेंव्हा. भावंडांशी , वर्गातल्या मित्रमैत्रीणींशी अशीच भांडत असशील. स्वतः होऊन धरलेला अबोला मोडत असशील. चिमणीच्या दातांनी गोळ्या चॉकलेट तोडून एकमेकांना देत असशील. तुझं ते निरागस रूपडं पाहून मला आतून काहितरी एकदम गलबलून येतं . सलौना सा सजन है और मै हु. जिया मे इक अगन है और मै हु. तुम्हारे रूप की छाया मे सजन बडी ठंडी है और मै हु. येताना चौकात गजरे विकणारी ती छोटी मुलगी पुन्हा दिसते. तिच्याकडचे सगळे गजरे विकत घेतेस. या वेळेस कोणतीही घासगीस न करता. मला विचारायचं असतं काय करणार आहे इतक्या गजर्‍यांचं? मी मुकाट ,पैसे देतो. नुकत्याच घेतलेल्या माळेतून एक गजरा सोडवतेस आणि त्या गजरेवाल्या मुलीच्या डोक्यात अडकवतेस. त्या मुलीच्या चेहेर्‍यावर मघा तुझ्या चेहेर्‍यावर होतं तसं हसू पसरत जातं. हे हसू डबीत जपून ठेवता यायला पाहिजे. मोगर्‍याचा गजरा डो़क्यात माळायचा आनंद विकणार्‍या मुलीला तू तो आनंद घेऊ दिलास. आपण जे विकतो ते आपल्याला कधीच मिळत नाही. जे वाटतो ते मात्र आपल्याला भरभरून पुन्हा पुन्हा मिळत जातं. युं तो हम सबकी झोली ख्वाबों से भरी होती है हम गैरो के दिखाये ख्वाब खरीदने जाते है. अपनी झोली खाली कर आते है. ....*चकोर शाह*

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2279 views

💬 प्रतिसाद (3)
प
प्राची अश्विनी Wed, 01/27/2021 - 04:01 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
अ
असा मी असामी Tue, 02/23/2021 - 14:50 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/23/2021 - 17:46 नवीन
युं तो हम सबकी झोली ख्वाबों से भरी होती है हम गैरो के दिखाये ख्वाब खरीदने जाते है. वाह.. निव्वळ अप्रतिम..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 17 hours ago
  • सुंदर !!
    5 days 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा