Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आज काय घडले... पौष शु.९ पानपतच्या संग्रामानंतरची निरवानिरव !

A
Ashutosh badave
Mon, 01/25/2021 - 11:49
panipat शके १६८२ च्या पौष शु. ९ या दिवशी आदल्याच दिवशी पानिपतच्या भयंकर संहारांत पतन पावलेले यशवंतराव पवार, विश्वासराव, भाऊसाहेब, तुकोजी शिंदे, संताजी वाघ, आदि लोकांच्या शवांना अग्निसंस्कार देण्यात आले. पौष शु.८ ला भाऊसाहेब पडल्याची वार्ता रणांगणावर पसरतांच अनेकांनी पळ काढण्यास सुरुवात केल्यावर सर्वत्र पळापळ सुरू झाली; आणि जेत्यांनी एक प्रकारच्या आवेशाने पळणाऱ्यांची कत्तल केली. शेवटी दमून गेल्यानंतर कत्तल थांबली. दुसऱ्या दिवशी म्हणजे पौष शु. ९ ला १५ तारखेस मराठ्यांच्या छावणीत जे जिवंत सांपडले त्यांची पुन्हा अत्यंत क्रूरपणे कत्तल झाली. या दिवशी मोठमोठ्या मराठे सरदारांच्या प्रेतांचा शोध लावावा म्हणून शेषधर पंडित, गणेश पंडित इ. सदाशिवरावभाऊंच्या माहितीतील इसम बरोबर घेऊन स्वतः सुजाउद्दौला घोड्यावर बसून रणभूमीवर फिरत होता. एका ढिगाऱ्याखाली प्रेताच्या अंगावर तीनचार रत्ने चमकली म्हणून ते वर काढले. पायावरील व पाठीवरील जखमांचे वण पाहून तें सदाशिवरावांचे प्रेत होय असे समजून मंडळींनी त्यास अग्नि दिला. विश्वासरावांचे प्रेत पाहण्यास दुराणी लष्करांतून आबालवृद्ध जमले होते. पेशव्यांच्या घरांत विश्वासरावा एवढा सुंदर पुरुष झाला नव्हता. त्याचे शव पाहून अहमदशहा अब्दालीहि क्षणभर हळहळला! सुजाउद्दौलाचा सरदार उमरावगीर गोसावी याने तुकोजी शिंदे, संताजी वाघ, यशवंतराव पवार व विश्वासराव यांची प्रेते तीन लक्ष रुपयांना सोडवून आणून ब्राह्मणांकरवी त्यांना अग्नि दिला. भरतपूरच्या जाटानेंहि बहुत पैसा खर्च करून लोकांचे प्राण वाचविले. या पानिपतच्या युद्धांत मराठ्यांची एक सबंध पिढीच्या पिढी कापली गेली. चांदी, सोने, हिरे-माणके, पांचशे हत्ती, पन्नास हजार घोडे, एक हजार उंट इत्यादि पुष्कळच संपत्ति मराठ्यांच्या छावणीतून अब्दालीस मिळाली. -१५ जानेवारी १७६१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 806 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 17 hours ago
  • सुंदर !!
    5 days 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा