Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

सर्जेकोट किल्ला , सर्जेकोट बंदर , शिंपला बेट

व
व्लॉगर पाटील
Mon, 01/18/2021 - 05:29
💬 7
सर्जेकोट किल्ला , सर्जेकोट बंदर , शिंपला बेट तीन दिवसाच्या स्वर्गीय कोकणच्या रोडट्रीप मध्ये आज जातोय तिसऱ्या दिवसाच्या प्रवासावर, आज आम्ही जातोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ असलेल्या सर्जेकोट या गावात. मालवण पासून ९ किलोमीटर असलेलं हे गाव. तळाशील नदी आणि अरबी समुद्राच्यावर संगमावर असलेलं हे गाव . इथे १६६८ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सर्जेकोट किल्ला आहे तसेच सर्जेकोट बंदर , शिंपला बेट , कवडा बेट अशी ठिकाणे पाहायला मिळतात. सर्जेकोट किल्ला - छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६८ च्या दरम्यान सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी ३ किल्ले बांधले, राजकोट , पद्मदुर्ग आणि हा सर्जेकोट. मुख्यतः पावसाळयाच्या दिवसात किंवा जर वादळे आली तर जहाजांना मुक्कामासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. किल्याला मुख्य प्रवेश द्वार, चारही बाजूने तटबंदी , बुरुज आहेत. आत राजवाड्याचे अवशेष आणि त्याच्या तटबंदीवर पण बुरुज पाहायला मिळतात. वाड्यात एक जुने तुळशी वृंदावन, एक छोटी विहीर आणि तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यापण आहेत. सागरी किनारपट्टी असल्यामुळे इथे नारळाची बाग आहे आणि सोबतच भरपूर झाडे पण आहेत. सर्जेकोट बंदर - इथेच एक छोटंसं बंदर पण आहे. स्थानिक लोक याचा मच्छीमारी साठी उपयोग करतात. तसेच वॉटर स्पोर्ट साठी इथे एक क्लब आहे. ते लोक कवडा बेटा जवळ स्कुबा डायविंग साठी घेऊन जातात. शिंपला बेट - किनारपट्टीच्या जवळ च असलेलं शिंपला बेट. या बेटावर भरपूर प्रमाणात शिंपले आहेत त्यामुळेच या खडकाळ बेटाला शिंपला बेट म्हणतात. तसेच हि एक इथली विशेष जागा आहे कारण इथूनच आपणाला सर्जेकोट किल्ला, सर्जेकोट बंदर , तळाशील आणि समुद्राचा संगम , तळाशील बीच , तोंडिवली बीच , कवडा बेट , सुवर्ण कडा असा एक विहंगम दृश्य दिसते. या सगळ्या सोबतच इथल्या स्थानिक मच्छिमारासोबत गप्पा मारल्या , त्यांच्या मासेमारी आणि माशांची माहिती जाणून घेतली. अधिक माहिती साठी संपूर्ण विडिओ नक्की पहा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5201 views

💬 प्रतिसाद
म
मुक्त विहारि Mon, 01/18/2021 - 07:03 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
व्लॉगर पाटील Mon, 01/18/2021 - 12:48 नवीन
धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Mon, 01/18/2021 - 09:43 नवीन
तिसऱ्या दिवसाचीही भटकंती आवडली. व्हिडिओही छान .
  • Log in or register to post comments
व
व्लॉगर पाटील Mon, 01/18/2021 - 12:48 नवीन
धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 01/18/2021 - 16:19 नवीन
व्वा, एकदम भारी !

+१

  • Log in or register to post comments
व
व्लॉगर पाटील Mon, 01/18/2021 - 17:09 नवीन
धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 01/18/2021 - 20:22 नवीन
या सीरीज मधील भटकंतीच्या लिंक्स एकत्र द्यायला हव्या होत्या
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 56 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 57 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 3 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा