Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मिपा बालमित्रः धम्मालपंती.. २०२१

स
साहित्य संपादक
गुरुवार, 01/14/2021 - 08:42
🗣 14 प्रतिसाद

धम्मालपंती


नमस्कार मिपाकरहो, सगळ्यात आधी २०२१ हे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे आणि आरोग्यपूर्ण जावो, ही सदिच्छा! नवीन वर्षाची सुरुवात आपण एका अनोख्या उपक्रमाने करत आहोत आणि हा उपक्रम तुमच्या-आमच्यासाठी नसून आपल्या बच्चे कंपनीसाठी आहे! अगदी बरोबर! बालगोपालांसाठी आहे हा अनोखा उपक्रम, ज्याचं नाव आहे 'धम्मालपंती'! तुमच्या घरातील बच्चे कंपनी यात भाग घेणार आहे. लहान मुलं भन्नाट असतात, त्यांचं कल्पनाविश्वही भन्नाट असतं. शाळेच्या बाहेरच्या शाळेत मुलं खूप काही शिकत असतात, अनुकरण करत असतात. मुलांच्या बौद्धिक विकासासाठी फक्त पुस्तकंच नाही, तर चौफेर ज्ञान आवश्यक आहे. नवीन गोष्टी आत्मसात करण्याची, वेगवेगळ्या तऱ्हेने करून पाहण्याची त्यांची चौकस बुद्धी सध्याच्या स्पर्धेत आवश्यक आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्व होण्यासाठी याच तर गोष्टी आवश्यक असतात. या सगळ्यांतून मुलांमध्ये नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित होण्यास मदत होते. अर्थात ही मोठी प्रक्रिया आहे; पण त्याची सुरुवात विविध अ‍ॅक्टिव्हिटींमधून करण्यासाठीचा श्रीगणेशा पालकांकडून व्हावा, ही अपेक्षा आहे. ह्या उपक्रमात ५ ते १५ वयोगटातील मंडळी भाग घेऊ शकतील आणि सर्व सहभागी मंडळींना मिपातर्फे प्रशस्तिपत्र देण्यात येईल. तर मग वाट कसली पाहताय? लागा कामाला! तुमच्या बच्चे कंपनीमधले गुण - चित्रकला, निबंध, कविता, गोष्टी, कथाकथन, हस्तकला, नृत्य किंवा आणखी काही कला/कौशल्यं असतील, तर त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा. हा धागा खासम खास बालगोपालांसाठी आहे, त्यामुळे ह्या धाग्याची शान वेगळीच असणार आहे. आपण फक्त त्यांना त्यांची बाललीला इथे पाठवण्यासाठी मार्गदर्शन करायचं आहे, बाकी बच्चे अपने बाप होते है. तर रंगू द्या त्यांना त्यांच्याच रंगात, आपणही रंगू या आणि हा उपक्रम खूप यशस्वी करू या. तुमच्या प्रवेशिका साहित्य संपादकांना व्य.नि. अथवा ईमेलने पाठवू शकता. मुदत २६ जानेवारी २०२१!
टीप : हस्तकला, नृत्य, कथाकथन व्हिडिओद्वारे पाठवल्यास जास्त बहार येईल. (हस्तकला सचित्र आणि कथाकथन ऑडियो स्वरूपातही पाठवू शकता.)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7161 views

🗣 चर्चा (14)
त
तुषार काळभोर गुरुवार, 01/14/2021 - 09:09 नवीन
एकदम नावीन्यपूर्ण उपक्रम.
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 01/14/2021 - 09:11 नवीन
जाम मजा येणार आहे ह्या उपक्रमात ,आतुरतेने वाट पाहत आहे,सर्वांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 01/14/2021 - 09:19 नवीन
जन्मदाखल्या प्रमाणे माझे वय एखाद्या जख्खड म्हातार्‍या एवढे आहे, पण मनाने मी अजूनही लहानच आहे. माझी प्रवेशिका चालेल का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 01/15/2021 - 11:21 नवीन
तुम्ही जरा वाट पहा बुवा तुमच्या साठी पण येईल उपक्रम:)
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 01/14/2021 - 10:41 नवीन
धत्तड तत्तड... धमाल मज्जा! सं - दी - प
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 01/14/2021 - 11:12 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/14/2021 - 15:43 नवीन
आवडला
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 01/15/2021 - 20:49 नवीन
सांगतो लेकीला..
  • Log in or register to post comments
N
nanaba Mon, 01/18/2021 - 09:45 नवीन
माझ्या लेकीचे साहित्य पाठवेन
  • Log in or register to post comments
N
nanaba Tue, 01/19/2021 - 03:41 नवीन
एकापेक्षा अधिक कलाकृती चालणार आहेत का?
  • Log in or register to post comments
स
साहित्य संपादक Tue, 01/19/2021 - 10:37 नवीन
नक्कीच! ही स्पर्धा नाही. त्यामुळे एकाहून अधिक प्रवेशिकांचं स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/19/2021 - 10:46 नवीन
मस्त उपक्रम. शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sat, 02/13/2021 - 06:22 नवीन
मिपा मंडळ , एकदम हटके उपक्रम ! खूप कौतुक आहे आणि सगळ्या बच्चे कंपनीचे सुद्धा कौतुक आहे . सगळ्या थोर कलाकारांना शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
म
मनस्विता Sat, 02/13/2021 - 15:42 नवीन
माझ्या मुलीचा सहभाग नोंदवायचा होता पण जमले नाही.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा