Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आज काय घडले... मार्गशीर्ष व. ८ पं. मालवीय यांचा जन्म !

A
Ashutosh badave
Wed, 01/06/2021 - 07:06
आज काय घडले... मार्गशीर्ष व. ८ पं. मालवीय यांचा जन्म !पंडित मालवीय शके १७८३ च्या मार्गशीर्ष व. ८ रोजी प्रसिद्ध हिंदु विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांचा जन्म झाला. यांचे मूळ घराणे मालव प्रांतांतील. माळवा सोडल्यानंतर प्रयाग क्षेत्री या धराण्याने आपले आस्तित्व कायम केलें. मालवीयांच्या घराण्यांतील सर्वच पुरुष विद्वान् व उदारचरित असे होते. पं. प्रेमधर मालवीय हे मदनमोहनांचे आजे. संस्कृत विद्येतील यांची कीर्ति त्या वेळी अत्यंत मोठी होती. यांचे चिरंजीव व्रजनाथ मालवीय हेहि विद्वान् म्हणून प्रसिद्ध होते. भागवतावर लिहिला गेलेला यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. याच भाग्यशाली पित्यास मार्गशीर्ष व.८ या दिवशी जो मुलगा झाला तो म्हणजे मदनमोहन. पित्याने यांच्या शिक्षणाची फारच काळजी घेतली. धार्मिक आणि सांस्कृतिक संस्कार घरच्या घरीच होत असल्यामुळे मदनमोहन मालवीयांचा विकास चांगला होत होता. प्राथमिक शिक्षण घरीच घेतल्यानंतर धर्मज्ञानोपदेश पाठशाळा व विद्याधर्मवर्धिनी सभा या संस्थातून यांचे शिक्षण सुरू झाले. अलाहाबाद जिल्हा स्कूल मधून प्रवेश परीक्षा व म्यूर सेंट्रल कॉलेजमधून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचे लक्ष सार्वजनिक कार्याकडे वळले. धर्मकारण व शिक्षण हे यांचे आवडते विषय होते. अलाहाबाद लिटररी इन्स्टिटयूट व हिंदु समाज या संस्थांतून ते काम पाहूं लागले. आणि हळूहळू यांच्या कार्याचा विस्तार होऊन जगप्रसिद्ध अशा बनारस येथील विश्वविद्यालयाची निर्मिति यांच्याकडून झाली. यांच्यासंबंधी कै. तात्यासाहेब केळकर यांनी एके ठिकाणी म्हटले होते : " हिंदुत्वाचा आर्दश कोण? असा मला कोणी प्रश्न केला तर मी हिंदुस्थानांतील एकाच विभूतीकडे बोट दाखवीन. ती म्हणजे पंडित मदनमोहन मालवीयजी. जुन्या व नव्या संस्कृतीचा सुंदर मिलाफ कसा घालावा हे पंडितजींइतके कोणीच जाणीत नाही. हिंदु विश्वविद्यालय हे या सुंदर मिलाफाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. देवाजवळील नंदादीपाने जी चित्ताला एक प्रकारची प्रसन्नता वाटते ती पंडितजी आहेत.” हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृति यांचा अभिमान पंडित मालवीय यांना फार असे. -२५ डिसेंबर १८६१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 805 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 20 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 20 hours ago
  • सुंदर !!
    5 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा