Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आज काय घडले.... मार्गशीर्ष व. ७ हनुमंताचे वृत्तांत-निवेदन !

A
Ashutosh badave
Wed, 01/06/2021 - 07:02
हनुमान रॅम भेट मार्गशीर्ष व. ७ ला श्रीहनुमान रावणाच्या लंकेमध्ये असणाऱ्या सीतेचा शोध लावून परत रामरायापाशी आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत निवेदन केला. लंकेंत रावणाच्या अंतःपुरांत असणाऱ्या अशोकवनांतील सीतेचा शोध मोठ्या युक्तीने हनुमानाने लावला आणि तिला रामाची सर्व हकीकत सांगितली. रामास सांगण्यासाठी तिचाहि निरोप घेतला. सीतेचा शोध लावून कर्तव्य केले आणि लंकादहन करून आपला पराक्रम शत्रूंनाहि दाखविला. आणि आतां रामाकडे येण्यासाठी तो अरिष्ट नावाच्या पर्वतावर चढला, व तेथून त्याने उड्डाण घेतले. आणि थोड्याच अवर्धीत उत्तर किनाऱ्यावर तो येऊन ठेपल्यावर जांचवान, अंगद आदींनी त्याचे स्वागत केले. त्याच्या कामगिरीचा सर्वांनी गौरव केला. आणि यानंतर सारी मंडळी राम, लक्ष्मण व सुग्रीव हे ज्या ऋष्यमूक पर्वतावर होते त्या ठिकाणी आली. हनुमानाने सीतेसंबंधी सर्व प्रकार रामरायाला निवेदन केला. "धरणीवर बसलेली, सारखा निःश्वास टाकणारी, रावणाविषयीं अत्यंत क्रोध व अनादर असलेली व मरणास तयार झालेली, अशी सतिा मी पाहिली...मी तिचे समाधानहि केले की, वानरांचा राजा सुग्रीव बलाढ्य आहे, माझ्यासारखे शेकडों बलाढ्य वरि त्याच्याजवळ आहेत. या सर्वांच्या साहाय्याने रामलक्ष्मण रावणाचा नाश करून तुझी मुटका करतील" याप्रमाणे श्रीरामचंद्र व हनुमान यांचे आणवी या बाबतीत संभाषण झाल्यानंतर रामचंद्र मारुतीची स्तुति करून म्हणाले, " हनुमंता, तूं जें काम केलेंस ते दुसरा कोणीहि करूं शकला नसता. शंभर योजनें रुंद समुद्र ओलांडून जाण्याची शक्ति तुझ्याशिवाय किंवा गरुडाशिवाय दुसऱ्या कोणासहि नाही." असे म्हणून रामाने मोठ्या प्रेमाने मारुतीस आलिंगन दिले. यानंतर सर्व जण पुढच्या तयारीस लागले. मोठ्या प्रयासाने सेतु बांधण्यात आला. लक्षावधि वानरसेना त्यासाठी खपत होती.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 810 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 20 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 20 hours ago
  • सुंदर !!
    5 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा