लाख चुका असतील केल्या...
निसटले वर्ष मला
पाठमोरेसे दिसले
त्याची बघून हताशा
माझे काळीज द्रवले
म्लान वदनाने त्याने
हलकेच विचारले
जगशील का रे पुन्हा
दिस चार माझ्यातले
विचारात मी पडलो
चार कोणते निवडू
आनंदात गेले ते, की
चुकांनी जे केले कडू
निवडले मग चार
चुका मोठ्या केल्या ज्यात
सुधारेन म्हणताना
गेलो आणखी गर्तेत
नवे वर्ष नव्या चुका
करण्याची आहे संधी
असे असता कशाला
भूतकाळा द्यावी संधी?
💬 प्रतिसाद
ख
खेडूत
Sat, 01/02/2021 - 12:57
नवीन
आवडली. छान कल्पना आहे.
- Log in or register to post comments
B
Bhakti
Sat, 01/02/2021 - 13:56
नवीन
वाह...पहिल्यांदाच नवीन वर्षाशी हितगुज असे मस्त वाचले..
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Sun, 01/03/2021 - 10:07
नवीन
छान. कल्पना कविता दोन्हीही.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Mon, 01/04/2021 - 04:16
नवीन
बर्याच दिवसांनी सोपे शब्द निवडून लिहिलेली कविता आवडली
(जनुक जिन्याच्या सर्पिल वळणांचा पंखा)पैजारबुवा,
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
गुरुवार, 01/07/2021 - 06:18
नवीन
सर्व कविताप्रेमींना धन्यवाद.
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 01/07/2021 - 07:36
नवीन
छान आहे. :-)
- Log in or register to post comments