मोबाईल प्रीपेडचे कोणते पर्याय तुम्ही वापरता ? कोणते पर्याय चांगले आहेत ?
आमच्या कुटूंबांत चार मोबाईलात मिळून पाच सिम कार्यरत आहेत. आधी अधिक होते काही महिन्यांपुर्वी चार्जेस वाढले, तसे एक सीम नंबर बाद करुन घेतला. पुर्वी प्रत्येक सिमवर ८४ दिवसांचे प्लान भरत असे ते सहसा दिड किंवा दोन जिबी आणि अन लिमीटेड कॉल असत. हे बजेट महिन्याचे डिव्हाईड होऊन ४०० रुपयेच्या घरात बसत असे. हे चार्जेस वाढल्या पासून काही ताळमेळ राहीलेला नाही.
मध्ये एकदा तुलना केली तेव्हा बिएसएनएलचा प्लान कमीत पडत होता म्हणून पाच अपिकी तीन नंबर बिएसएनएल वर नेले. बाकी दोन आयडीया/व्होडात आहेत. बिएसएनएलच्या पोर्टलवरुन कोणत्या अमाऊंटला काय मिळते हे मला नीटसे उमगतच नाही. दोन सिम कॉलेजात जाणार्या पाल्यांचे ऑनलाईन क्लास अवलंबून असल्याने जोखीम नको म्हणून वर्षभराचे प्लान दिसेल त्या अमाऊंटने भरुन टाकले. एका सिमवरील व्यवहार कमी करून ऑफीसच्या नंबरवर धकवला जाऊ शकतो. आयडीया व्होडाचे अधून मधून पैसे भरतोय पण चटकन जाणवत नाही पण पुर्वीच्या मानाने ते अव्वाच्या सव्वा वाटत आहे. खिसा न कळत गळतोय. सगळ्याच कंपन्यांचे चार्जेस वाढले असल्याने कोणत्या कंपनीची सर्विस आणि कोणते प्लान अधिक किफायतशीर आहे ह्या बद्दल मिपाकरांकडून जाणून घ्यावे म्हणून धागा काढत आहे.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर टाळणे, शुद्धलेखन आणि व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी अनेक आभार.
दर ( प्रिपेड)
दिवस
डाटा जीबी- प्रत्येक दिवशी
नेटवर्क कसं आहे ? आयडिया उर्फ़ व्ही-आय
६९९ ८४
४ जीबी
देवभरोसे.
ऐअरटेल
६९८
८४
२ जीबी
देवभरोसे.
जीओ
५९९
८४
२ जीबी
जरा बरं...! बीएसएनएल
४८५
९०
१.५ जीबी
धर-सोड वृत्ती. पण देशभर.
माझ्या कुटुंबात ऑनलाइन शिक्षण आणि अनुषांगिक कामासाठी सर्व कंपन्यांचे सीम कार्डस आहेत, नौकरीच्या गावी एअरटेल २ जी चालते. वर्कफ्रॉम होम (गावी असतो तेव्हा तालूक्याचे ठिकाण) एअरटेल रपारप स्पीड देते. नौकरीच्या ठिकाणी जीओ नेटस्पीड मरगळलेल्या अवस्थेत चालते (चीड येते). बीएसएनएल माझं पोश्टपेड चांगले चालते. पण एकदा नेट वापरले, पाच हजार रुपये बील आले त्यामुळे त्याचं नेट वापरत नाही. आयडीया, गावी चांगले चालते.नौकरीच्या ठिकाणी मान टाकते. सारांश, एकही कंपनी नीट सेवा देत नाही. रेट्स मात्र जवळ जवळ सारखेच आहे. सारांश, आपल्या गावी जे कोणते नेटवर्क चांगले चालते ते सीम वापरावे असे वाटते. एवढे बोलून दोन शब्द संपवतो. -दिलीप बिरुटे