Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अभंगवाणी रसग्रहण: रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा (ज्ञानेश्वर माऊली)

फ
फुकनी
Wed, 12/16/2020 - 17:45
🗣 4 प्रतिसाद
दुवा १: https://www.aathavanitli-gani.com/Song/Runujhunu_Runujhunu_Re रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥ चरणकमळदळू रे भ्रमरा । भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥ सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥ सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा । बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥ सध्या ह्या अभंगाने वेड लावले आहे. ह्या अभंगाचे मला भावलेले रसग्रहण Unknown (anuranjan?) यांनी केलेले इथे जसे च्या तसे टंकावतोय. कालौघात हे रसग्रहण वीरून जाऊ नये असे वाटते म्हणून हा उपक्रम. असे रसग्रहण मि. पा. वर अगोदर झाले असेल तर किंवा तुम्हाला दुसरीकडे असे रसग्रहण सापडले तर किंवा तुमचे स्वतः चे विचार असतील तर ते पण जरुर कळवा. अशा भावलेल्या अभंगांच्या रसग्रहणाचा एकत्रीत समूचय (One Stop Shop) करायचा विचार आहे ते अधिकाधीक सुधारण्यास मदत करा. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- प्रस्तुत अभंग हा उपदेशपर प्रकरणातील असून या अभंगामध्ये माउली श्री ज्ञानोबाराय जीवास उपदेश करतात . या अभंगात श्री माउली जीवास भ्रमराची उपमा देतात . ज्याची उपमा द्यावयाची व ज्याला उपमा द्यावयाची त्या दोघात कांही साम्य असणे आवश्यक असते .श्री माउलींच्या नवनवोन्मेषशालिनी दिव्य प्रतिभेस भुंगा व जीव यांचे साम्य दिसून येते . भुंगा हा षट्पद कीटक आहे. त्यास सहा पाय असतात . तद्वत जीवास ही सहा पाय असतात ते म्हणजे श्रोत्र , चक्षु ,त्वचा ,रसना ,घ्राण व या पाच ईंद्रियांचे अध्यक्ष असलेले पण स्वतः मात्र ईंद्रिय नसलेले मन . ज्या प्रमाणे भुंगा त्याच्या या सहा पायाच्या साहाय्याने जगामध्ये विचरतो तद्वत हा जीव सुद्धा पंच ज्ञानेंद्रिय व सहावे मन यमके साहाय्य घेऊनच विचरतो . हे साम्य लक्षी घेऊन माउली श्री ज्ञानोबाराय जीवास भ्रमराची उपमा देतात व त्यास आर्जवाने उपदेश करातात - रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥ या भ्रमरात व जीवात अजून एका साम्य आहे ते असे की भ्रमर हा सतत गुं गुं गुं गुं गुं गुं गुं .... करत असतो साहित्यीक परिभाषेत त्यास गुंजारव असे म्हटले जाते .माउली त्या गुंजारवास रुणुझुणु असे म्हणतात . ज्याप्रमाणे भुंगा हा सतत ,अथकपणे गुंजारव करत असतो त्याप्रमाणे जीवही सतत गुंजारव करत असतो . माउलींनी रुणुझुणु या पदासने विप्सा म्हणजे द्विरुक्ती केली आहे . त्याचे कारण प्रथम रुणुझुणु हे पद मी (अहमाध्यास ) व द्वितीय रुणुझुणु हे पद माझे (ममाध्यास) दर्शविणारे आहे . हा जीव जन्मापासून मृत्यू पर्यंत अथकपणे मी माझे... मी माझे..... असा सतत गुंजारव करत असतो म्हणून श्री ज्ञानराज माउली जीव रुपी भ्रमरास अत्यंत आर्जवाने सांगतात की बाबारे रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । ही रुणझुणरूप अहंता व ममता हा तुझ्यामधील दोष आहे . कोणतीही गुणदोषता ही सापेक्ष असते, कधी एके ठिकाणी गुण असणारी गोष्ट दुसरे ठिकाणी दोषही असू शकतो .कारण दोषाची व्याख्या कार्यविघातको दोषः अशी केली आहे . जो कार्यास विघातक असतो त्यास दोष म्हणावे अशी केली आहे . योग्य अहंता व ममता हे दोघे व्यवहारात कधी गुण असू शकतात . पण आध्यात्मात परमात्मप्राप्तीसाठी अहंता व ममता हे प्रतिबंधक ,विघातक असल्याने दोष आहेत म्हणून माउली त्या अहंतेस व ममतेस अवगुण असे सांबोधतात . व जीवरुपी भ्रमरास हे अहंता व ममतारुपी अवगुण परित्यागाविषयी अत्यंत लडिवाळपणाने सांगतात की सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥ हे जीवा मी माझे .... मी माझे रूपी रुणझुण ही आत्मप्राप्तीसाठी प्रतिबंधक असल्याने या रुणझुण रूपी अवगुणांचा तू परित्याग कर .... ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5504 views

🗣 चर्चा (4)
क
कंजूस गुरुवार, 12/17/2020 - 01:26 नवीन
एकूण कवितांचे/ काव्याचे रसग्रहण धागा असायला पाहिजे. अशा भावलेल्या अभंगांच्या रसग्रहणाचा एकत्रीत समूचय (One Stop Shop) करायचा विचार आहे ते अधिकाधीक सुधारण्यास मदत करा. पण त्या लेखनाची लिंक देणे योग्य ठरेल. कॉपीराईटचा प्रश्न येतो ना!
  • Log in or register to post comments
फ
फुकनी गुरुवार, 12/17/2020 - 15:57 नवीन
दुवा २: http://ashutoshg.blogspot.com/2009/10/runu-jhunu-runu-jhunu-re-bhramara-full.html त्या लेखनाची लिंक अगोदर दिली नाही कारण त्याचा संदर्भ comment section मध्ये होता with Author name as Unknown. बहुतेक कॉपीराईटचा प्रश्न येणार नाही
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक गुरुवार, 12/17/2020 - 17:34 नवीन
छान विवेचण
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Tue, 12/22/2020 - 03:48 नवीन
मिपावर असं कॉपी पेस्ट केलेलं चालतंय का?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा