Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

वीज चोरी

श
शेर भाई
Wed, 12/09/2020 - 12:35
🗣 51 प्रतिसाद
अस्मादिक एका सहकारी गृहनिर्माण संस्थेत अध्यक्ष आहेत. आमच्याकडे संस्थेत ‘सहकार’ फक्त नावातच आहे. तस बघाल तर हि करोना पूर्व काळात सुरु झालेली गोष्ट आहे. सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत ज्याप्रमाणे वीज वापर नोंदणी करता कर्मचारी येतात त्याप्रमाणे आमच्या संस्थेत देखील वीज कंपन्या त्यांचे कर्मचारी दर महिन्याला पाठवतात. मार्च २०२० मधील गोष्ट आहे, वीज कंपनीने नवीन नियुक्त्यांवर पाठवलेल्या कर्मचार्‍यांनी संस्थेच्या कार्यकारिणीला कळवले कि, तुमच्या संस्थेत मीटर पेक्षा DP जास्त आहेत, तरी तपासणी करून घ्या. त्या प्रमाणे आम्ही तपासणी केली असता असे आढळले कि एका सदस्याचा मीटरच गायब आहे. त्या सदस्याला याबाबत विचारले असता त्याने आपल्या काखा वर करून आपल्याला याबाबत काहीच माहित नाही असा आव आणला. सदर प्रकरण वीज चोरीचे आहे आणि हा एक दखलपात्र फौजदारी गुन्हा आहे याची जाणीव सदर सदस्याला करून दिल्यावर त्याने हा विषय एका महिन्यात निस्तरतो असे सांगीतले. संस्थेच्या कार्यकारिणीने याबाबत त्याला लेखी पत्र देऊन आपली बाजू मांडण्यास सांगितले. नंतर करोना आला, लॉक-डाऊन आले, त्यामुळे संस्थेच्या कार्यकारिणीतील काही कनवाळू सदस्यांच्या आग्रही विनंतीमुळे सदर सदस्याला Time – Please दिला. मग मार्च पासून अगदी आज पर्यंत सदर सदस्य सुखनैव फुकट विजेचा उपभोग घेत आहे. त्याने सगळीकडे उत्तम setting लावली आहे. त्यामुळे वीज कर्मचारी वापराची नोंदणी करताना त्याचा DP बंद करतात आणि थोड्याच वेळात त्याची वीज पूर्ववत होते. आम्ही वीज कंपनीला याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आम्हाला पोलिसात जायला सांगीतले. बर गंमत अशी कि कंपनीकडून जे काही आहे ते तोंडी आहे लेखी काहीच नाही, वर वीज नोंदणी कर्मचारी आम्हालाच सांगतात कि उद्या इथे आग लागली तर आम्ही अध्यक्ष आणि सचिवांना पोलिसांच्या ताब्यात देऊ. आणि या सगळ्यात सदर सदस्य दोन Air Conditioner, Heater आणि Microwave मुक्तहस्ते वापरत आहे. काळाला अस सोकावताना बघून उगाच Frustration वाढत. अस काही आहे का, ज्याने साप तर मरेल आणि लाठी पण वाचेल. PS संस्थेच्या कार्यकारिणीतील काही कनवाळू सदस्य संस्थेचा सार्वजनिक परिसर आपल्या वडलांचा असल्यासारखा वापरतात. सदर सदस्य कनवाळू असून संस्थेच्या कार्यकारिणीत असल्याने त्यांचे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी काय करता येईल??

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 22463 views

🗣 चर्चा (51)
क
कंजूस Sat, 12/12/2020 - 13:22 नवीन
सभासदाच्या नावावर असेल तर सोसाइटी कशी तक्रार करणार ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा