कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण
या विषयाचे आधीचे संदर्भ :
१. हात, जंतू, पाणी आणि साबण
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज
३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य
४. पूरक विषय: पल्स ऑक्सीमीटरचे गमभन
मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..
करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :
डिसेंबर 2019 : चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.
जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.
फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.
मार्च :
* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.
एप्रिल-मे :
* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली
जुलै : हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.
ऑगस्ट : बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.
सप्टेंबर : जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.
ऑक्टोबर :
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.
नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.
डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंडने ८ डिसेंबरला लसीकरण सुरु केले.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............
समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !
लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !
लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
🗣 चर्चा
(183)
ह
हेमंतकुमार
Sun, 01/17/2021 - 15:59
नवीन
कोविड १९ हे त्याचे अधिकृत बारसे झालेले नाव आहे.
तेच राहील . त्यातून इतिहास समजतो
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 01/17/2021 - 16:29
नवीन
२०१५ पासून WHO ने नव्या आजारांना नावे देण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केलीत.
त्यानुसार ही नावे व्यक्ती, प्राणी वा भौगोलिक स्थाने यावरून देऊ नयेत अशी सूचना आहे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 01/18/2021 - 05:27
नवीन
नवा वाइरस सापडलाय?
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Mon, 01/18/2021 - 05:46
नवीन
करोना सार्स 2 हा २०१९ मध्ये नव्याने सापडला व
त्याचा आजार कोविड१९ .
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 01/19/2021 - 04:48
नवीन
लस घेतल्यानंतरही मुखपट्टी का लावायची याची ५ कारणे :
१. या लसीची उपयुक्तता १००% नाही
२. लसीकरणानंतर दीड महिन्याने संरक्षण मिळेल
३. लसीमुळे 'आजारा'पासून संरक्षण मिळेल, पण नवा संसर्ग वा प्रसार यापासून मिळेल की नाही हे अजून अस्पष्ट.
४. ज्यांना कर्करोग/गंभीर आजार आहेत त्यांना तशीही
मुखपट्टी उपयुक्तच असते.
५. जनुकबदल झालेल्या विषाणूपासून संरक्षणास उपयुक्त. चालू लस याबाबत किती उपयुक्त आहे हे संदिग्ध आहे.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 01/19/2021 - 16:18
नवीन
Ivermectin या जंतावरील औषधाचा सौम्य कोविड रुग्णांवर एक शास्त्रशुद्ध प्रयोग स्पेनमध्ये पार पडला.
रुग्णास लक्षणे जाणवल्यावर ७२ तासांत जर हे औषध एकदाच दिले तर बऱ्यापैकी फरक पडतो असे दिसले.
भविष्यात अजून प्रयोग केले जावेत.
संसर्ग झाल्यानंतरच्या रोगप्रतिबंधांसाठी याचा विचार होऊ शकतो .
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 01/21/2021 - 13:47
नवीन
कोविशिल्ड तयार करणाऱ्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये भीषण आग:
आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचे नुकतेच रेडियोच्या बातम्यांमध्ये ऐकले .
मृतांना आदरांजली.
कोविशिल्ड लसीचा विभाग सुरक्षित आहे हे चांगले झाले
- Log in or register to post comments
B
Bhakti
गुरुवार, 01/21/2021 - 14:49
नवीन
वाईट घटना
BCG लस विभागाला आग लागली होती.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 01/21/2021 - 16:47
नवीन
भारतीय लोकांच्या रक्तात च बेजबाबदार पण ठासून भरलेला आहे.
इतकी महत्वाची संस्था असून आग लागते म्हणजे ज्यांच्या वर जी जबाबदारी दिली होती ती त्यांनी योग्य रित्या निभावली नाही.
चोकशी होवून जो अधिकारी ह्या हलगर्जी पणाला जबाबदार आहे त्या वर मनुष्य वधाच्या गुन्ह्यापासून बाकी सर्व कलम लावून खटला चालला पाहिजे.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Mon, 02/01/2021 - 07:23
नवीन
लाळेच्या माध्यमातून करोनावरील चाचणी शोधून काढणाऱ्या वैज्ञानिक अँड्रय़ू ब्रूक्स यांचे निधन
आदरांजली !
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Wed, 02/10/2021 - 15:40
नवीन
कोविड लसींच्या प्रकारांमध्ये फायझर व मॉडर्नच्या लसी या एम-आरएनए तंत्रज्ञानाने बनवलेल्या आहेत. यानिमित्ताने या नव्या तंत्राचे अन्य काही उपयोग दृष्टिक्षेपात आहेत.
एम-आरएनए या नव्या तंत्रज्ञानाचे अन्य काही गंभीर आजारांमध्येही औषध (उपचार ) म्हणून उपयोग होऊ शकतील. त्या दृष्टीने गेली काही वर्षे संशोधन प्रगतिपथावर आहे.
या संदर्भात एम-आरएनए हे एक प्रकारे “आयुष्याचे सॉफ्टवेअर’ म्हणून काम करते असे संशोधकांचे म्हणणे आहे. अर्थात या संशोधनाला बराच काळ जावा लागणार आहे. काही संशोधने प्रयोगावस्थेत आहेत.
भविष्यात हे तंत्रज्ञान खालील आजारांसाठी उपचार म्हणून प्रभावी ठरू शकते :
• जनुकीय आजार
• एचआयव्ही
• काही प्रकारचे हृदयविकार आणि
• बऱ्याच अवयवांचे कर्करोग
- Log in or register to post comments
B
Bhakti
Wed, 02/10/2021 - 17:43
नवीन
थोडेसे अवांतर
पण सूक्ष्मजीवाबद्दलच आहे.
https://glacierhub.org/2020/02/06/ancient-viruses-awaken-as-the-tibetan-plateau-melts/
सध्या हिमालयाच्या वितळण्या मुळे Aceint सूक्ष्मजीव मुक्त होऊ शकतात.आणि मानवाच्या जीवनचक्रात येऊ शकतात.
(चालू घडामोडी)
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 02/11/2021 - 16:39
नवीन
बघायचे भविष्यात काय होतेय..
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 02/11/2021 - 06:20
नवीन
https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/11022021/0/8/
अमरावतीची बातमी. लस घेउन पॉझिटीव्ह ?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/11/2021 - 06:24
नवीन
कठीण आहे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/11/2021 - 06:25
नवीन
कठीण आहे. कोणत्या पानावर आहे बातमी ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 02/11/2021 - 06:30
नवीन
८ व्या पानावर
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 02/11/2021 - 12:12
नवीन
>>>>>
लसी पासून मिळणारी प्रतिकारशक्ती दोन प्रकारची असते :
१. Effective : म्हणजे या शक्तीमुळे संबंधित जंतूच्या संसर्गापासून मोठा आजार होत नाही, परंतु तो जंतुसंसर्ग पुन्हा होऊ शकतो.
२. Sterilizing : यामुळे जंतुसंसर्गाचा परिणाम पूर्ण थांबवला जातो. अशामुळे लक्षणविरहित रुग्णही निर्माण होत नाहीत.
वरील २ हे आदर्श व अंतिम ध्येय असले तरी क्वचित साध्य होते.
अन्य काही मुद्दे माझ्या 19 Jan 2021 - 9:18 am प्रतिसादात आधीच आलेले आहेत
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 02/28/2021 - 04:45
नवीन
नव्या शब्दाची निर्मिती :
कोव्हिडायझेशन
https://www.loksatta.com/lokrang-news/covidization-article-by-dr-sanjay-oak-abn-97-2408994/
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 02/28/2021 - 14:59
नवीन
@ डॉ. कुमार ,
टाईम्स ऑफ ईंडियाने Kurnool Medical College, Kurnool, Institute of Genomics and Integrative Biology, Delhi, and Academy of Scientific and Innovative Research, Ghaziabad यांचा रिइन्फेक्शनबद्दलच्या संशोधनाचे वृत्त दिले आहे. मला वाटते या रिपोर्टचा परिपेक्ष आपण अधिक चांगला उलगडून सांगू शकाल.
शिवाय रिइनफेकशनच्या शक्यतांना लसिकरण किती तोंड देऊ शकते आहे या बद्दल ही अधिक जाणून घेणे आवडेल.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 02/28/2021 - 16:36
नवीन
मागा ,
त्या संशोधनाची मूळ पत्रिका वाचली. त्यांनी सुमारे ८६ बदललेल्या विषाणूंचा अभ्यास केलाय.
१. विशिष्ट बदलांमुळे विषाणूंना जगायचा फायदा मिळतो. >>> नवे रुग्ण निर्माण.
२. हे नवे प्रकार आपल्या अँटिबॉडीजना दाद देत नाहीत.
३. त्यांच्यावर मात करण्यासाठी लसीत काही सुधारणा कराव्या लागतील. mRNA तंत्राच्या लसीत त्या करणे शक्य व सुलभ असते.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sat, 03/06/2021 - 04:05
नवीन
Colchicine हे औषध गाऊटच्या उपचारांसाठी वापरले जाते.
त्याचा उपयोग कोविडच्या सुरवातीच्या अवस्थेत होऊ शकेल असे गृहीतक आहे. त्या संदर्भात कॅनडातील
प्रयोग आशादायी ठरलेत.
आता इंग्लंडमध्येही त्याचे प्रयोग अभ्यास सुरू झालेत.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 03/06/2021 - 04:21
नवीन
१) covid होवून गेलेल्या व्यस्ती मध्ये तयार झालेली प्रतिपिंड,आणि covid विरोधी प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारे प्रतीपींड आणि covid विरूद्ध निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे.
२) reinfection झालेल्या लोकांची जगात निश्चित किती संख्या आहे.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sat, 03/06/2021 - 04:44
नवीन
१) आहे.
>>>>
covid होवून गेलेल्या व्यक्ती मध्ये तयार झालेली प्रतिपिंडे ही आजाराच्या तीव्रतेनुसार कमी अधिक असतील. त्यांचा अंदाज करणे अवघड असते.
लसीची मात्रा प्रमाणित असल्याने प्रतिपिंडांचे प्रमाण सांगता येते तसेच ती टिकण्याचा कालावधी.
अर्थात दोन्हीत काहीशी व्यक्तीसापेक्षता राहील.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Sun, 03/07/2021 - 07:03
नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/reduce-the-price-of-remedesivir-on-corona-abn-97-2415509/
मागे "who" ने ह्या बद्दल काही वेगळे मत व्यक्त केले होते ना ?
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 03/07/2021 - 07:23
नवीन
रेमडेसि. बद्दल who आणि काही देशांतील तज्ञांत मतभेद आहेत.
काही रुग्णालयांत त्याचा उपयोग दिसला आहे
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Tue, 03/09/2021 - 07:32
नवीन
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-65-yr-old-goregaon-man-collapses-in-chair-dies-after-vaccine-1st-dose/articleshow/81402017.cms
ह्याचे कारण काय असु शकते ?
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Sun, 03/21/2021 - 08:04
नवीन
ह्याच्या अहवालाचे काय झाले ?
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 03/09/2021 - 07:48
नवीन
संबंधित रुग्णास बरेच आजार होते व त्यावर औषधे चालू होती.
तज्ञ समितीचा अहवाल येईपर्यंत आपण काही प्रतिक्रिया देऊ नये हे मा म.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 03/11/2021 - 05:53
नवीन
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-rs-50l-plea-by-wife-of-doc-who-died-of-covid-rejected/articleshow/81418650.cms
ह्याला काय म्हणावे ?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 03/11/2021 - 07:45
नवीन
दुष्काळ कायदा जाहीर झाला तरच आपल्याला अनुदान किंवा धान्य मिळेल.
बाकी आपले कुटुंब उपासमारीने मेले तरी फ्यामिन ऍक्ट पास झालेला नाही तोवर आप्ल्याला काहीही मिळणार नाही.
बेस्ट च्या कर्मचाऱ्यांना कोव्हीड मुळे मृत्यु झाला तर ५० लाख रुपये भरपाई मिळेल
पण डॉक्टरना आपले रजिस्ट्रेशन रद्द करण्याची धमकी देऊन बंद दवाखाना उघडायला लावून रुग्ण तपासायला लावून त्यातून करोना झाला तर ते केवळ करोना रुग्णालयात काम करत नव्हते म्हणून पैसे मिळणार नाहीत.
उद्धवा अजब तुझे सरकार
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/11/2021 - 12:09
नवीन
डाॅक्टरांची सेना, साॅरी संघटना नसते, हे एक कारण
शिवाय,
डाॅक्टरांना काय समजते? कंपाउंडरला जास्त अक्कल असते, ही विचारसरणी....
बेस्टच्या कामगारांची संघटना असल्याने, ते जास्त महत्वाचे आहेत, ही पण एक भावना, असू शकते....
एकट्या दुकट्या माणसासाठी, शिवसेना कधीच निर्णय घेत नाही..हे माझे निरीक्षण आहे... रमेश किणी, हे एक उदाहरण डोळ्यासमोर आहे...
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 03/11/2021 - 14:07
नवीन
एकट्या दुकट्या माणसासाठी कोणीच निर्णय घेणार नाहीत , अशांसाठी समाजाने उभे रहावे लागते. ते आपल्याकडे होत नाही , म्हणुनच राजकारण्यांचे फावते.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 03/11/2021 - 08:16
नवीन
+१
यावरून
कायदा हा गाढव आहे
ही म्हण आठवली.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 03/11/2021 - 08:33
नवीन
कायद्याचा आपल्यालाला पाहीजे तसा अर्थ काढणारे बेरकी आहेत
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 03/11/2021 - 13:27
नवीन
सध्या कोविडवरील उपचारांसाठी ज्या अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत त्या इंजेक्शनद्वारे द्याव्या लागतात आणि त्यांचे उत्पादन खूप खर्चिक आहे. त्याला पर्याय म्हणून नाकातून फवाऱ्याद्वारा द्यायच्या सूक्ष्म अँटीबॉडीज(nanobodies) आता विकसित होत आहेत.
त्यांचे काही फायदे :
१. त्या जिवाणू वा यीस्टमध्ये तयार करतात.
२. त्या टिकाऊ असतात व साध्या तापमानातही त्यांची साठवण चांगली होते
३. हे औषध रुग्ण स्वतः घरच्या घरी घेऊ शकतो.
जेव्हा एखादी व्यक्ती चाचणीद्वारा कोविड-पॉझिटिव्ह निघते तेव्हा लगेचच हा फवारा चालू केल्यास आजार फोफावत नाही.
सदर संशोधनाचे प्रमुख अमेरिकास्थित डॉ. आशिश मंगलिक आहेत.
त्यांच्या संशोधनास शुभेच्छा !
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Sun, 03/14/2021 - 08:17
नवीन
https://www.loksatta.com/lokrang-news/from-icu-bed-mokle-akash-dd-70-2420416/
एक प्रांजळ अनुभव कथन तसेच उपचारातील सुधारणा संबंधी मनोगत.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Mon, 03/15/2021 - 15:06
नवीन
इथे एक गापै यांचा प्रतिसाद होत तो कुठे गेला ?
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Mon, 03/15/2021 - 11:42
नवीन
कोविड रुग्णांच्या रक्तचाचण्यापैकी एका चाचणीसंबंधी व्यक्तिगत संपर्कातून विचारणा झाल्याने त्याबद्दल लिहितो.
या चाचणीचे नाव सीआरपी असे आहे. हे एक प्रथिन असून ते आपल्या यकृत व रक्तवाहिन्यांच्या आवरणात तयार होते. जेव्हा शरीरात कोणत्याही कारणाने दाहप्रक्रिया होते तेव्हा त्याच्या रक्त पातळीत बऱ्यापैकी वाढ होते ( अगदी शंभर किंवा त्याहून अधिक पटीपर्यंत देखील).
समजा एखाद्याला जंतुसंसर्ग झाला आणि त्याचे सीआरपी वाढलेले दिसले. आता त्या रुग्णावर उपचार सुरू केले जातात. पुढे काही दिवसांनी सीआरपीची पुन्हा मोजणी केली जाते. जर शरीरातील दाह कमी होत असेल तर ही पातळी सुद्धा कमी झालेली दिसते.
अशा तऱ्हेने नियमित अंतराने ही पातळी मोजल्यास त्याचा रूग्णाच्या उपचारांसाठी चांगला उपयोग होतो.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 03/18/2021 - 11:58
नवीन
खुप दिवसांनी करोना संबंधातली एक चांगली बातमी
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbaitender-of-a-different-kind-bmc-to-quash-fir-against-woman-who-fled-quarantine/articleshow/81557452.cms
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Fri, 03/19/2021 - 03:47
नवीन
कोविड, बाळंतपण आणि फुप्फुसरोपण : अमेरिकेतील अभूतपूर्व घटना
31 वर्षांची एक तरुणी. गरोदरपणाचे 36 आठवडे पूर्ण झालेले. अचानक तिला खोकला व दम लागतो. रुग्णालयात दाखल. एक आठवड्यात डॉक्टर तिचे बाळंतपण घडवून आणतात.
बाळ झाल्यावर या तरुणीला न्यूमोनिया होतो - अगदी गंभीर. व्हेंटिलेटर, ECMO वर देखील ठेवावे लागले. फुफ्फुसात बिलकुल सुधारणा नाही; दोन्ही अगदी निकामी झालेली. सुदैवाने १० दिवसांत फुफ्फुसदाता मिळाला. मग दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्यात आले.
आता तब्येत उत्तम.
रुग्णास शुभेच्छा आणि डॉक्टरांच्या चमूचे अभिनंदन !
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Fri, 03/19/2021 - 04:34
नवीन
वरील तरुणीचे कोविडचे निदान झालेले होते.
- Log in or register to post comments
B
Bhakti
Fri, 03/19/2021 - 16:38
नवीन
आईने गर्भारपणात लस घेतल्यामुळे नवजात शिशूत जन्मतः कोविड विरूद्ध antibody आढळल्या.
https://www.biotecnika.org/2021/03/first-baby-born-with-sars-cov-2-antibodies-us/
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sat, 03/20/2021 - 03:28
नवीन
विशेष घटना .
.....................
करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evasion) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.
डब्ल्यूएचओने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीचा हा संक्षेपित तक्ता :
या संदर्भात भारतीय लसींच्या बाबतीतले सरकारचे निवेदन इथे
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 03/23/2021 - 07:54
नवीन
गेल्या दोन वर्षात वैद्यकीय कारणांसाठी पीपीइ संच, एन 95 मास्क इत्यादींच्या भरपूर वापरामुळे वैद्यकीय प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती खूप झालीय. त्याची योग्य विल्हेवाट ही पण एक मोठी समस्या आहे. पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेने या कचऱ्याचे विघटन आणि पुनर्वापर यादृष्टीने एक चांगले तंत्रज्ञान शोधले आहे.
बातमी इथे
अभिनंदन !
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Tue, 03/23/2021 - 08:29
नवीन
" प्लास्टिकचे विघटन आणि मास्कचा पुनर्वापर " ही बातमी नक्कीच आशादायक आहे.
अश्या आश्वासक बातम्या बर्याच वेळा वाचण्यात येतात, पण त्याची अंमलबजावणी फारच कमी वेळा झालेली दिसते.
मागच्या शासनाच्या कार्यकाळात प्लास्टीकवर तडकाफडकी बंदी घालण्यात आली ज्याचा जनतेने धसका घेतला.
नियम करून ४९-५० मायक्रॉन वाढवून ५१+ मायक्रॉन जाडीचे प्लास्टिक वापरात आले. पण प्लास्टिकचा कचरा थांबायचे नाव घेत नाही.
नक्की किती प्लास्टिक कचरा पुनर्वापरात येतो हे पर्यावरण विभाग जनतेला विश्वासात घेऊन सांगत नाही
जो पर्यंत यावर पर्यावरण विभाग आणि यंत्रणा जनतेच्या पातळीवर उतरून गंभीरतेने काम करत नाही, तो पर्यंत अश्या बातम्या फक्त "आशादायक" म्हणूनच वाचायच्या.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 03/23/2021 - 08:48
नवीन
अगदी सहमत, चौ को.
- Log in or register to post comments
र
राहुल मराठे
Tue, 03/23/2021 - 08:52
नवीन
लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडी विषाणू शी कश्या सामना करतात ?
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 03/23/2021 - 09:22
नवीन
श्रीरंग जोशी यांनी खरडफळ्यावर टाकलेली लिंक 👉 CDC Says You No Longer Need to Do These Things After Vaccination.
इथे कदाचित जास्त चांगला उहापोह होऊ शकेल या हेतूने चिकटवतोय.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 03/23/2021 - 09:22
नवीन
लस तयार करताना तिच्यामध्ये संबंधित विषाणूची रोगकारक प्रथिने अंतर्भूत केलेली असतात.ती शरीरात टोचल्यानंतर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात आणि T पेशी देखील निर्माण होतात.
जर अशा व्यक्तीला भविष्यात विषाणूचा नैसर्गिक संसर्ग झाला, तर आता या अँटीबॉडीज त्या विषाणूला ओळखतात आणि त्याच्या प्रथिनावावर हल्ला चढवून त्याला निष्प्रभ करतात.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »