Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

शायरी..

अ — अत्रुप्त आत्मा, Sun, 12/06/2020 - 11:49
पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा? शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही! शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही! अर्थास प्राप्त होता,शब्दास जाग यावी ऐश्या प्रभावितेची,मी साक्ष मागत नाही! मी सहजतेचा प्रवासी,असतो तिच्याचपाशी रचनेत हाव रचितेची ,अशीही मनात नाही! जावे तिच्या कुशीशी,घेऊन ऊब यावे सहजता माऊली ही, असते मनात माझी! भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही? ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही! अतृप्त... ०====०====०====०====०====०====०====

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6031 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 12/07/2020 - 04:20 नवीन
भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही? ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही! लिवा लिवत रहावा, थांबु नका पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/11/2020 - 18:03 नवीन
@लिवा लिवत रहावा, थांबु नका >>> हो. नक्की. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 12/07/2020 - 07:34 नवीन
गुर्जी जोरात! सं - दी - प
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/11/2020 - 18:04 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 12/12/2020 - 05:32 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 12/14/2020 - 06:14 नवीन
शा वि कु > >> धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 12/12/2020 - 06:20 नवीन
क्या बात है अत्रुप्तजी आत्मा, किती सहज सुंदर लिहिलंत.
पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा? शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही!
एखाद्या भ्रमराला जसा पानाफुलांवर फिरुन फिरुनही जसा शायरीचा गंध येत नाही तद्वतच फुलापानांच्या रांगोळीत प्राविण्य मिळवलेल्या कवीला शायरीचा गंध नाही हे मोठ्या खुबीने उलगडून दाखविले आहे.
शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही!
इथं तर खुद्द कवीने आपल्याला कमीपणा घेतलेला आहे. वास्तविक कवीची शब्दांवर प्रचंड हुकूमत आहे. कवी सहज बोलतानाही गद्याचे पद्य करत असतो तरीही कवी शब्दांवर लोभ असूनही त्यांचा वापर करत नाही असे विनयाने म्हणत आहे. : :
भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही? ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही!
कवी म्हणतोय मी शायरीला भेटेन मात्र कधी, कसा ते ठाऊक नाही, म्हणजेच त्यालाही शायरी सुचेल पण कधी, कशी ते ठावकी नाही. माझी वाट तर कवितेची आहेच पण (शायरी ही काव्यातच अंतर्भूत असूनही) शायरीच्या वाटेला कवी क्वचितच जाईल हे कवीने मोठ्या तरलतेने येथे उलगडून दाखवले आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा