चंद्रायण..!
ही रात निळीशार,
ओतीत चंद्र-धार...
स्वप्नातल्या कळ्यांना
देते नवा आकार!
पाण्यात चंद्र-पक्षी,
मांडून सौख्य-नक्षी...
किरणावरी शशीच्या
होतात मंद स्वार!
पाहून चंद्र-मेळा,
क्षितिजास ये उमाळा...
नक्षत्र बांधतात
तारांस एक-तार!
स्वप्नील चंद्र-गाणे
मधु-मीलनी उखाणे...
गातात फूल, वारे
छेडीत गंध-तार!
एकांत चंद्र-वेडा,
वितळून जात थोडा...
देतो अनामिकेला
अलगूजशी पुकार!
उचलून चंद्र-मेणा,
र्हदयात चंद्र-वेणा...
कित्येक चंद्र-वेळा,
करतात येरझार!
— सत्यजित
💬 प्रतिसाद
क
कानडाऊ योगेशु
Wed, 12/02/2020 - 15:59
नवीन
मस्तच.
- Log in or register to post comments
B
Bhakti
Wed, 12/02/2020 - 16:14
नवीन
पौर्णिमेच्या चंद्रासारखी गोड !
उचलून चंद्र-मेणा,
र्हदयात चंद्र-वेणा...
कित्येक चंद्र-वेळा,
करतात येरझार!
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Wed, 12/02/2020 - 20:17
नवीन
अप्रतिम, नितळ!
सं - दी - प
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 12/03/2020 - 04:13
नवीन
कविता अतिशय आवडली
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
गुरुवार, 12/03/2020 - 05:00
नवीन
मस्त 👍
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
Fri, 12/04/2020 - 04:54
नवीन
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Fri, 12/04/2020 - 06:39
नवीन
अप्रतिम!!!
- Log in or register to post comments
स
सनईचौघडा
Sat, 12/05/2020 - 03:39
नवीन
जबरदस्त
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
Mon, 12/07/2020 - 16:09
नवीन
धन्यवाद प्राची, सनईचौघडा!
- Log in or register to post comments
र
राघव
Mon, 12/07/2020 - 17:02
नवीन
अलवार रचना! सुंदर. :-)
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
Fri, 12/11/2020 - 11:45
नवीन
धन्यवाद राघव!
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Fri, 12/11/2020 - 12:24
नवीन
सुंदर
- Log in or register to post comments
र
रुपी
Fri, 12/11/2020 - 13:29
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
Sun, 12/13/2020 - 18:45
नवीन
धन्यवाद धनावडे, रुपी!
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 01/03/2021 - 12:00
नवीन
अतिशय तरल.
उचलून चंद्र-मेणा,
र्हदयात चंद्र-वेणा...
कित्येक चंद्र-वेळा,
करतात येरझार!
मीटर पण छान मेन्टेन केलाय.
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
गुरुवार, 01/07/2021 - 13:14
नवीन
धन्यवाद तुषार!
- Log in or register to post comments