Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

बेळगाव आणि कर्नाटक: सध्याच्या घटना

उ
उपयोजक
Fri, 11/20/2020 - 15:33
🗣 77 प्रतिसाद
बेळगाव आणि आजूबाजूचा कर्नाटकात समाविष्ट असलेला सीमाभाग मराठीबहूल असल्याने महाराष्ट्रात समाविष्ट करावा ही मागणी बर्‍याच वर्षांपासून होत अाहे.त्यासाठी वेळोवेळी आंदोलने,मारामार्‍या होत असतात. पण गेल्या काही दिवसातल्या सीमाभागातल्या बातम्या/घडामोडी पाहिल्या तर बेळगाव नि सीमाभाग महाराष्ट्रात जाऊ नये यासाठी कर्नाटकने कंबर कसून तयारी केल्याचे दिसत आहे.सीमा आंदोलनातले एक शहर ही बेळगावची अोळख पुसून एक मोठे आणि विकसित शहर बनवून तिथे कन्नडिगांना बहुसंख्येने वसवून सीमाभागात मराठीभाषिकांना अल्पसंख्यक करणे हा उद्देश दिसतो आहे.मुंबईसारख्या मराठीभाषिक महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीबाबत अौदासीन्य असणारा मराठी माणूस दक्षिणेत सीमाभागात मात्र मराठीसाठी दमदारपणे आजही खिंड लढवत आहे.बेळगाव वेगाने मोठे आहे पण त्यावर भाषिक सत्ता कोणाची राहणार की असेच द्वंद्वयुद्ध सुरु राहणार हे येणारा काळच ठरवेल. काळ्या दिनाची बातमी http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6188&tblId=6188 हा एक वेगळाच इश्यु http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6202&tblId=6202 बेळगावात भुमिगत गॅस लाईन.अद्याप शेजारच्या कोल्हापूरात किंवा सांगलीतही हे झालेले नाही. http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6296&tblId=6296 सीमाभागात कन्नडची सक्ती http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6334&tblId=6334 बँक कर्मचार्‍यांना कन्नडची सक्ती http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6417&tblId=6417 कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरण. कर्नाटकात मराठा समाजाची लोकसंख्या भरपूर आहे. http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6468&tblId=6468 कर्नाटकात मराठा प्राधिकरणाला कन्नडिगांचा विरोध http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6490&tblId=6490 सीमाभाग महाराष्ट्रात आणू - अजित पवार http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6508&tblId=6508 अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6514&tblId=6514 मराठा प्राधिकरणाला विरोध दर्शवण्यासाठी ५ डिसेंबरला कर्नाटक बंद http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6515&tblId=6515 बेळगावात १०० एकर जागेत मेगा डेअरी http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6525&tblId=6525 बेळगाव जिल्हा विभाजनाची मागणी http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6550&tblId=6550

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 34299 views

🗣 चर्चा (77)
उ
उपयोजक गुरुवार, 11/26/2020 - 15:32 नवीन
महाराष्ट्राचा कर्नाटकसोबतचा सीमावाद नक्की काय आहे.महाजन आयोगाने यात महाराष्ट्रावर कसा अन्याय केला आहे ते समजण्याच्या उद्देशाने हा जास्तीचा धागा. http://www.misalpav.com/node/47914
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 11/26/2020 - 16:06 नवीन
मुंबई मध्ये दंगल होवू, बाँब ब्लास्ट होवू किंवा अतिरेकी हल्ला लोक दुसऱ्या दिवशी त्याच ओढी नी ऑफिस मध्ये,रोजगाराला जातात. का मुंबई कर मोठे धाडसी आणि कामसू आहेत म्हणून? तर नाही तर त्यांची पोट कामावर गेले नाही तर 1 चालणार नाही,नोकरी टिकणार नाही ही खरी कारणे आहेत. मराठी लोक आळशी नाहीत त्यांना संध्या जास्त असल्या मुळे बेसावध आहेत. गरीब राज्यातील लोक कामसू नाहीत त्यांची मजबूरी आहे त्यांना पडेल ते काम करावेच लागते त्यांच्या राज्यात काहीच संध्या नाहीत. साधी रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यासाठी सुद्धा दुसऱ्या राज्यात जावे लागते. बिगारी काम सुद्धा त्यांना त्यांच्या राज्यात योग्य मोबदला देवू शकत नाहीत तिथे 50 रुपये मिळत असतील तर इथे 400 रुपये मिळतात . त्या मुळे बिगारी काम करायला सुद्धा प्रगत राज्यात जण्या शिवाय पर्याय नाही. बंगलोर प्रगत झाले आणि मुंबई मधील शेट्टी लोकांच्या हॉटेल मधील वेटर आता कानडी नाहीत छत्तीसगड ,बंगाल ची लोक आहेत ह्याचा अर्थ कानडी लोक आळशी आहेत असा होत नाही. शीख लोक परदेशी जायला लागले आणि जो टॅक्सी उद्योग शीख लोकांच्या हातात होता तो up aani बिहारी कडे गेला म्हणजे शीख लोक आळशी आणि बिहारी कामसू असा होत नाही.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/26/2020 - 16:28 नवीन
सरसकट कोणालाच मी आळशी वगैरे म्हणत नाही पण "तुम्ही तुमच्या राज्यात जाव ते राज्य सुधारा" वगैरे जे कोणी म्हणतात ते अयोग्य आहे. चेन्नईच्या तीन बिल्डर्सनी बिहारमधील १५० लोकाना परत आणण्यासाठी चार्टर्ड फ्लाईट पाठवली. तिप्पट पगार व विमान प्रवास. https://timesofindia.indiatimes.com/india/3-times-more-pay-air-travel-how-migrants-are-being-wooed-back/articleshow/76210270.cms काहीतरी आहे ना विशेष त्यांच्यात? की अजूनही "भय्ये भय्ये" म्हणून चिडवत बसणार त्याना?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 11/26/2020 - 17:39 नवीन
बेसुमार पैदास, जनावरांसारखं राबन्याची मजबूरी हे वैशिष्ट्यात मोडते का??
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/26/2020 - 18:06 नवीन
पुन्हा तेच? महाराष्ट्र पण पैदाशीत १९५१ पासुन टॉप-३ मध्ये आहेच. "जनावरांसारखं राबन्याची मजबूरी " मग वापरावी ईतरानी आपली 'कुशाग्र बुद्धी' पणाला आणी करून दाखवावी दैदिप्यमान कामगिरी.. मराठी तरूणानी जागतिक स्तरावर नेलेली एखादी स्टार-टप ? जगाकडुन वाखाणले गेलेले अभियांत्रिकी काम?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 11/26/2020 - 18:13 नवीन
अच्छा म्हणजे जनावरांसारखे राबनारे ऊत्तर भारतीय टाॅपच्या स्टार्टअप चालवताहेत का?? की अभियांत्रीकी. आणी राहीला प्रश्न मराठी लोकसंख्येचा तर लाॅकडाऊन वेळी परराज्यातून मराठी लोकांचे लटांबर नाही आले कुठें. पण ऊत्तर भारतीय किती कलमडले पाहीलं देशाने. महाराष्ट्र आपली लोकसंख्या पोसायला समर्थ आहे. ह्या जनावरांसारखं राबनार्यानी तिकडेच आपल्या राजेयात कलमडावे. मुंबई/महाराष्ट्रात रहायचं असेल तर मराठी शिका. नाहीतर आपली हिंदी घेऊन आपल्या दरीद्री राज्यात कलमडा.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/26/2020 - 19:02 नवीन
"अच्छा म्हणजे जनावरांसारखे राबनारे ऊत्तर भारतीय टाॅपच्या स्टार्टअप चालवताहेत का?? की अभियांत्रीकी." स्टारटप चालवन्यार्या लोकांची जरा यादी बघा. शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक मिळालेल्यांची यादी बघा जरा. मराठी लोक अभावानेच आहेत. म्हणजे बुद्धी असो वा 'जनावरासारखे कष्ट' आपण मराठी ना धड इथे ना तिथे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 11/26/2020 - 19:06 नवीन
Startup साठी त्या महान उत्तर भारतीय लोकांनी कोणती राज्य निवडली आहेत ते पण सांगा. त्यांना दुसऱ्या राज्यांची भूमी च का लागते उद्योग व्यवसाय साठी. ह्याची कारणे पण सांगा.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 11/26/2020 - 19:06 नवीन
Startup साठी त्या महान उत्तर भारतीय लोकांनी कोणती राज्य निवडली आहेत ते पण सांगा. त्यांना दुसऱ्या राज्यांची भूमी च का लागते उद्योग व्यवसाय साठी. ह्याची कारणे पण सांगा.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 11/26/2020 - 19:17 नवीन
ईतके बुध्दीमान आणी कष्टाळू आहेत तरी त्यांचं राज्य दरिद्री का?? का “धड कशातही नसलेल्या मराठी लोकांच्या राज्यात कलमडतात?? स्वतच दरीद्री राज्य सुधारावे ना??
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/26/2020 - 19:31 नवीन
पुन्हा तेच. ब्रिटिशांनी वसवलेल्या व बनवलेल्या सुविधांवर उभे राहुन किती दिवस आपणच आपली पाठ थोपटायची?अमराठी उद्योगपतींच्या संपत्तीच्या कुबड्यांवर किती दिवस काढ्णार अजून?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 11/27/2020 - 06:47 नवीन
ब्रिटीश जाऊन ७० वर्षे झाली. पुलाखालून बरंच पाणई वाहून गेलंय. अमराठी ऊद्योगपती महाराष्ट्रात का कलमडले?? स्वतच्या दरीद्री राज्यात कलमडावे ना???
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 11/27/2020 - 08:28 नवीन
तुमचे “हे” ऊत्तर भारतीय आहेत का?? फार राबतात का?? ;)
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 12/08/2020 - 21:16 नवीन
मुंबई साहेबाने वसवली. गुज्जू, पारशी, मराठी (त्यात 'घाटी' सुद्धा आले) या सर्वांनी मिळुन मुंबईला मोठं केलं. उर्वरीत महाराष्ट्रात दुसरी मुंबई उभी करु शकला नाहि मराठी माणुस. उप-राजधानी आत्ताआत्ता पर्यंत बोंबलत होती. पुण्याला मुंबईच्या जवळकीचा फायदा मिळाला. कोकणचं कॅलिफॉर्नीया करायच्या फक्त बाता ऐकल्या. नाशीक सारखी काहि शहरं नाहि म्हणायला थोडी पुढारलीत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 11/26/2020 - 17:39 नवीन
हेच म्हणतो
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 11/26/2020 - 18:28 नवीन
देशातील कोणत्याच प्रगत राज्यांना आता उत्तर भारतीय लोकांचे कष्ट नको आहे त्यांनी त्यांच्या कष्ट नी त्यांचीच राज्य सुधरावित. राज्याचं काय प्रगत देशांना सुध्धा मागास देशातील लोक आता नकोशी झाली आहेत. त्यांच्या देशाची सुरक्षा,आणि शांतता धोक्यात येते.. ह्याला कारण अप्रगत भाग मग ते राज्य असेल किंवा देश स्वतः विकास करत नाहीत आणि त्यांच्या चुकीच्या कारभार मुळे अमर्याद पलायन त्या भागातून होते आणि त्याचा त्रास सुव्यवस्थित असलेल्या देशांना किंवा राज्यांना होतो. हे नाकारणे शहाणपणाचे नक्कीच नाही. आता तरी उत्तरे मधील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण मध्ये आणावी त्यांच्या राज्यांचा राज्य कारभार सुधारावा . नाही तर एक दिवस सर्वच राज्यातून उघड विरोध होईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/26/2020 - 19:24 नवीन
१९५१ पासुन महाराष्ट्र टॉप-३ मध्ये आहे लोकसंख्येत. "देशातील कोणत्याच प्रगत राज्यांना आता उत्तर भारतीय लोकांचे कष्ट नको आहे त्यांनी त्यांच्या कष्ट नी त्यांचीच राज्य सुधरावित." हे तुझे मत की प्रगत राज्यांच्या मुख्य सचिवानी सांगितले रे राजेशा तुला? दारिद्र्य सगळीकडेच आहे. मुंबई-पुण्याच्या बाहेर ते समजते. A grocery shopkeeper in Jawhar tehsil of Thane district told that his customers can't afford grocery in kilos or in litres. "They can give only Rs. 5 or 10. Their entire grocery expenditure per week is not more than Rs. 50." https://www.newsclick.in/poverty-rich-state
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 11/27/2020 - 04:22 नवीन
भागातलं अपवादात्मक उदाहरण आणि बहुतांश अत्यल्प उत्पन्न असणारे+भरमसाठ मुले असणारे भय्ये हे दोन्ही एकाच तराजूत तोलू नयेत.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Fri, 11/27/2020 - 05:06 नवीन
की मुम्बै मध्ये आधी शिवसेनेला मद्रासी त्रासचे झाले मग बिहारी आणि आता गुजरात विरुध्द बोम्ब मारतात. गुजरात मध्ये आहे का हिन्दी ला विरोध?की त्यानी गुपचुप देशाला पन्त्प्रधान पुरवला आणि गुजरातचा मान वाढवला शिवसेनेशी जवळीक करुन कौन्ग्रेस्ने मात्र बिहार मध्ये मतदार नक्कीच गमावले. जागतिकीकरण आणि सन्गणक युगात दुफळी वाढवुन कमजोर होण्यापेक्शा सर्व भारतभर सामाइक वातावरण निर्माण करणे आणि त्याचवेळी प्रादेशिक सन्स्क्रुती व भाषा सन्वर्धन होणे आवश्यक आहे. त्यामुळे हिन्दी ला विरोध करण्यापेक्शा भारतभर आवश्यक तितके शासकिय हिन्दी आणि शासकीय वापरातली व साहीत्यीक वैविध्य समजवेल अशी प्रादेशिक भाषा शाळेतून शिकवली पाहिजे...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 11/27/2020 - 06:50 नवीन
का शिकवावी पण हिंदी??
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 11/27/2020 - 07:30 नवीन
भारतीय म्हणून कोणतीच बंधन नकोत. सर्वांना रोजगार व्यवसाय साठी देशभर फिरण्याची मुफा असावी . देशभर एकच सोयीची भाषा असावी जेणे करून देश एक राहील ,भक्कम होईल. हे सर्व योग्य च आहे आणि ह्या मता शी सहमत पण आहे. पण प्रतेक गोष्टीला काही तरी मर्यादा नक्कीच असते मर्यादा ओलांडली गेली की सकरतमक स्थिती निर्माण न होता विपरीत परिस्थिती निर्माण होते. अगदी पोष्टीक म्हणून प्रमाण च्या बाहेर काजू बदाम खाल्ले तर शरीरात रोग निर्माण होतात . आणि अगदी तसेच झाले आहे यूपी,बिहार,झारखंड,ह्या राज्यातून प्रचंड प्रमाणात लोक स्थलांतरित होत असून ते महाराष्ट्र मध्ये येवून स्थायिक होत आहेत . आणि त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्र वर होत आहे .पुढे राज्य संकटात सापडू शकते. महाराष्ट्र पाठोपाठ गुजरात,कर्नाटक,तमिळ nadu, punjab,haryana, दिल्ली ह्यांची त्याच दिशेने वाटचाल चालू आहे. सर्व राज्यात ह्या अनियंत्रित स्थलांतर विषयी रोष निर्माण होत आहे. पंजाब,गुजरात,तमिळ nadu,asam मध्ये लोकांनी रस्त्यावर येवून विरोध केला आहे. तरी डोळे उघडणार नसतील तर पुढे स्थिती नक्कीच गंभीर वळण घेईल. आणि जो पर्यंत स्थिती गंभीर होत नाही तो पर्यंत तिकडे दुर्लक्ष करायचं हा आपला ,भारतीय लोकांचा विशेष खास गुण आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 12/09/2020 - 10:41 नवीन
*बेळगाव : Belgaum लिहल्याने आणि बॅनरवर कन्नड नसल्याने जप्तीची कारवाई* ९/१२/२० बेळगाव : एका फलकावर इंग्रजीत बेलगाम असे लिहिले होते. त्याचा पोटशूळ उठलेल्या कथित कन्नड नेत्याच्या सांगण्यावरून आणि Facebook वरील विरोधामुळे महापालिकेने फलक जप्त केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. शहरात एका मंगल कार्यालयात आयोजित खाजगी कार्यक्रमाची माहिती देणारा इंग्रजी भाषेतील फलक विनायकनगर गणपती मंदिराच्या मागे लावण्यात आला होता. त्यावर Belgaum असे इंग्रजीत लिहिले होते. पण, भाषाव्देषाने पछाडलेल्या एका कन्नड नेत्याने याबाबत महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांनी तो फलक ताब्यात घेतला. लोकभावना लक्षात न घेता बेळगावचे नामांतर करण्यात आले आहे. या नामांतराला मराठी जनतेचा तीव्र विरोध आहे. इंग्रजीत Belgaum असे लिहिण्यात येते. राजकीय पक्ष सोयीची भूमिका घेतात. मराठी लोकांत बेळगाव असा आणि कन्नड लोकांत बेळगावी असा उल्लेख करतात. एकीकडे कानडीकरणाचा फतवा काढणे, भाषिक अल्पसंख्याकांचे हक्क डावलणाऱ्या मराठीव्देष्ट्ये आणि प्रशासनाला आता इंग्रजीमधील बेलगामही खुपू लागले आहे. त्यातूनच मंगळवारी विनायकनगरातील इंग्रजी भाषेतील फलक हटवण्यात आला आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 12/09/2020 - 10:46 नवीन
कर्नाटक सरकारची दडपशाही; निवडणूकीचे अर्ज मराठीतून देण्यास नकार. बेळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज कन्नडमधून दिले जात असल्याने मराठी भाषकांची अडचण होत आहे. निवडणुकीचे अर्ज मराठी भाषेतून मिळावेत, तो आमचा हक्क आहे . यासाठी आज शुक्रवारी (4 डिसेंबर) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय तालुका म. ए. समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला . तसेच, निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच समितीचे तिकीट देण्याचे ठरले. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते . येत्या ग्राम पंचायत निवडणुकीसाठी अर्ज व इतर माहिती मराठीतून उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी तहसीलदारांकडे केली होती. मात्र तहसीलदारांनी फक्‍त कन्नडमधूनच अर्ज व माहिती पाठविण्यात आली आहे. त्यामुळे मराठीतून अर्ज देता येणार नाही अशी दर्पोक्‍ती केली आहे. याबाबत मराठी भाषिकांमधून तिव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. मराठीतून अर्ज व माहिती मिळालीच पाहीजे अशी मागणी जोर धरु लागली आहे. सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या मोठ्‌या प्रमाणात आहे. त्यामुळे निवडणुकीबाबतची माहिती मराठीतून देणे आवश्‍यक आहे. याबाबत माजी आमदार किणेकर यांनी तहसीलदारांना निवडणुक जवळ आली आहे. त्यामुळे मराठीतून माहिती देण्याबाबत विचारणा केली असता सरकारच्या आदेशाप्रमाणे फक्‍त कन्नडमधूनच माहिती दिली जाईल असे सांगत उडवाउडवी करण्याचा प्रयत्न केला, तसेच यावेळी फक्‍त कन्नडमधून माहिती आली आहे. असे सांगत तहसीलदारांनी सरकारची री ओढण्याचा प्रयत्न करीत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला तर बघू असे सांगण्याचा प्रयत्न केला. याबाबत किणेकर यांनी तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरले व दरवेळी प्रमाणेच यावेळी मराठीतून अर्ज देणे आवश्‍यक असून ते द्यावेच लागतील असे स्पष्टपणे सांगितले. प्रशासनाला सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या अधिक प्रमाणात आहे. याची जाणीव असून देखील सातत्याने मराठी भाषिकांचे हक्‍क डावलण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो. तसेच मराठी भाषिकांच्या मतांवर निवडून गेलेले लोकप्रतिनिधीनी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत एक शब्दही उच्चारत नाहीत. उलट सरकारची बाजू घेण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे मराठी भाषिकांकडे मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकप्रतिनिधीला दूर ठेवणे आवश्‍यक आहे. तसेच ग्राम पंचायत निवडणुकीत सर्रास जागांवर समितीचा भगवा फडकविने आवश्‍यक आहे. तरच अन्याय करणाऱ्या कर्नाटकी सरकारला सणसणीत चपराक बसणार असल्याच्या भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत. मराठीतून अर्ज देण्याबाबत तहसीलदारांशी संपर्क साधला होता. मात्र दरवेळी प्रमाणेच उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. मात्र मराठीतून माहिती मिळावी यावर आम्ही ठाम असून मराठी भाषिक बहुसंख्येने असुनही कशा प्रकारची दुय्यम वागणूक दिली जाते, याचा विचार सीमावाशीयांनी करणे आवश्‍यक आहे. -मनोहर किणेकर, माजी आमदार कार्याध्यक्ष म. ए. समिती
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Wed, 12/09/2020 - 11:24 नवीन
हिंदीची जबरदस्ती नको - हे बरोबर आहे. माझ्या ओळखीच्या बहुतांश मध्यमवर्गीय शहरी मराठी लोकांच्या घरात फक्त काम करायला येणार्‍या लोकांशीच ( भांडी/धुणी करायला येणारे, माळीकाका इ.) मराठीतून बोलतात. मराठी बोलणं कमी दर्जाचं समजतात. तुटक-फुटकं हिंदी किंवा इंग्रजी बोलण्यात धन्यता मानतात. आणि त्यांच्याशी मराठीतून बोलायचा प्रयत्न केल्यास उत्तरं हिंदी, इंग्रजीतूनच मिळतात. प्रत्येक वाक्याच्या शेवटी 'यू नोम व्हॉट आय मिन ना..' असं अगम्य काहीतरी बोलतात. पालकांचीच अशी अवस्था तर मुलांकडून काय अपेक्षा ठेवणार. त्यापेक्षा मला मातृभाषेचा अभिमान असणारे दक्षिण - उत्तर भारतीय आवडतात
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 12/09/2020 - 18:57 नवीन
अहो हे तर काहीच नाही. हुच्चभ्रू मराठी मंडळी तर श्वानाशी देखील आंग्ल भाषेत बोलतात. आत्ता बोला !
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 12/09/2020 - 12:05 नवीन
मी आणि माझा मराठी नसलेला मुस्लिम मित्र आणि 2 मराठी च व्यक्ती नी टॅक्सी शेअर केली होती ते दोघे मराठी असून हिंदी मध्ये बोलत होते आणि माझा मित्र मराठी नसून आम्ही दिघे मराठीच बोलत होतो . त्यांनी मला ते बोलून दाखवले मी मराठी नसून मराठी मध्ये बोलत आहे आणि हे दोघे मराठी च असून हिंदी बोलत आहेत.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 12/10/2020 - 04:50 नवीन
असे तर ऑफिस मधे खुपदा पाहीलेले आहे. त्याला कारण इतर लोक मराठी ला "downmarket" समजतात असे काही मराठी लोकांनाच वाटते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा