सैतान
देव मदतीला धावून आल्याचं ऐकलंय पण सैतान ???
१८ नोव्हेंबर १९६२ मध्ये खरोखर एक सैतानच आपल्या मदतीला धावून आला. मेजर शैतान सिंघ भाटी. नेफामध्ये चिनी सैन्य दैत्यासमान आपला भूभाग गिळंकृत असताना लडाखमध्ये मात्र चिन्यांनाच या सैतानाने धडकी भरवली. रेजांग ला सारख्या अतिशय खडतर प्रदेशात तुटपुंजी युद्धसामुग्री आणि फक्त सव्वाशे जवानांसह मेजर शैतान सिंघ यांनी तब्बल तेराशे चिन्यांच्या तेराव्याची सोय केली.
चुशुलच्या साधारण १२ किमी दक्षिणेला ही पावन-खिंड (रेजांग ला) आहे. चुशुल येईस्तोवरच आपली हाडं खिळखिळी झालेली असतात. पुढे पुढे तर रस्ता असा नाहीच. नजर धावेल तिथवर खडकाळ मैदानं आणि डोंगर. अशातच कुठेतरी या "परम-वीरांचं स्मारक आहे.
मनात आलं, इथवर चांगला रस्ता असावा, छाती भरून येईल असा इतिहास सर्वांना कळावा. पण नंतर वाटलं नकोच ते.
खडतर तप केल्याशिवाय जसा देव भेटत नाही तसाच खडतर प्रवास केल्याशिवाय "शैतान"
रेजांग ला स्मारक
जेव्हा रामचंद्र यादव कंपनी कमांडकडे गेला तेव्हा त्याच्यावर कुणी विश्वास ठेवला नाही, एवढंच काय मेजर शैतानसिंगला पळपुटा घोषित केले, त्याच्या अन त्याच्या साथिदारांच्या घरच्यांना त्यांच्या गाववाल्यांनी वाळीत टाकले.-- कसली ही खात्री न करता असला उरफाटा निर्णय, भारतीय सैन्यदलाने घेतला याचे आश्चर्य वाटते.