Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसींगची खोड मोडली

प
पाषाणभेद
Tue, 11/10/2020 - 13:52
💬 12 प्रतिसाद
(पार्श्वभूमी: मिपासदस्य अतृप्त आत्मा यांनी नुकतीच खडकवाडी, खडकवासला गावाला भेट दिली. त्या अनुषंगाने तेथील खासदार खासेराव खडके खासेपाटील यांची साहसकथा त्यांना ऐकवावी असे वाटले. ) खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली खुंखार खासदार खासेराव खडके खासेपाटील यांचा खाजगी खडकेवाडा खडकवासला धरणाच्या खालच्या खडकाळ अंगाला खडकवाडी खुर्द खेड्यात होता. खासेपाटील यांचा खानसामा खच्चून खटकी होता. त्याला खासेरावांचा मुलगा खगेंद्र डोळ्यात खटकत होता. खगेंद्र खूप खाऊ खात असल्याने खानसामा खार खाऊन होता. खानसामा खारे दाणे, खिचडी खाद्यपदार्थ बनवून कंटाळत असे. 'खाई त्याला खवखवे' अशी स्थिती असल्याने खा-खा करणारा खादाडखाऊ खगेंद्र खाऊ खाऊन खो-खो खूप खेळत असे. खगेंद्राचा खून करून यंदाच्या खानेसुमारीत खासेपाटलांच्या खानदानीतून एक नाव कमी करण्यासाठी त्याने खडकसिंग खरबंदा या डाकूला पैसे दिले. "खडकसिंग च्या खडकण्याने खडखडतात खिडक्या", असे खंकाळ (दुष्ट, रागीट, क्रृर, तिरसट), खुजा असलेला खडकसिंग वारंवार खोकलत बोले. खाल्ल्या पैशाला जागत खडकसिंग खबरदारीने खंदकातून बाहेर पडला. खास खेचरावर तो बसला अन खुरडत खुरडत खुशमस्कर्‍या खेळगडींसह खडकवाडीत आला. खोडकिडीसारखा खालावलेला खडकसिंग खगोलात खूप तारे असतांना खडकेवाड्यातील खंदक ओलांडून खोलीत खोलवर शिरला तेव्हा खकाणा उडाला. एक खंगलेला दरवाजा खंगारातून (वीट, पक्की वीट) खिटी (अडसर, पाचर) नसल्याने उखडला होता. खट्याळ खुशमस्कर्यांनी खडकसिंगची खुशामत केली. खुशालचेंडू खडकसिंग खुशीत आला. खुन करण्याची खुणगाठ बांधलेला खडकसिंग खळखळून हसला. खडकेवाडा खंगाळल्यानंतर त्याला खुलासा समजला की खगेंद्र खानदेशात खर्डे खरडतो आहे. या खीळ बसणार्‍या खात्रीलायक खबरीमुळे खूनाच्या कामाचा खेळखंडोबा झालेला खडकसिंग खुळ्यासारखा खचला आणि खासेपाटील खुदुखुदु हसून खदखदू लागले. खवळलेला खडकसिंग खुळा झाला. तलवारीने खडाखड खडाजंगी झाल्यानंतर खासेरावांनी आपला खास खुपीया खबरी खंडू खोडके याचा खुबीने वापर करून खडकसिंगाच्या कामात खो दिला. खडकसिंगने खलबत करून खोड काढण्याच्या आत पोलीस खात्यात ख्यातनाम असलेला ख्यातनाम फौजदार ख्वाजा खुर्शीद खान तेथे आला. त्याने खडकसिंग आणि त्याच्या खोगीरभरतीचा खरपूस समाचार घेतला आणि खटल्याचा खलिता खंडन्यायालात रवाना केला. खुन करण्याचे खूळ करणारा खानसामा खडकेवाड्याच्या शेजारी खाणीच्या खड्ड्यात असलेल्या एक खिडकी, एक खांबी खोलीत खितपत पडला. खरोखर, खरे खडक खडकवासल्यासारख्या खोल खड्ड्यात खचत नाही व खोट्याची खोड खोड्यात पाडते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8771 views

💬 प्रतिसाद (12)
ट
टवाळ कार्टा Tue, 11/10/2020 - 15:43 नवीन
खत्रा खरडलयं :)
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 11/10/2020 - 16:13 नवीन
खो खो खो... ख्या ख्या ख्या..... खि खि खि..!! तलवारीने ऐवजी खडगाने असे टाकले असते तर मिटरमध्ये बसले असते...
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Tue, 11/10/2020 - 16:50 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 11/10/2020 - 18:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 11/10/2020 - 18:51 नवीन
खूप पूर्वी लहानपणी एकदा खुसखुशीत खाकरा, खमण, खोबरेपाक खाता खाता खेळताना खच्चदिशी खड्ड्यातला खडा खुपला होता, ते आठवले.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 11/10/2020 - 18:52 नवीन
खडक-वाडी हे नाव सार्थ करणारा खडखडीत खडकी रस्ता https://m.facebook.com/video_redirect/?src=https%3A%2F%2Fvideo.fnag1-2.fna.fbcdn.net%2Fv%2Ft42.9040-2%2F122624733_415654109440093_1206273528272626677_n.mp4%3F_nc_cat%3D107%26ccb%3D2%26_nc_sid%3D985c63%26efg%3DeyJybHIiOjk0NiwicmxhIjo1MTIsInZlbmNvZGVfdGFnIjoibGVnYWN5X3NkIn0%253D%26_nc_ohc%3D1EYPOBAzg4cAX_unUnq%26_nc_ht%3Dvideo.fnag1-2.fna%26oh%3Db672ece157de1e19ff463cda5e644137%26oe%3D5FAAF9C5&source=misc&id=3445893472163581&noredirect=0&watermark=0&refid=52&__tn__=FH-R आणि हा थितल्या आम्ही घडवलेल्या पूजेचा फोटू... Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 11/10/2020 - 18:53 नवीन
ह्यो खास दिसायलाय.. ह्योच लावा हो! Image removed.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 11/10/2020 - 22:55 नवीन
मस्त जमले आहे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 11/11/2020 - 05:14 नवीन
शब्दसंग्रह अफाट आहे तुमचा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 11/11/2020 - 07:14 नवीन
भारी लिहीलंय.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 11/12/2020 - 08:07 नवीन
खूप खिदळलो! =)) सं - दी - प
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 11/12/2020 - 09:08 नवीन
खतरनाक खरडलंय खाषाणखेद खाऊ...ओह सॉरी पाषाणभेद भाऊ... 😀
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा