Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

दोघे आपण...!!

J — Jayagandha Bhatkhande, Sat, 11/07/2020 - 11:23
दोघे आपण...!! परिणय आपुला, हे नवजीवन, त्यास प्रीतीचे, अनुपम कोंदण, जगा वेगळा वाटे साजण, तरी, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. मनी बांधते मखमली तोरण, छोटे घरकुल, मोठे अंगण, अनुरागाचे त्या, मधुर शिंपण, पण, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. दोन मनांची नाजूक गुंफण, जना मनाचे सुरेख बंधन, विवेक करितो अभिनव कुंपण, कां, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. दोन जीवांचे एकच बंधन, सुगंधी नाते, जणु ते चंदन, आता उरले अबोल क्रंदन, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. कलहामधुनि सदैव घर्षण, संघर्षाचे चर्वित चर्वण, कुठे हरवले ते आकर्षण, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. संसारी या एक उणेपण, आनंदाची भासे चणचण, वादविवादाची ती तणतण, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. दुःखाने जरी अश्रू दाटती, मनसंयम करी नयनी राखण, करावेच का विचार मंथन, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. उभयतांच्या सुखी क्षणांचे, मनात चाले अविरत चिंतन, वैचारिक ती दरी भराया, तडजोडीचे घालू लिंपण, गतस्मृतींची करुनी आठवण, क्षमाशील मग होऊ आपण, एकच होतो दोघे आपण.. एकच होऊ दोघे आपण..!! जयगंधा.. ७-११-२०२०.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3161 views

💬 प्रतिसाद
स
संजय क्षीरसागर Sat, 11/07/2020 - 11:50 नवीन
शेवटही सुरेख झाला आहे. एकच होतो दोघे आपण.. एकच होऊ दोघे आपण..!!
  • Log in or register to post comments
J
Jayagandha Bha… Tue, 11/10/2020 - 08:23 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 11/10/2020 - 09:14 नवीन
कविता आवडली. पण प्रत्यक्षात आणणं कठीण आहे.
  • Log in or register to post comments
V
VRINDA MOGHE गुरुवार, 11/12/2020 - 07:38 नवीन
खुपच छान ! एकच होतो दोघे आपण एकच होऊ दोघे आपण ...मस्तच !
  • Log in or register to post comments
J
Jayagandha Bha… Fri, 11/13/2020 - 15:54 नवीन
  • Log in or register to post comments
J
Jayagandha Bha… Fri, 11/13/2020 - 15:55 नवीन
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा