मेणबत्तीला करा 'राम' 'राम' !
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षी साजरा करूया मेणबत्ती विरहित ख्रिसमस.
मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल अस म्हटलं कि लोक विचारतात कस बर... हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं, ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही.
आणी या मधमाशा कशाचे घर बनवतात ? मेणाचे - आणि मेणबत्ती कशाने बनते मेणापासून !
Dr. Humberto Boncristiani (honey bee husbandry applied researcher at the University of Florida Honey Bee Research and Extension Lab) म्हणतात कि एक साडेपाच इंच मेणबत्ती बनवण्यासाठी १३७.४८ मधमाशा चा बळी द्यावा लागतो . ख्रिसमसच्या दिवसात साधारण २३७ अब्ज मेणबत्त्या जगभर विकल्या जातात , तर किती मधमाशा मारल्या जात असतील! आणि यापासून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड फटाक्यांच्या तुलनेत ५७. २२ पटीने जास्त असतो. फटाका ०.३ ग्रॅम तर मेणबत्ती १७.१६६ ग्रॅम.!
मेणबत्त्या अशा प्रकारे वाया घालवू नका, त्या वीज नसलेल्या छोट्या वाड्या वस्त्यांना दान करून त्यांची अंधारलेली घरे तेजोमय करण्यासाठी मदत करा. आजही जगात ४. ७ अब्ज लोक रोज अंधारात रात्र काढतात. विनाकारण पेटवण्यात येणार्या एवढ्या मोठ्या प्रमाणातील मेणबत्त्या १३२ कोटी गरीब लोकांना वर्षभर उजेड देऊ शकेल.
चला तर मग मेणबत्ती रहित ख्रिसमस साजरा करण्यासाठी सर्वांना फॉरवर्ड करा.
सागर गुरव