Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

ओळख!

र — राघव, गुरुवार, 11/05/2020 - 07:36
संदर्भः लहान मुलांकडे असलेल्या निरागसतेमुळे मी नेहमीच प्रभावित अन् अचंबित होत असतो. आणि खरंतर ते अत्यंत आनंददायी असतं! "अरे खरंच.. आपण असा साधा विचार का नाही करू शकलो?" असं स्वतःला अक्षरशः अनेकदा विचारण्याची वेळ येते ! त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन फार साधा आणि कुतुहलाचा असतो. सरळ स्वभाव असल्यामुळे केमिकल लोचा कमी असतो! परत, जरी त्यांची स्मृती चांगली असते तरी मनात अढी ठेवून वागण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. उलट ते फार सहजपणे गोड वागतात, माफ करतात आणि विसरूनही जातात. कदाचित याच कारणानं लहान मुलं सगळ्यांना हवीहवीशी वाटतात! ह्या अनुषंगानं विचार होत असता, काही ओळी सुचत गेल्या. ती ही रचना. :-) --- जगण्यामधली सहजता मी शोधत असतो! मुखवट्यांची गरज कशाला? समजत नाही.. शिव्या-शाप अन् हेवे-दावे.. सवय जाहली..! अवचित कुणी जर गोड वागला.. समजत नाही! प्रत्येकाची आस खरे तर "दूध" मिळावे! इतरांसाठी मनात "पाणी".. समजत नाही.. आनंदाला शोधत सारे वणवण फिरतो! मग आठव केवळ दु:खाचा का? समजत नाही! प्रेमाची ती नाती-गोती कितीक असती.. प्रेम फक्त का तिथे नसावे.. समजत नाही! --- तेल-वात अन् ज्योत दिव्याची ओळख असते.. माणुसकीची ओळख का मग समजत नाही? राघव

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3623 views

💬 प्रतिसाद
प
प्राची अश्विनी गुरुवार, 11/05/2020 - 07:39 नवीन
क्या बात! प्रेमाची ती नाती-गोती कितीक असती.. प्रेम फक्त का तिथे नसावे.. समजत नाही हे खासच!
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 11/05/2020 - 07:48 नवीन
धन्स! तुझी रचनाही खूप सुंदर! :-)
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 11/05/2020 - 13:01 नवीन
जगण्यामधली सहजता मी शोधत असतो! मुखवट्यांची गरज कशाला? समजत नाही.. ...अगदी .. सुंदर
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 11/06/2020 - 08:03 नवीन
आवडली रचना. सं - दी - प
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा