Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

महारास

J — Jayagandha Bhatkhande, Fri, 10/30/2020 - 08:34
महारास..!! इतकी वर्ष झाली आता, थांबव लपंडावाचा फार्स, नटून थटून आलेय मी, दिसतेय एकदम क्लास, जन्मभर वाट बघतेय, संपले घड्याळाचे तास, कृष्णा, खेळशील माझ्याशी रास..? खूप वर्ष रेटला रे हा, भातुकलीचा संसार बास, आयुष्याच्या सांजवेळी, कधी होई मन हे उदास, दमल्या थकल्या ह्या जीवाचा, निरवी संसार त्रास, गोविंदा, खेळशील माझ्याशी रास..? क्षणोक्षणी संपत जाती, माझे जीवन श्वास, हिरा नसे तरी ह्या कोळशा, मारशील का रे तास, वेड्या माझ्या स्त्री हट्टाला, खुशाल मनोमनी हास, मुकुंदा, खेळशील माझ्याशी रास..? विषय विकार अन् अहंकाराचा, अलगद सोडव फास, किती अवघड तुझ्या परीक्षा, होईन ना मी पास, दह्या-दुधाने न्हाऊ घालीन, भरवीन लोण्याचा घास, अच्युता, खेळशील माझ्याशी रास..? कधी मनाच्या तळघरी, लागे तुझा तपास, कधी उगाच स्वप्नी होई, तव मुरलीचा भास, राधा मीरा नाहीच नाही, मी नाही गोपी खास, मोहना, खेळशील माझ्याशी रास..? तव प्रेमाची गोडी कळाया, उरी नामाची कास, भवसागर हा पार कराया, अंतरी तुझाच वास, तव रंगी मी रंगून जावं, आहे मनीची आस, केशवा, खेळशील माझ्याशी रास..? शरदाचं हे टिपूर चांदणं, पौर्णिमा अन् अश्विन मास, तुझे रुप चित्ती राहो, मनात अविरत ध्यास, माधवा, खेळशील माझ्याशी रास..? माधवा, खेळच माझ्याशी रास....!! जयगंधा.. ३०-१०-२०२०

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2169 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Fri, 10/30/2020 - 10:48 नवीन
उत्तम रचना. सं - दी - प
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/30/2020 - 11:35 नवीन
रास उत्तम जमलाय आहे, आपल्या काव्यरसाचा ओघ असाच चालू राहो.
  • Log in or register to post comments
J
Jayagandha Bha… Fri, 10/30/2020 - 11:40 नवीन
धन्यवाद..!!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 10/31/2020 - 12:52 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा