Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

विजयादशमी शुभेच्छा

V — VRINDA MOGHE, Sun, 10/25/2020 - 09:54
कोवळी आंब्याची पानं विणली तोरणात, पिवळी, केशरी झेंडूची फुलं ओवली दो-यात! तयार केले भरगच्च तोरण, बांधले घराच्या दारात , आज दसरा ! विजयाची जाणीव जागते मनामनात !! आपट्याचं पानं सुवर्ण म्हणून वाटून परंपरा जपतो, अन् मैत्रीचा भाव एकमेकांच्या मनांत जागवतो !! सर्वांना आठवणीने शुभेच्छा देऊन आनंदीत करतो, छोट्या छोट्या अनेक गोष्टींनी नाती बांधून ठेवतो !! दसरा आहे सत्याचा असत्यावर विजय श्रीरामाने रावणावर मिळवलेला विजय वाईटावर होणारा चांगल्याचा विजय दुष्ट प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीचा विजय ! तसाच , आपणही मिळवूया या कोरोनारूपी राक्षसावर विजय ! घराबाहेर पडूया, पण मास्क घालूनच सण साजरे करू, पण अंतर राखूनच अंतर असलं तरी, मना मनांतली दरी मात्र बुजवून टाकू, यंदा आनंदाने, वेगळीच अशी विजयादशमी साजरी करू !! *सर्वांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!* - सौ वृंदा मोघे 25/10/2020

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2466 views

💬 प्रतिसाद
प
पॉइंट ब्लँक Sun, 10/25/2020 - 19:24 नवीन
छान, शेवटचं कडवं अत्यंत मार्मिक आणि सद्य परिस्थितीला अनुरुप आहे .
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 10/29/2020 - 05:48 नवीन
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 10/29/2020 - 05:48 नवीन
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 10/29/2020 - 05:50 नवीन
परक्यांनाही आपलसं करतील असे गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच सदैव असेच राहा तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसर्‍याच्या व विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ------------------------------------- आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक स्वामी मय शुभेच्छा! तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो… हिच ईश्वर चरणी प्रार्थना. शुभ सकाळ...
  • Log in or register to post comments
J
Jayagandha Bha… Fri, 10/30/2020 - 09:05 नवीन
मस्त.. या काळाला अनुरूप..!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा