Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

स्मरणरंजन

न
नीलकंठ देशमुख
Fri, 10/23/2020 - 06:51
💬 4 प्रतिसाद

    
                    

स्मरण रंजन.
रेडिओ (३)
     'पगला कहीं का !'
लंका.
लंकेची ओळख अगदी लहानपणापासून.
रामाच्या गोष्टीतून.
रावणाची लंका.
त्याने सीतेला पळवल्यावर जिथे ठेवले ती लंका.
हनुमंताने जाळली ती लंका.
रामाने समुद्रावर सेतू बांधला ती लंका.
रावणवधानंतर बिभिषणाकडे सोपविली ती लंका. 
  पूढे पं.भीमसेनजींच्या गाण्यात तिचे भारी कौतुक ऐकले.
रम्य ही स्वर्गाहूनि लंका..
गदिमांच्या प्रतिभेला बहर आलेला..
'या लंकेचे दासीपद तरी 'कमला'(लक्ष्मी ) घेईल का?..'

कालांतराने भुगोलातून लंका हा आपला शेजारी देश असल्याचे ज्ञान.
नकाशात भारताच्या पायथ्याशी दिसणारा
नारळाचे आकाराचा छोटा देश.

तेव्हा
तिथल्या पंतप्रधान सिरीमाओ बंदर नायके.
राम रावण युद्धानंतर रामाचे सैन्यातील काही
वानर( बंदर)व त्यांचे नायक,तिकडे स्थायिक झाले असावेत.  त्यांचेच हे  'बंदर नायके' वंशज तर नसतील?
एक शंका.

आकाशवाणी पूणे व मुंबई ब केंद्र,
विविधभारती,ऑल इंडिया रेडिओ की उर्दू प्रसारणसेवा इ.
ऐकता, ऐकता ,श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ही
लंकेची नभोवाणी सेवा सर्वांत प्रिय झाली.

जिगरी दोस्त.
पुराने फिल्मों के गीत, हापी के (आप ही के )गीत,
जाने पहचाने गीत,
सायकल ब्रॅड संगीत सितारे(?)
अनोखे बोल,
हास्य संगीत ,हे जास्त आवडते,
(एक चतुर नार ऐकायला मिळते म्हणून)
दो रंग दो पैलू एक गीत,सरगम आणि काय काय...
आणि अमीन सयानीजींची बिनाका गीतमाला.
(काही वात्रटमुले त्याला
बीन(ना)का (ची)गीतमाला म्हणायचे.)
कान तृप्त करणारी.
बुधवारच्या  रात्रीचे आठ वाजण्याची
आतुरतेनं वाट पाहायला लावणारी.
सरताज.

अनेक वर्षानंतर मी मुंबई ला जॉईंट चॅरिटी कमिशनर असताना,.मखुद्द अमीन सयानीजींचे मला
भेटायला येणे आणि मी त्यांच्या थोडा उपयोगी पडणे ,
हा विलक्षण योग माझ्या जीवनात .

बहुतेक कार्यक्रम श्रोता भाई बहनोंको शामिल करनेवाले.
ही भाई बहेन मंडळी व सगळे श्रोता संघ,
बहुधा मध्य भारताचे पट्टयातलीच.
मध्यप्रदेश ,राजस्थान , महाराष्ट्रातील विदर्भ
( गोंदिया ते बुलढाणा).
मराठवाड्यातील फार तर बीड ,जालना.
पश्चिम महाराष्ट्रातील गाव चुकूनही नसे.
आमच्या 'बीडा'च्या काही श्रोता भाईयोंकी नावे
निवेदकाने उच्चारली  की कोण कौतुक.
रस्त्याने  ही मंडळी (बहुतेक  टपोरीच)  दिसली की
आम्ही शाळकरी पोरं माना वळवून पाहात.
तेही उगीच कॉलर टाइट करून जात. असो.
एकाकार्यक्रमात.
(नाव आठवत नाही)
श्रोता भाई बहेन सिनेमातील गाण्यास जोडून असलेला
प्रसंग लिहून पाठवायचे .
तो वाचून   गाणे ऐकवले जायचे
निवेदनाचा शेवट साधारण पणे..
'फिर उसके होठों परा आया ये गीत .'/
'और वो गुणगुणा उठा/उठी ये गीत."

गाणी, रेडिओ ,आणि  सिनेमा चे एवढे वेड
की घरातले म्हणायचे..
'पगला कहीं का! '
                         ( क्रमशः )
                  नीलकंठ देशमुख   .
                   ८७९३८३८०८०.
        nilkanthvd1@gmail.com

    


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1846 views

💬 प्रतिसाद (4)
न
नूतन Fri, 10/23/2020 - 09:29 नवीन
जुन्या आणवणी जागल्या. पुरानी फिल्मोंके गीत मध्ये दर महिन्याच्या एक तारखेला लागणारं...खुश है जमाना आज पहिली तारीख है.. हे न चुकता ऐकायचं. आणि अखेरचं गीत बहुदा कुंदनलाल सैगलचं असायचं.
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Sat, 10/24/2020 - 06:08 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 10/23/2020 - 11:26 नवीन
एक आवडता कार्यक्रम. साज और आवाज. एखाद्या वाद्यावर वाजवलेले गाणे आणि मग ते गाणे असे स्वरुप असे. खुप चांगल्या वादकांची आणि वाद्यांची ओळख त्यामुळे झाली. मला वाटते हा कार्यक्रम विविध भारती वर असे.
  • Log in or register to post comments
न
नीलकंठ देशमुख Sat, 10/24/2020 - 06:08 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा