Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

इव्हेंट होरायझोन : खूप चांगला भयपट

स
साहना
Mon, 10/19/2020 - 03:25
💬 7 प्रतिसाद
स्पेस होरर हा भयपटांचा प्रकार मला विशेष प्रिय आहे. नेहमीच्या भूता खेतांच्या चित्रपटा पेक्षा येथील भय हे वेगळ्या प्रकारचे असते. आवर्जून बघावे असे स्पेस हॉरर चित्रपट अनेक आहेत ह्यांतील एलियन हि सिरीज मला विशेष प्रिय आहे. पण इव्हेंट होरायझोन हा चित्रपट (एलियन सिरीज मधला नसला तरी) खरोखर सुरेख आहे. इव्हेंट होरायझोन हे पृथ्वीवरील एक स्पेस क्राफ्ट दुसऱ्या आकाशगंगेंत पाठवले जाते आणि अचानक गायब होते. सात वर्षांनी सौरमालिकेच्या बाहेर अचानक हे यां प्रकट होते आणि पृथीवर एक सिग्नल पाठवते. ह्या यानाची चौकशी करण्यासाठी एक टीम पाठवली जाते. इव्हेंट होरायझोन यान बाहेरून व्यवस्थित असले तरी आंत कोणीच जिवंत नसतो. नक्की काय घडले हे पाहण्यासाठी अवकाशयात्री व्हिडीओ लॉग पाहतात, त्यांत इव्हेंट होरायझोन चा संपूर्ण क्रू एक मेकांशी संभोग करत एकमेकांची हत्या करत आहे आणि आपले डोळे स्वतःहून खेचून बाहेर काढत आहे असे दृश्य पाहायला मिळते. ते पाहून सर्वच जण हादरून जातात. इव्हेंट होरायझोन यानावर एक गुप्त तंत्रज्ञान (ग्रॅव्हिटी ड्राईव्ह) असते आणि त्याद्वारे दुसऱ्या विश्वांत प्रवेश करण्यासाठी वर्म होल निर्माण करण्याची शक्ती असते. ह्या वर्म होल मधून हे यान दुसऱ्या विश्वांत गेले होते आणि हे विश्व एक नरका प्रमाणे होते. इथे ह्या यानाला स्वतःचा असा जीव प्राप्त झाला आणि ते पुन्हा आमच्या सौरमालेंत प्रकट झाले. हळू हळू अवकाश यात्रींना ह्या यानावर भास होऊ लागतात, विचित्र अपघात होतात आणि शेवटी त्यांचे मूळ यान नष्ट होऊन सर्वजण इव्हेंट होरायझोन वर अडकतात. पुढे काय होते हे मी सांगून रसभंग करत नाही पण कथा सोपी वाटली तरी ज्या पद्धतीने ती मंडळी जाते त्यातून दर्शकांना विविध प्रकारचे क्लस्सिक स्पेस भय चकित करणारे क्षण अनुभवायला मिळतात.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3583 views

💬 प्रतिसाद (7)
क
कानडाऊ योगेशु Mon, 10/19/2020 - 05:21 नवीन
कुठे पाहायला मिळेल?
  • Log in or register to post comments
स
सत्य धर्म Tue, 10/20/2020 - 11:30 नवीन
कुठे पाहायला मिळेल?
  • Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल Tue, 10/20/2020 - 21:43 नवीन
कुठे पाहायला मिळेल?
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Wed, 10/21/2020 - 00:16 नवीन
हा खुप जुना चित्रपट आहे, १९९७ ला प्रदर्शीत झाला आहे. फारसा चालला नाही. साहना यांनी खुप चांगले लिहीले आहे, पण चित्रपट पाहील्यावर अपेक्षाभंगाची शक्यता जास्त आहे.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Wed, 10/21/2020 - 14:28 नवीन
ट्रेलर बघितल्यावर असंच वाटलं! -(सिनेमाप्रेमी) सोकाजी
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 10/21/2020 - 10:47 नवीन
चित्रपट आवडला नाही . लेख उत्तम आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 10/22/2020 - 04:12 नवीन
दोन वर्षांपूर्वी पाहिला होता. चांगला विषय पण चित्रपट एवढा खास नाही. भितीदायक तर अजिबात नाही. सस्पेन्स सुद्धा तितकासा नाही. कदाचित टिव्हीवर पाहिल्यामुळे तसं वाटलं असावं.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा