करोनात्रस्त त्रागा
संदीप खरे यांची क्षमा मागून,
चाल - मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो
करोनामुळे काही लोक पूर्ण घरात बसून आहेत, सगळी काळजी घेत, आणि काही लोक सगळे नियम धाब्यावर बसवून फिरतायत, त्यावरून झालेला वैताग आता कवितेतून व्यक्त होत आहे
मी नाकावरती दहा मुखवटे आवळतो
तो उघड्या नाकपुड्यानी गावातून फिरतो
मी दाव्याच्या बैलापरी झालो बंदी
तो उनाड रेड्यापरि धावे स्वच्छंदी
मी दाव्यावरती पाय गंजवित बसतो
तो उघड्या नाकपुड्यानी गल्लीत फिरतो
डोळ्यात माझिया पोलीसांची भीती
असते डोक्यावर हेल्मेटही चिलखती
तो त्याच पोलिसांनाही खुन्नस देतो
तो उघड्या नाकपुड्या आम्हाला हसतो
मी शिंकेच्या आवाजाला घाबरतो
अन दारे खिडक्या लावून घरात लपतो
तो त्याही आवाजाला देऊन संगीत
टिकटॉक बनवून रोज व्हायरल होतो
मी मोजून सोशल distancing ची खोली
पट्टीने मोजून हात, बोलतो बोली
तो सरळ तोडूनी लाईन घुसतो आणि
वाण्याच्या हातून घेऊन जिन्नस जातो
हे सगळे होऊन पण, शेवटी या काळजी घेणाऱ्या माणसाला करोना झालाच, मग तो वैताग आता त्याने व्यक्त केला आहे.. एवढ्या वेळात याने दुसऱ्या माणसाला *फाटकी चड्डी* च्या धर्तीवर *उघड्या नाकपुड्या* असे नाव देऊन टाकले आहे.. हा माणूस करोना होऊन 21 दिवस हॉस्पिटलात जाऊन आला, पण उघड्या नाकपुड्या मात्र अजून फिरतोच आहे..
आता बघा तो वैताग कसा व्यक्त होतो!!
मी करी मुखवट्यांचाच नवा शृंगार
पण तरी करोना करे मजवरी वार
तो "उघड्या नाकपुड्या" सर्वांना छळतो
का कळे करोनाही त्याला घाबरतो
- आनंद वैद्य
💬 प्रतिसाद
स
सॅगी
Tue, 10/13/2020 - 13:39
नवीन
आवडली..
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Tue, 10/13/2020 - 15:18
नवीन
जमलीय!
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 10/13/2020 - 15:27
नवीन
हाहा. त्रागा मस्त व्यक्त केला आहे.
- Log in or register to post comments
व
वीणा३
Tue, 10/13/2020 - 17:46
नवीन
मजेशीर :D
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Wed, 10/14/2020 - 03:45
नवीन
भारी लिहिले आहे. :-)
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 10/14/2020 - 05:06
नवीन
धन्यवाद!!
- Log in or register to post comments
ड
डॅनी ओशन
Wed, 10/14/2020 - 05:09
नवीन
हिही
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
Wed, 10/14/2020 - 07:27
नवीन
खरेच आहे, त्रागा होणारच.
- Log in or register to post comments