Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

विश्वास

V — VRINDA MOGHE, Sun, 10/11/2020 - 11:02
*विश्वास* तो कोसळतो, सहस्त्रधारांनी अविरत अखंड आपल्याच नादात.. तीच्या डोळ्यातली वेदना... निथळते..तीच्याच फाटक्या पदरात ! तीच्या खोपटात दोन भगुली, ओल्या काटक्या नी थंड चूल.. रिकामे डबे, अन् ओच्यात, भुकेनं रडून थकलेलं मूल ! तीचे डोळे पावसाच्या आरपार, आसावले, वाटेवर धन्याच्या तुंबळ पावसातही लेकराला आणेल.. पसाभर तरी कण्या धान्याच्या ! पावसाला आळवते मनातून थांब रे , असा नको माजवू कहर, गेला धनी कामाला, परतून येउदे, तोवर जोराची, तुझी झड ती आवर ! उलटता रात्र प्रहर, पाऊस थंडावला, धनी येता आनंदली.,चूलीं घातला निखार, शिजवल्या कण्या, आजच तरी भागलं, उद्याची चिंता नाही, घातला देवावर भार !! ज्यानं दिली चोच, दाणा पाणीही योजतो, कष्ट करत्या हातांना., 'त्यांचा' देवच पोसतो ! ©️सौ वृंदा मोघे 18/06/2020

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1516 views

💬 प्रतिसाद
आ
आंबट चिंच Sun, 10/11/2020 - 12:09 नवीन
2 वर्षाचा उटटा एकदम एकाच दिवशी काढायचाय काय ? विश्वास ठेवा मिपाकर नेहमी चांगलं असेल तर प्रतिसाद देतातच.
  • Log in or register to post comments
V
VRINDA MOGHE Sun, 10/11/2020 - 12:43 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा