Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

आज बेत काय करावा?

न
निनाद
Sat, 10/10/2020 - 02:05
🗣 56 प्रतिसाद
रोज जेवणाचा बेत काय करावा हा प्रश्न रोजच्या रोज आ वासून समोर उभा असतो. खिचडी, पिठले आणि बटाट्याची भाजी असे तेच ते खाऊनही कंटाळा येतो. अनेकदा फक्त वेगळे काहीतरी हवे असते जे आपण बर्‍याच दिवसात केलेले नसते. पण ते नवीन सहज सुचतही नाही. पण कुणीतरी सुचवले तर मात्र नवीन गोष्टी करायला उत्साह येतो. म्हणून अशा जेवणाच्या बेतासाठी हा धागा आहे. आता यात पिझ्झा मागवला. आज आम्लेट पाव ते आज जेवायला वरणभात, शेपुची भाजी आणि पोळी असे ही असू शकते. अनेकदा वरणभातासारख्या पदार्थात अनेक वेगळे प्रकार असतात. जसे कुकरचा वरण भात वेगळा लागतो तर भाताचे पाणी काढून केलेला फडफडीत भात वेगळा लागतो. वरणाला कधी कढीपत्त्याची फोडणी तर कधी चिंच गुळ घालून केले वरण. असे अनेक बेत तयार होऊ शकतात. कधीकधी आपले जेवणाचे बेत फसतात आणि त्यातून भलतेच अनपेक्षित बेत तयार होतात. कधी उरलेल्यातून भन्नाट चविष्ट प्रकार बनतात. जसे उरलेल्या पोळ्यांचा कुस्करा. असे सगळे प्रकारही येथे चालतील. जेवणात जोडीला कोणकोणत्या कोशिंबीरी घेता की फक्त कच्चा कांदा ते ही लिहा. वेगळे काही देणार असाल तर यात पाककृती छायाचित्रांसहीत आल्या तर बरे हे वेगळे सांगायला नकोच! या शिवाय नाश्त्याचे पदार्थ पण आले तरी उत्तम. चला तर एक जंत्री तयार करू या. तर मंडळी सांगा काय करायचे आज जेवायला.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24512 views

🗣 चर्चा (56)
न
निनाद Tue, 10/27/2020 - 22:44 नवीन
आज साधी मुगाची खिचडी त्यावर तूप. शिवाय लसणाचे तिखट. जोडीला भरापुस सॅलड. शेवटी गोड म्हणून एक लहानसे आईस्क्रीम. Image removed.
  • Log in or register to post comments
न
निनाद Sun, 11/01/2020 - 23:50 नवीन
चिकन बिर्याणी आणि शोरबा, सोबत शोरबा,आणि सॅलड Image removed.
  • Log in or register to post comments
न
निनाद Sun, 11/01/2020 - 23:52 नवीन
शोरबा असा होता. काळा मसाला... एकदम जबरदस्त! Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 11/04/2020 - 05:33 नवीन
कोथिंबीर वडे Image removed. सोबत टॉमॅटो सॉस चिंचेची चटणी आणि श्रीरचा सॉस.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 11/10/2020 - 22:52 नवीन
का ब र झणझणीत वर लिंबू, लोखंडी कढईत केलेली लसणाच्या फोडणीची चवळीची उसळ आणि लाल भात. आज सॅलड काही नव्हते फक्त टामाटू! Image removed.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 11/21/2020 - 14:43 नवीन
मसाले भात आणि कोशिंबीर - शनिवार असल्याने बाकी सगळे शाकाहारी, मी एक ऑमलेट खाणार :P
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा