त्याकाळी ते का शक्य झालं नसावं?
मराठी ही भाषाकुळानुसार 'इंडो-आर्यन' भाषाकुलात येते.म्हणजेच मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे.महाराष्ट्राच्या पूर्वेला तेलंगण आणि महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व भागाला जोडून असणारा प्रदेश कर्नाटक आहे.तेलंगणात तेलुगू तर कर्नाटकात कन्नड या भाषा बोलल्या जातात.कन्नड आणि तेलुगू या दोन्ही भाषा द्रविड या भाषाकुलात येतात.
उत्तरेकडून आर्यांच्या टोळ्या महाराष्ट्रात आल्या आणि येताना त्यांनी सोबत स्वत:ची संस्कृत भाषा सुद्धा आणली.ती महाराष्ट्रात पसरवली किंवा लादली किंवा देवाणघेवाणीतून पसरली असे समजू. या टोळ्या महाराष्ट्रात येण्यापूर्वी सध्याच्या महाराष्ट्रात कोणतीतरी भाषा अस्तित्वात होतीच.ती जी कोणती असेल ती एखादी द्रविड कुलोत्पन्न भाषाच असणार हे तर उघड आहे.
आता प्रश्न असा आहे की आर्यांच्या टोळ्यांना द्रविड कुलोत्पन्न भाषा बोलणार्या प्राचीन महाराष्ट्रात संस्कृत भाषा पसरवणं इतकं सोपं का गेलं असावं? सोपं अशाकरता म्हणतो आहे कारण जे आर्य महाराष्ट्रात आले आणि संस्कृत भाषा इतक्या मोठ्या प्रमाणात पसरवू शकले की सध्याच्या महाराष्ट्रात प्राचीन काळी बोलली जाणारी द्रविड कुळातली भाषा पुसली जाऊन किंवा विरली जाऊन(नक्की काय तांत्रिक शब्द वापरावा?)तिथे इंडो-आर्यन गटातली संस्कृतोद्भव मराठी विराजमान झाली.पण हाच प्रकार महाराष्ट्राला चिकटून असणार्या सध्याच्या तेलंगण किंवा कर्नाटकात का शक्य झाला नसावा? आर्यांना संस्कृत भाषा महाराष्ट्रात पसरवणं इतकं सोपं का गेलं असावं? प्राचीन काळच्या कन्नड आणि तेलुगू भाषिक प्रदेशात संस्कृतचा मारा हा महाराष्ट्रात केला तितका करणे आर्यांच्या टोळ्यांना शक्य का झाले नसावे? त्यांना नक्की कशामुळे संस्कृत कन्नड आणि तेलुगूभाषिक प्रदेशात संस्कृत पसरवणे अवघड गेले? भौगोलिक कारणे होती की अन्य कारणे होती?
याला जोडूनच एक उपप्रश्न असा की एखादी भाषा इंडो-आर्यन गटात टाकायची की द्रविड गटात हे भाषातज्ज्ञ कसे ठरवतात? किंवा त्यांनी कसे ठरविले? काय निकष असतात याबाबत?
(मी इतिहासतज्ञ नाही किंवा भाषातज्ज्ञही नाही.या दोन विषयांची आवड असणारा साधा वाचक आहे.निवेदनात लिहिताना काही तांत्रिक किंवा माहितीतल्या चुका झाल्या असल्यास सुधाराव्यात.त्याबद्दल संबंधितांचा आभारी राहीन. _/\_)
🗣 चर्चा
(72)
G
Gk
Mon, 10/12/2020 - 05:27
नवीन
हे ज्ञान तुमच्याकडेच ठेवा
वो पायलट का बेटा है
- Log in or register to post comments
स
सॅगी
Mon, 10/12/2020 - 06:17
नवीन
पायलट का बेटा पायलट होता है हे ज्ञान तुम्हाला कुठुन मिळाले? शाळेत शिक्षकांऐवजी चपराशाकडून शिक्षण घेतलेत की काय?
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Sun, 10/11/2020 - 18:31
नवीन
हो ना.. आम्ही सहिष्णू असल्याची पोचपावती च देत आहेत जगाला.. कारण इतके फाटे पडून सुद्धा आम्ही अजूनही सर्वांनां आजही अड्जस्ट करून घेतो.
इतर कोणी पंप्र असं म्हणू शकेल काय.. स्पेशली तुमच्या तिकडचा..
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 10/13/2020 - 16:18
नवीन
१५० % आरक्षण मिळाले असते.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sun, 10/11/2020 - 11:00
नवीन
बंगाली अपभ्रंश भाषेपासून मराठी निर्माण झाल्याचे कुठे वाचलेत गामा पैलवान?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 10/11/2020 - 20:29
नवीन
उपयोजक,
अहो, बंगाली भाषा अपभ्रंश पासनं निर्माण झाल्याचं मी वाचलंय. संदर्भ : इथलं शेवटचं वाक्य :- https://en.wikipedia.org/wiki/Bengali_language#Ancient_languages_of_Bengal
तशा अर्थाने मराठीची पैतृक भाषा निश्चित रूपाने दाखवता येत नाही म्हणे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Mon, 10/12/2020 - 09:55
नवीन
गा.पै. यांच्या प्रतिसादाखाली रोचक चर्चा !
आणखी युक्तिवाद वाचायला आवडतील.
(छोटी जाहिरातः आमच्या कडे सवलतीच्या दरात पॉपकॉर्न मिळतील)
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 10/12/2020 - 20:18
नवीन
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 10/12/2020 - 20:25
नवीन
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 10/12/2020 - 06:45
नवीन
"दक्षिणी भाषा या द्राविडी आणि म्हणून मूळचे आणि उत्तरे कडून आलेल्या आर्यानी लादलेल्या संस्कृत प्रभाव असलेल्या भाषा म्हणजे बाहेरचे " एक समज समाजात दिसतो तो कितपत खर आहे कोण जाणे
यात लिपी मुले असा समज निर्मण झाला असावा का? असे मनात येते
म्हणजे असे कि ढोबळ मानाने बघितले तर
एकीकडे मराठी हिंदी गुजराथी आणि बंगाली आणि कदाचित पंजाबी भाषा जी लिपी वापरतात ती आणि संस्कृत ची लिपी हि खूप एकमेकांजवळची ( खास करून मराठी / हिंदी ) आहे
आणि दुसरीकडे ४ दक्षिणी भाषणाच्या लिप्या एकदम भिन्न वाटतात
म्हणून तर असा समाज पसरवला गेला आहे का?
पण मग असा प्रश्न पडतो कि या दक्षिणी भाषेत पण भरपूर संस्कृत शब्द आहेत कि !
पण भौगोलिक रित्या तर भारताकडे कडे येण्याचा स्थलांतराचा मार्ग हं पश्चिमेकडून जास्त दिसतो मग कदाचित खरे हे हि असले कि जे कोण आर्य होते ते आले असतील बुवा पश्चिमेकडून आणि टाकलं असेल आपला प्रभाव?
खरे काय कोण जाणे ? सोप्या शब्दात कोणी सांगेल काय ?
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 10/12/2020 - 10:01
नवीन
सर्व भारतीय भाषांच्या लिप्या या ब्राह्मी या लिपीपासून निर्माण झाल्या आहेत. (उर्दू हा अपवाद. उर्दू भाषा ही फार्सी/अरबी भाषिक आक्रमकांमुळे ते आक्रमक भारतात आल्यानंतर निर्माण झाली आहे.)
ब्राह्मी या एकाच लिपीपासून निर्माण झाल्याने त्यांच्यात साहजिकच एकरुपता आहे.त्यासंबंधीचे हे पुस्तक पहावे.
भारतीय लिपीचे मौलिक एकरुप
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA.pdf
- Log in or register to post comments
G
Gk
Mon, 10/12/2020 - 10:41
नवीन
उर्दू भाषा पूर्णपणे परदेशी नाही
पूर्वी हिंदी सारखी एक भाषा होती
त्यात संस्कृत सदृश्य व फारशीसदृश्य दोन्ही शब्द मिक्स झाले होते
कालांतराने संस्कृतजन्य बोली व देवनागरी लिपी म्हणजे हिंदी झाली
आणि फारशिजन्य शब्द आणि उर्दू लिपी म्हणजे उर्दू भाषा झाली
मोगल ए आजम , मेरे मेहेबूब हे उर्दू सिनेमे आहेत
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 10/12/2020 - 16:02
नवीन
उपयोजक,
फारसी, अरबी, इत्यादि लिप्यादेखील खरोष्टी कुटुंबाच्या सदस्य आहेत. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Abugida#Development
इथे खरोष्टी व जुन्या अरेमिक लिपी एकमेकींशी संबंधित असल्याचं म्हंटलंय. ओल्ड टेस्टामेंट ची मूळ आवृत्ती अरेमाईक भाषेत ( व लिपीत देखील ) आहे. आजच्या अरबी लिपी वर अरेमाईक भाषेचा नि:संशय प्रभाव आहे. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Arabic#Influence_of_other_languages_on_Arabic
खरोष्टी ही भारतीय लिपी खरोष्ट्री म्हणजे खर + उष्ट्र ( = गाढव + उंट ) यांच्या एकीकरणातनं उत्पन्न झालेली आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 10/12/2020 - 16:53
नवीन
फारसी , अरबी या ब्राह्मीपासून निर्माण झाल्या आहेत का?
मागे नागे जायचंच झालं तर पार अश्मयुगातल्या चित्रलिपीतही साम्य मिळू शकेल. ;)
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 10/12/2020 - 18:47
नवीन
उपयोजक,
ब्राह्मी कुळातल्या लिप्यांचा प्रवास असा आहे :
संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Brahmic_scripts#cite_ref-4
आता जे लोकं/लिप्या भारताबाहेर पूर्वेकडे वळून गेले, ते पश्चिमेकडे गेले नसतील का?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सुनील
Tue, 10/13/2020 - 04:53
नवीन
म्हणजे काय? उद्या कुणी चिनी चित्रलिपीसिद्धा ब्राह्मी-खरोष्टीपासून निर्माण झाली आहे असा दावा केला तरी मला आश्चर्य वाटणार नाही!!!
पण अडचण एवढीच आहे की -
आपल्याच ब्राह्मी नि खरोष्टी आपल्याल्याच वाचता येत नव्हत्या तेव्हा जेम्स पिन्सेपने आपल्याला त्या वाचून दाखवल्या.
आता निदान हडप्पा लिपीचे कोडे तरी आपले आपण सोडवू, नाहीतर पुन्हा एखादा प्रिन्स्पेप ते वाचून दाखवील आणि आपण बसू पोकळ बाह्या फुरफुरावीत!
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 10/13/2020 - 15:29
नवीन
सुनील,
प्रिन्सेपच्या आधी गुप्त ब्राह्मी लिपी रीतसर वापरांत होती. प्रिन्सेपची ब्राह्मी ही त्यास नव्याने सापडलेली अशोकी ब्राह्मी आहे. फार काय अशोक हे नाव देखील प्रिन्सेप च्या आधी ( म्हणजे १८३७ च्या आधी) सापडंत नाही.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 10/14/2020 - 05:29
नवीन
आपलेच शिलालेख आपल्याला वाचता येत होते काय? ते प्रिन्सेपने वाचून दाखवले नाहीत काय?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 10/14/2020 - 14:51
नवीन
सुनील,
ही लिपी प्रिन्सेपने काय एकट्याने उलगडली का? त्यानेही स्थानिक पंडितांची मदत घेतली होतीच.
ही नव्याने उघडकीस आलेली लिपी आहे. ती देशी पंडितांना ताबडतोब वाचता आली पाहिजे, असा अट्टाहास नको.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 10/12/2020 - 20:35
नवीन
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 10/12/2020 - 22:04
नवीन
उपयोजक,
मराठी जर कल्लोळभाषा ( = क्रियोल ल्यांग्वेज ) असेल तर तिचं व्याकरण सुरचित कसं काय, असा प्रश्न उपस्थित होतो. व्यवस्थित व्याकरण असेल तर त्या भाषेस कल्लोळ म्हणू नये, असं माझं प्रथमदर्शी मत पडतं.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Tue, 10/13/2020 - 05:22
नवीन
ज्यावेळी द्रविड आणि आर्य हे सांप्रतच्या महाराष्ट्र देशी सुरुवातीला विविध कारणांनी भेटत असतील (युद्ध,व्यापार,आक्रमकांच्या भितीने पळून येणे,पूर वगैरे)त्यावेळची ती फेज आहे.
सध्याच्या मराठीचा अंतिम पडाव हा वरच्या फोटोत दिल्याप्रमाणे संस्कृतचा प्रभाव असलेला असा आहे.ज्ञानेश्वर वगैरे त्यावेळच्या तत्वज्ञांना संस्कृत शिकावी लागली.नंतरच्या काळातही पेशवाईच्या काळातही संस्कृतोद्भव शब्दांचा वापर भरपूर असणारेत.आज नागर मराठीत ७०% शब्द संस्कृतोद्भव आहेतच की!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2