प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे ....( आजकालचं)
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी अगदी सेम असतं..
सक्काळी उठल्या उठल्या पहिला मेसेज चेक करता?
झोपेतसुद्धा मोबाईल उशीपाशीच ठेवता?
काय म्हणता, Last seen चेक करत उशीरापर्यंत जागता??
मिशीतल्या मिशीत किंवा गालातल्या गालात दिवसभर हसत असता?
म्हणजे मग झालं तर! घोडं गंगेत न्हालं तर!
व्हर्च्युअल जरी असलं, तरी बावनकशी जेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
ज्या प्रोफाइलला आपण हळूच पहात असतो,
तिथे typing दिसणं ...म्हणजेच feeling loved असतं.
आणि online दिसूनही blue tick न दिसणं,
काय सांगू? लईलईच जड असतं..
Hmm, ok , yes no यापुढे गोष्ट जाते
J1 झालं का ला केव्हाच bypass करते..
काहीतरी वेडं फुलतं, त्याला काही name नसतं.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी अगदी सेम असतं.
मोठ्ठा बदाम पोस्टूनसुद्धा प्रेम करता येतं,
Hi Gm म्हणून सुद्धा प्रेम करता येतं,
स्टेटस वरचा पहिला view म्हणजेसुद्धा प्रेम असतं,
Story वरचा पहिला comment म्हणजेसुद्धा प्रेम असतं.
Reply न करता गप्प रहाणं म्हणजे प्रेम असतं,
Dp बदलून त्रास देणं हेदेखील प्रेम असतं.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदीअगदी सेम असतं...
पाडगाकरांची माफी मागून...
💬 प्रतिसाद
प
प्रचेतस
गुरुवार, 10/01/2020 - 05:35
नवीन
क्या बात है, एकदम झक्कास..!
- Log in or register to post comments
B
Bhakti
गुरुवार, 10/01/2020 - 06:12
नवीन
मस्तच
काहीतरी वेडं फुलतं, त्याला काही name नसतं..
.
वेडाला या नाव नकोच,धागे जुळले म्हणून मन झुरत
फुललेला फुलोरा,उगाच बडबड कुठलस मौन तोडत !
..भारी ओ
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 10/01/2020 - 07:44
नवीन
वाह!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 10/01/2020 - 07:08
नवीन
झकास... आवडले अधुनिक प्रेमायण,
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/01/2020 - 07:28
नवीन
कविता लैच आवडली, म्हणजे थेट भिडलीच म्हणा ना...! बाकी, सारखं डीपी आणि स्टेटस पाहणारे दोन मित्र आठवले. सारखं एकमेकांना अपडेट्स देत असतात ते आठवलं.
बाकी, आमची एक आठवण लैच तान द्यायची. लाष्ट सीन तुझं तर यव होतं आणि त्यंव होतं. मेसेज रीड होता.
रिप्लाय द्यायला वेळ नव्हता वाटतं. लैच काम असतं वाटतं. अरारा, लै तान असतो तो....आता लाष्ट सीन तीन-चार महिन्यापूर्वीचं दिसतं अशी सोय करुन घेतली आहे. असो. सज्जन माणसांना तान असतातच म्हणा.
फक्त त्यांचं आणि आमचं सेम असतं म्हणून सहन करणे आहे.
-दिलीप बिरुटे
(आठवणीकार)
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 10/01/2020 - 07:37
नवीन
डायरेक्ट तीन चार महिन्यांंपूर्वीचं???
ती सोय कशी करतात हो???
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/01/2020 - 14:10
नवीन
थर्डपार्टी अॅपने हे सर्व करता येते. समजा आत्ता लाष्टसीन ऑफ केलं की ते आजचीवेळ दाखवतं. मग पुढे बंद..... पण, आपलं जसं लास्ट सीन दिसत नै तसं दुस-याचंही पाहता येत नाही. दुसरा कधी ऑनलाइन येतो जातो ते बघायचं असेल तर आपलंही लाष्टसीन सुरु करावे लागते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 10/01/2020 - 08:44
नवीन
रच्याकने एक मोठ्ठी चूक झालीय कवितेत.
सासं , ते बावनखणी ऐवजी बावनकशी कराल का plz?
:)
- Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर
गुरुवार, 10/01/2020 - 08:48
नवीन
मी डोकं खाजवतच होतो, की बावनखणी रत्न म्हणजे नक्की काय अर्थ होत असेल! :-)
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 10/01/2020 - 09:00
नवीन
:)
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
गुरुवार, 10/01/2020 - 14:44
नवीन
प्ण 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक'! साठी ठेवायला हवी होती.
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 10/01/2020 - 15:44
नवीन
फेसबुकवर मागे टाकली होती त्यामुळे विशेषांकात देता आली नसती.
- Log in or register to post comments
व
वीणा३
गुरुवार, 10/01/2020 - 15:48
नवीन
सुंदर, मस्तच :)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 10/02/2020 - 17:52
नवीन
=))
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Tue, 10/06/2020 - 13:50
नवीन
सर्वांना धन्यवाद!
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Sun, 10/11/2020 - 02:47
नवीन
आधुनिक प्रेमकविता आवडली.
- Log in or register to post comments
स
स्मिताके
Fri, 10/16/2020 - 19:24
नवीन
मस्त आहे कविता.
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Sat, 10/17/2020 - 18:01
नवीन
आवडली कविता !
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sat, 10/17/2020 - 21:07
नवीन
भारी लिहिलंय..
आवडली कविता
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 10/29/2020 - 03:41
नवीन
धन्यवाद सगळ्यांंना!
- Log in or register to post comments
J
Jayant Naik
गुरुवार, 10/29/2020 - 11:13
नवीन
एकदम मस्त कविता .आवडली
- Log in or register to post comments
J
Jayant Naik
गुरुवार, 10/29/2020 - 11:13
नवीन
एकदम मस्त कविता .आवडली
- Log in or register to post comments
J
Jayagandha Bha…
Fri, 10/30/2020 - 08:48
नवीन
मस्त कविता..!!
- Log in or register to post comments
क
केदार पाटणकर
Mon, 11/23/2020 - 07:34
नवीन
मस्त झाली आहे.
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Wed, 11/25/2020 - 08:47
नवीन
Jayant naik, jayagandha आणि केदार, धन्यवाद!
- Log in or register to post comments
R
rushikapse165
Sat, 11/28/2020 - 07:58
नवीन
एकदमच भारी!
- Log in or register to post comments