Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

हळव्यांची गळवे

उ — उपयोजक, Sun, 09/27/2020 - 15:36
मनावर यांच्या ठसठसणारी गळवे आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. गैरसमज करुन घ्यायला हे नेहमी पुढे आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. हे इतरांना टोचतील; प्रत्युत्तरे त्यांना नको आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. हे नेहमीच बरोबर असतात; इतर लोकच चुकत आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. भावनांना डिवचलेत? आता ते सूडाच्या तयारीत आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. शब्दबाण मारलेत? ते ग्रुप सोडायच्या तयारीत आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. यांना हवं तसं जगात घडत नाही.त्यामुळे अस्वस्थ आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. त्रास फक्त यांनीच भोगला जगात.बाकीचे सुखात आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. संयमाच्या नावे शिमगा आणि चिडचिडीचे टोक आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. लावून थोडीशी संध्याकाळी; बडबडायला बसलेच आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. कसं वागावं यांच्याशी? बघावं तेव्हा पेटलेले आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. 'माहिमचे हळवे' या आगामी काव्यसंग्रहातून.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2504 views

💬 प्रतिसाद
प
प्रसाद गोडबोले Sun, 09/27/2020 - 16:25 नवीन
असो , उडीदामाजी काळेगोरे ! जगात जशी हळवी माणसे असतात तशीच कुटील , आतल्यागाठीची , अन सतत तुमच्यविरोधात कुरापती करणारी माणसेही असतात. ह्यांना शांत सुखाने जगताच येत नाही , दुसर्‍यांना डिवचणे ही ह्यांच्यासाठी मुलभुत अ‍ॅक्टिव्हिटी असते . असे काही नमुने अत्यंत जवळीने पाहिले असल्याने ह्यांच्यापेक्षा हे 'हळवे' नमुने परवडले असे आमचे ठाम मत झाले आहे . बाकी शुभेछा !
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 10/02/2020 - 20:24 नवीन
थोडी उशिराच वाचली, पण परफेक्ट जमली आहे. :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/03/2020 - 05:20 नवीन
डॉ.खरे साहेबांवर आहे वाटतं कविता, फार हळव्या मनाचे आहेत ते... मनासारखं झालं नाही की ग्रुप सोडतो, मिपा सोडतो. खरड़फळा सोडतो...ग्रुप सोडतो. असे म्हणत राहतात. ''संयमाच्या नावे शिमगा आणि चिडचिडीचे टोक आहेत.यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत'' डॉ.साहेबांच्या बाबतीत हे मात्र परफेक्ट उतरले आहे, बाकी कविता त्यांच्याबद्दल, नसेल तर कवी आणि डॉक्टरसाहेब मला क्षमा करतीलच. (ह.घ्या) -दिलीप बिरुटे (खोडसाळ)
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 10/03/2020 - 19:53 नवीन
ही कविता कोणा एकाला उद्देशून नाही. असे बरेच हळवे लोक भेटले.त्यांच्या स्वभावसारांशावर ही कविता आहे. भाषा थोडी टोचणीची आहे. ती जरा हळव्यांनी आत्मपरीक्षण करावे म्हणून तशी वापरली आहे. ;) फक्त हळव्या/अतिहळव्यांनी भोवतालच्या लोकांचाही विचार करावा ; आत्मकेंद्रीपणामुळे त्यांनी व्यक्तित्व विकासाची संधी गमावू नये असे सांगण्याचा थोडा प्रयत्न केला आहे इतकेच! : )
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा