Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

परतीचे प्रवास

म — मका म्हणे, Fri, 09/25/2020 - 05:45
म्हातारी माणसे एकटीच बसून अश्रू ढाळतात. कधी सहजच पाणी येते त्यांच्या डोळ्यातून उगाच. अचानक विकल होतात ती मागचे काहीबाहि आठवून. सैरभैर होतात माना हलवत चेहेऱ्यावर अपराधी भाव घेऊन... काय बर होत असेल त्यांना ? कोण आठवतय आता या वयात ? कशाने असे बावरले जात असतील ? कसल्या वेदना पाझरताहेत मनातून? आता खूप दूर निघून गेलेल्या माणसांना काही सांगायचे असेल, का आता जवळ असलेल्यांना काहीच सांगता येत नसेल? भोगलेल्या वेदनाचे माप ओतायचय त्यांना कोणाकोणाच्या पदरात की दिलेल्या दुखांच्या डागण्या पुसायच्यात कापऱ्या हातांनि? खोटे मुखवटे ओरबाडायचेत उरल्या सुरल्या ताकतीने का पडलेले चेहेरे पुन्हा एकवार ठाकठीक करायचेत स्वतःचेच ? जेव्हा काही हातात होते तेव्हा केले नाही, याचे वाईट वाटतंय त्यांना की आता काहीही करता येत नाही याचे? वेळेवर आपण बोललो नाही याची बोच आहे की, का बोललो उगाच, याची? अपशब्द का ऐकून घेतले याची खंत सलतेय की बोबडे बोल ऐकायला वेळच नाही काढला याची ? पिकले फळ गळून पडते झाडावरुन हे माहीत आहे त्यांना. पण पक्व होईपर्यंत गळून पडायचीच वेळ येते हे मान्य होत नाहिये का? आयुष्यभर मांडत आणलेल्या ताळेबन्दाचा हिशोब चुकल्याचा हां भाव, काही हातचे घ्यायला विसरून गेल्याची ही चुकचुक, आणि खाली दिसणाऱ्या मोठया रकमेतिल छळणारी शून्यांची जाणीव... परतीच्या प्रवासातील हे नकोसे अटळ सोबती...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1474 views

💬 प्रतिसाद
र
रंगीला रतन Wed, 04/28/2021 - 11:54 नवीन
खुप तरल लिहीलय!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा