Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कृषी धोरण आणि अर्थशास्त्र

स
साहना
Tue, 09/22/2020 - 09:40
🗣 71 प्रतिसाद
भारत सरकार शेवटी APMC कायद्याची हडळ बाटलींत बंद करत आहे अशी बातमी वाचली आणि मनाला आनंद झाला. अजून तरी मी मूळ कायदा सुधार वाचला नाही तरी ज्या पद्धतीने दलाल मंडळी आपली छाती बडवत आहेत त्या प्रमाणे तरी हा बदल चांगलाच असेल असे वाटते. APMC कायदा शेतकऱ्यांचा गळा घोटणारा कायदा बनेल हे समजण्यासाठी ECON १०१ ज्ञान पुरेसे आहे. तुमचा धंदा कुठलाही असो, स्वखुशीने येणाऱ्या गिऱ्हाईकाला सर्व्हिस देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला असले तरच धंदा नफ्यांत चालू शकतो. तुम्ही समजा रेस्टोरंट चालवत असाल तर जेवायला येणाऱ्या कुठल्याही गिर्हाईकाला जेवू घालणे हा तुमचा धर्म तर आहेच पण वयवसायिक दृष्ट्या तुमच्या स्वतःचा फायदा आणि त्या गिर्हाईकाचा फायदा सुद्धा आहे. समजा उद्या सरकारने नवीन कायदा केला कि रेस्टोरंट मध्ये जेवणार्या प्रत्येक माणसाला आधी सरकारकडून लायसन्स घ्यावे लागेल आणि सरकार वर्षाला फक्त ५०० लायसन्स देईल. ह्या कायद्याने संपूर्ण रेस्टोरंट धंदा एक तर बंद तर पडेल किंवा बहुतेक छोटी रेस्टोरंट बेकायदेशीर पणे सरकारी नोकरांना पैसे चारून चालू राहतील (उदा दारू विषयक महाराष्ट्र सरकारचे मूर्खपणाचे कायदे). ह्यांत रेस्टोरंट आणि त्यांचे गिर्हाईक ह्या दोघांचेही नुकसान आहे. काही धंधे व्यवसाय असे आहेत जिथे असा सरकारी हस्तक्षेप काही लोकांना मानवेल सुद्धा, उदाहरणार्थ फार्मसी. इथे काही औषधें घेण्यासाठी डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असते. पण हे झाले अपवाद. शेती ह्या विषयांत भारत आज अत्यंत मागासलेला आहे. भारतीय शेतकरी जगांतील सर्वांत गरीब शेतकऱ्यांपैकी एक आहेच पण त्याच वेळी अतिशय अकार्यक्षम सुद्धा आहे. ह्याला कारण शेतकरी पेक्षा भारताचे शेतीविषयक धोरण हे आहे. एक बाजूने शेतकऱ्याला बळीराजा वगैरे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूने शेतकरी म्हणजे बिना अकलेचा गाढव आहे अश्या प्रकारे कायदे करायचे असं षडयंत्र भारत सरकारने अनेक वर्षें चालवले. सर्वच यंत्रणा सरकारी नियंत्रणाखाली असल्याने कुणीही आवाज सुद्धा काढत नव्हते पण आजकाल भारतीय सरकारच्या शेती विषयक धोरणांची लक्तरे सर्वत्र पाहायला मिळतात. APMC कायद्याचे लॉजिक शेतकरी मूर्ख असल्याने श्रीमंत पुंजीपती त्याला फसवून त्याचा माल हडप करतील आणि ह्या मूर्ख शेतकऱ्याला वाचवण्यासाठी त्याचा माल हडप करण्याचा अधिकार फक्त सरकारला आहे असा हा थोडक्यांत कायदा आहे. महाराष्ट्रांतील ऊस आणि कापूस शेतकऱ्यांना जास्त अनुभव असेल पण समजा आपली कांद्याची लागवड आहे आणि मी ट्रक घेऊन आले आणि तुम्ही तुमच्या स्वखुशीने मला एक ट्रक कांदा विकला तर तो कायद्याने गुन्हा ठरू शकतो. APMC कायद्याप्रमाणे शेकर्यांकडून माल विकत घेण्याचा अधिकार फक्त सरकारने लायसन्स दिलेल्या दलाल मंडळींनीच आहे. हि मंडळी बहुतेक वेळा नेते मंडळींचेच चमचे असतात. मागे वाचनात आले होते कि समोरून दक्षिण भारतांत कांद्याचे फक्त २० दलाल आहेत. ह्या वीस जणांनी जर साठेबाजी केली तर कांद्याचे भाव कडाडतात. APMC कायद्याचे दुष्परिणाम : कुठल्याही बाजारांत विकत घेणारे कमी असले कि भाव कमी होतो. तुम्ही IT वाले असाल आणि समाजा सरकारने tumhala TCS आणि Infosys सोडून इतर कुठेही काम करायला बंदी घातली तर ? आपसूकच तुमचा पगार कमी होईल. बाजार व्यवस्थेचा पाया स्पर्धा हा आहे आणि स्पर्धा बंद केली तर एका बाजूला नुकसान होते तर दुसऱ्या बाजूला प्रचंड फायदा. ह्यांत नुकसानीची बाजू शेतकऱ्यांची असून फायदा होतो दलाल मंडळींचा. पण त्यापेक्षा वाईट परिणाम आणि दूरगामी परिणाम म्हणजे शेतीत जाणारे भांडवल कमी होत जाते. आज बहुतेक शेतीविषयक कर्जे छोटे शेतकरी बँकेकडून घेतात, इथे सुद्धा बँकांना जबरदस्तीने कर्ज देण्यास सरकार भाग पाडते म्हणून. खाजगी कंपन्यांची शेतीमधील गुंतणवूक जवळ जवळ शून्य आहे. (ह्याला इतर कारणे सुद्धा आहेत). मोठ्या प्रमाणावर भांडवल टाकले नाही तर कार्यक्षमता कमी होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसाय पद्धती विकसित करता येत नाहीत आणि नफा सुद्धा कमी होत जातो. अर्थांत भारतीय शेतकऱ्यांची हीच परिस्थती आहे ह्यांत शंका नाही. मेरिको कपंनीने भूतकाळांत गोवा आणि कोंकण प्रदेशांत नारळ शेतीत गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला होता जो शेवटी त्यांनी APMC मुले सोडून दिला. गोदरेज कंपनीने काही कायदेशीर पळवाटा शोधून शेतीमाल विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे पण तिथे सुद्धा त्यांना जास्त भांडवल टाकायला भीती वाटते असे मी त्यांच्याकडून ऐकले आहे. APMC गेल्याने काय होईल ? सर्वप्रथम भारतीय शेतकरी ७० वर्षांच्या पारतंत्र्यातून सुटेल. मंडी पद्धतीची भारतीय शेतीमालावर असलेली पकड सुटेल आणि त्या जागी अनेक मंडी, अनेक दलाल लोकांचा भरणा होईल. माझ्या मते Jio फार्म्स सारखी एखादी मोठी कंपनी ह्या क्षेत्रांत घुसेल आणि आधुनिक व्यवसाय पद्धती आणेल. मी जर थेट शेतकऱ्यां कडून माल विकत घेऊ शकते तर माल उपलब्ध होण्याची तरी वाट का पाहायची ? पेरणी होण्याआधीच ऍडव्हान्स देऊन संपूर्ण माल विकत घेण्याचे "ऑप्शन्स" मी विकत घेऊ शकते आणि नंतर ते ऑप्शन्स इतर लोकांना विकू शकते. अर्थांत हे सर्व होण्यास काही वर्षे तरी जातील पण तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मेहनतीवर गब्बर झालेल्या दलाल मंडळींची कंबरडी मात्र पहिल्या दिवसापासून मोडतील. मोदी सरकार विषयी मला प्रेम नसले तरी ह्या निर्णयावर त्यांना १००% पाठिंबा द्यावा असे मला वाटते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 34456 views

🗣 चर्चा (71)
R
Rajesh188 Sat, 09/26/2020 - 09:42 नवीन
माननीय सरकार Corona काळात कोणालाही नोकरी वरून काढता येणार नाही. सर्रास किती तरी लोकांना नोकरी वरून काढले गेले. Corona काळात घरी बसून पगार दिला जाईल 1 महिना पण पगार कित्येक कंपन्या8 दिला नाही. Corona काळात कर्ज वसुली करता येणार नाही. जबरदस्ती कर्जाची वसुली चालू आहे. अशी खूप मोठी लिस्ट आहे सरकार जे बोलत आहे तसे बिलकुल वागत नाही.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 09/26/2020 - 11:13 नवीन
हमीभाव का ? (बाकी बंधन काढून टाकणाऱ्या अमेन्डमेन्ट मध्ये इतर काही अंमलबजावणी असणार आहे का? सरकार कडून नक्की कोणती क्रिया या कायद्याअंतर्गत होणार आहे ? कारण बंधन काढणे म्हणजे चालू क्रिया थांबवणे. त्यात काय गफलत होणार ? त्यामुळे अंमलबजावणी बद्दल शंका सुद्धा मला नीट समजत नाहीये.)
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 09/30/2020 - 20:21 नवीन
कायदे तर्कसंगत असतील आणि सरकारकडे अंबलबजावणी करण्याची क्षमता असेल तरच असल्या कायद्याना अर्थ आहे. ह्या कोरोना कायद्याना काहीही अर्थ नाही. > Corona काळात कोणालाही नोकरी वरून काढता येणार नाही. धंदा चालत नसेल तर लोकांना नोकरीवर ठेवून फायदा काय ? धंधा सुरु करून व्यापाराने जास्त रिस्क घेतली आहे, त्याने बिचार्याने भुर्दंड का भरावा ? पगारासाठी पैसे कुठून. येतील ? सरकार कायदे करून लोकांचा स्वभाव आणि व्यापार बदली शकत नाही. सर्व व्यापार हा शेवटी फायद्यासाठी चालतो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/01/2020 - 08:32 नवीन
Corona काळात कोणालाही नोकरी वरून काढता येणार नाही. या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे कामच नसेल तरी पगार देणे बंधनकारक नाही किंवा नोकरीवरून काढून टाकणे हे बेकायदेशीर नाही. आणि याबद्दल सरकार आस्थापन मालकांवर सक्ती करू शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 10/01/2020 - 10:24 नवीन
पंतपधानाला इतके समजत नाही का ? कशाला फुकट घोषणा करायच्या ?
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 10/01/2020 - 10:25 नवीन
पंतपधानाला इतके समजत नाही का ? कशाला फुकट घोषणा करायच्या ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 10/01/2020 - 18:21 नवीन
केंद्र सरकार हे अनंत अधिकार असलेले भारताचे सरकार आहे. सर्वोच्च न्यायालय च्या पाठीमागे कापायची गरज नाही. नको तिकडे अध्यादेश काढता ना इथे पण काढू शकता . का नाही काढला. कंपन्यांना वर जादा कर लावून तो पैसा जमा होईल त्या मधून कामगारांना आर्थिक मदत करू शकता. खूप मार्ग आणि अधिकार केंद्र सरकार कडे आहेत. बाबरी केस मध्ये न्यायालय नी सर्वांना निर्दोष सोडले तेव्हा पासून न्यायालय हे न्याय देण्यास सक्षम आहेत मी नाहीत तेच कळत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/02/2020 - 07:53 नवीन
बाबरी केस मध्ये न्यायालय नी सर्वांना निर्दोष सोडले तेव्हा पासून न्यायालय हे न्याय देण्यास सक्षम आहेत मी नाहीत तेच कळत नाही. निकाल नीट न वाचता दिलेला प्रतिसाद आहे. न्यायालय सांगो वांगीच्या गोष्टींवर निकाल देत नाही तर समोर आलेल्या पुराव्यावरच निर्णय देत असते. आणलेला पुरावा पुरेसा सबळ नसेल किंवा तपस ढिसाळ पाने केला असेल तर न्यायालय काय करेल? २४०० पानांचा निकाल कुणीही वाचलेला नाही. न्यायाधीशांनी एवढंच म्हटलेलं आहे कि या ३२ जणांनी मशीद पाडण्यासाठी पूर्वनियोजित कट केला असा कोणताही सबळ पुरावा सी बी आय ला देता आलेला नाही. एखाद्या खुनाच्या आरोपातून आरोपी सबळ पुराव्याच्या अभावी मुक्त झाला तर खून झालाच नाही असे कोणीही म्हणत नाही. तरी बरं हा सर्व तपास सी बी आय ने काँग्रेस सत्तेत असण्याच्या काळात केला होता.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/01/2020 - 15:58 नवीन
या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. याचा अर्थ आपल्याला समजतो का?
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 10/01/2020 - 16:22 नवीन
एम ए इन एनटायर इकॉनॉमिक्स करून समजत नाही , आमच्या सारख्या पामरास कसे समजणार ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/01/2020 - 16:36 नवीन
आमच्या सारख्या पामरास कसे समजणार ? मग फुकट जिथे तिथे पचपच कशासाठी?
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 10/01/2020 - 16:41 नवीन
रामराज्य आहे म्हणून रामराज्यात धोब्याला बडबडायचा अधिकार असतो हा भीक मागून खात होता , ह्याची बायको स्वतः नोकरी करून पोट भरते आणि हा देशातल्या बेरोजगारांना सांगणार , काळजी करू नका, तुमची कम्पनी फुकट तुम्हाला पगार देईल एकदा डोक्याची सोनोग्राफी करून बघा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/02/2020 - 07:31 नवीन
हा भीक मागून खात होता , ह्याची बायको स्वतः नोकरी करून पोट भरते आणि हा देशातल्या बेरोजगारांना सांगणार , काळजी करू नका, तुमची कम्पनी फुकट तुम्हाला पगार देईल हे आपण कुणाबद्दल म्हणता आहात ? एकदा डोक्याची सोनोग्राफी करून बघा प्रौढ माणसाच्या डोक्याची सोनोग्राफी होत नाही एवढी मूलभूत गोष्ट डॉक्टर असून तुम्हाला माहिती नाही? का आपली विचारशक्ती कुठल्या पक्षाच्या दावणीला बान्धली आहे?
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/02/2020 - 08:59 नवीन
प्रौढ माणसाच्या डोक्याची सोनोग्राफी होत नाही एवढी मूलभूत गोष्ट डॉक्टर असून तुम्हाला माहिती नाही? माहीत आहे , त्याचप्रमाणे काम न केलेल्याला पगार दे असेही कुणी कुणाला सांगू शकत नाही ही देखील मूलभूत गोष्टच आहे. ते वरचे वर्णन खुद्द मोदींजींचे आहे , आणि ते सर्वश्रुत आहे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/02/2020 - 09:23 नवीन
या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. याचा अर्थ आपल्याला समजतो का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/02/2020 - 09:24 नवीन
force majeure चा अर्थ सुद्धा समजावून घ्या
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/02/2020 - 09:34 नवीन
काम न केलेल्याना कम्पनिकडून पगार मिळणार आहे का, हो की नाही , स्पष्टपणे सांगा
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/02/2020 - 10:00 नवीन
आणि जी एस टी राज्याची वाटणी न देण्याचे काय ? ती तर केंद्राने आधीच गोळा करून झाली आहे ना ? की त्यालाही ऍक्ट ऑफ गॉड , force majeure वगैरे लावणार ? असल्या माणसापेक्षा आधीचे 12 पँटप्धान हजारो पटीने चांगले होते
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/02/2020 - 16:34 नवीन
हो की नाही , स्पष्टपणे सांगा मी का सांगायचं? हवं तर स्वतः सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम निकाल वाचून पहा
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 10/02/2020 - 08:18 नवीन
बाबरी केस मध्ये न्यायालय नी सर्वांना निर्दोष सोडले तेव्हा पासून न्यायालय हे न्याय देण्यास सक्षम आहेत मी नाहीत तेच कळत नाही. वाह रे बहाद्दर - निकाल नाही पटला तर लगेच सर्वोच्च न्यायालयावर शंका.. - निवडणूक हरले तर लगेच निवडणूक अयोग्य आणि यंत्रांवर शंका ... जिकली तर आलबेल बाबरी बद्दल बोलायचे तर अशी गोष्ट जमावाकडून व्हायला नको होती पण ती झाली याच्या मागे काय कारण = १) काँग्रेस चे बोटचेपे धोरण २) भिजत घोंगडे ठेवणे , ३) अल्पंक्यांना सतत खुश करत ठेवणे हि धोरणे आहेत हे कधी समजून घेणार
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 10/02/2020 - 12:12 नवीन
गांधीयुगाकडे ? ! मोदीयोगी Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा