Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ऑक्सीमीटर कोणता घ्यावा

म
महासंग्राम
Mon, 09/21/2020 - 08:20
🗣 14 प्रतिसाद
सध्या कोरोनाच्या काळात ऑक्सिजन पातळी खालावल्यामुळे बऱ्याच रुग्णांना आयसीयू मध्ये दाखल केल्याच्या घटना घडल्या आहेत. बरेच जण रोज ऑक्सिजन पातळी तपासून पाहण्याचा सल्ला देतात, हि पातळी ऑक्सिमीटर च्या साह्याने तपासता येते, सुरवातीच्या काळात या ऑक्सिमीटर ची किंमत डिड-दोन हजाराच्या आसपास होती, सध्या अमेझॉन तत्सम संकेतस्थळांवर पाहिलं तर बरेच ऑक्सिमीटर उपलब्ध आहेत, आणि त्यांची किंमत हि अगदी पाचशे रुपयांपासून सुरु होते. आता सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाची मानसिकता अशी असते कि जे जे महाग ते उत्तम. आता मला सुद्धा हाच प्रश्न पडला आहे कि इतक्या स्वतःत विकत असलेले ऑक्सिमीटर खरच काही कामाचे असतील का ? त्यातून येणारे रिझल्ट कितपत अचूक असतील ? कोणी असे ऑक्सिमीटर वापरत असतील तर त्यांनी त्यांचे ऑक्सिमीटर बाबत अनुभव सांगितले आणि ऑक्सिमीटर बद्दल तांत्रिक माहिती दिली तर उत्तमच होईल

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7353 views

🗣 चर्चा (14)
प
प्रचेतस Mon, 09/21/2020 - 15:18 नवीन
मी ईगल कंपनीचा वापरतोय (भारतीय बनावटीचा) साधारण १६००/१७०० ला पडला, स्वस्तातलेही उपलब्ध आहेत पण क्वालिटी खास नाही. टीप: कोविड पॉझिटीव्ह असलात तरच विकत आणणे उत्तम अन्यथा ऑक्सिजन रिडींग कमी आल्यास अनावश्यक पॅनिक निर्माण होते. मी सध्या पॉझिटिव्ह असून जवळपास कोविडमधून बाहेर पडतोय.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 09/21/2020 - 16:02 नवीन
प्रचेतस.. लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.. !!!
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Mon, 09/21/2020 - 16:18 नवीन
दादा लौकर बरे व्हा !
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Mon, 09/21/2020 - 16:22 नवीन
काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा! - (हितचिंतक) सोकाजी
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 09/21/2020 - 18:24 नवीन
लवकर.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 09/21/2020 - 16:04 नवीन
लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.. !!! अशक्तपणा खूप येऊ शकतो. निदान २८ दिवस काळजी घ्या.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 09/21/2020 - 16:16 नवीन
मी 'Trueview' या भारतीय कंपनीचा ऑक्सिमीटर वापरतो आणि विकतो देखील. आतापर्यंतचा अनुभव चांगला आहे. २ वर्षांची वॉरंटी आहे. त्याच कंपनीचे दोन वेगवेगळे ऑक्सिमीटर वापरुन रिडिंग घेतली असता तफावत आढळली नाही. किंमत रु. १०००.०० फक्त. टपालखर्च वेगळा पडतो. (युनिट खराब झाल्यास बदली युनिट/ रिपेअर करण्यास वेळ लागतो कारण कोवीडमुळे त्यांच्याकडे देखील मनुष्यबळाची कमतरता आहे.) यात ऑक्सीजन लेवल आणि ह्रदयाच्या ठोक्यांचे रिडींग मिळते. माझे असे मत आहे की ऑक्सीजन लेव्हल फक्त कोवीड मुळे कमी होत नाही तर आपल्या कार्यशैलीवर देखील अवलंबून आहे. आपण जर शारीरीक हालचाल जास्त करत नसू किंवा अंगमेहनतीची कामे करत नसू तर आपल्या शरीराला ऑक्सीजन ची जास्त गरज पडत नाही त्यामुळे देखील शरीरातील ऑक्सीजनची मात्रा कमी होऊ शकत असेल. अर्थात हा फक्त कयास आहे. डॉक्टर मंडळी यावर योग्य ते सांगू शकतील.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत १९८७ Mon, 09/21/2020 - 16:59 नवीन
DR VAKU® DS301 Swadesi Finger Tip Pulse Oximeter, Multipurpose Digital Monitoring Pulse Meter Rate & SpO2 with OLED Digital Display [With 2x AAA Battery] फायदे १ कमी किंमत २ योग्य रेड़ीन्ग ३ भारतीय कंपनी
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 09/21/2020 - 19:03 नवीन
सकाळी सर्व जण एकत्र खायला बसलो की तपमान व ऑक्सीजन लेव्हल पहातो. दोन्हीत काही गफलती आहेत असे वाटते . पण फार आचरट रिडिन्ग येत नाही. हे पूर्ण बोगस प्रोडक्ट आहे का हे तपासण्यासाठी मी माझी बी पी ची बिटा ब्लॉकर गोळी घेण्याअगोदरची पल्स व नंतरची पल्स पहातो तर ती नक्की कमी झालेली आढलते. आता त्या यंत्राला काय माहीत के मी गोळी घेतली आहे म्हणून . थर्मो गन साधारण पणे तेच टेम्परेचर दाखवते जे मर्क्युरी थर्मॉमीटर वर दाखवले जाते. अतः एखादे प्रॉडक्ट फार बोगस असेल असे मला वाटत नाही. जसे टी व्ही चे चित्र कसे दिसते हे त्याच्या स्पेक्स पेक्शा महत्वाचे असते. तसे हे आहे !
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 09/21/2020 - 23:43 नवीन
हि O२ ची पातळी ९० / ९५ पाहिजे म्हणे. म्हणजे काय? काय युनिट आहे ह्याचे ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 09/22/2020 - 07:24 नवीन
पल्स ऑक्सिमीटरवर जे रीडिंग असते त्याला SpO2 असे म्हणतात. त्याचा अर्थ : S = saturation P = peripheral ( हे बोटावर मोजले जाते म्हणून peripheral). O2 = oxygen निरोगी व्यक्तीत याचे प्रमाण ९५ – ९९ % या दरम्यान असते. ....... प्रचेतस, शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 09/22/2020 - 05:09 नवीन
सर्वांचे आभार. आता अशक्तपणा वगैरे काहीच जाणवत नाहीये, लवकरच बाहेर पडेन यातून.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/22/2020 - 06:58 नवीन
लवकरच ठणठणीत व्हाल....! शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शरद Tue, 09/22/2020 - 08:01 नवीन
एखाद्या भटकंतीचा विचार मनात आणा. झटकन बरे व्हाल. शरद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा