जेंव्हा कंपनीचा सिटीओ आउटडेटेड असतो , तेंव्हा काय करायचे ?
सद्दया कंपनीत महत्वाचे प्रॉडक्ट लॉंच झाले . त्यातील थोड्या इनहानसमेंट करायच्या होत्या . त्यासाठी कंपनीचे दिग्गज मदत करू शकले नाहीत आणि कसेतरी ते माझ्याकडे आले . मी वाचून , स्टडी करून अगदी नवीन गोष्टी वापरुन त्यावर सोल्यूशन काढले . त्याची पीओसी केली . प्रॉड वेगळा असल्याने miटीम लिडला समजावून सांगितले, त्यांच्या डिरेक्टर डेमो दाखवला . तो खुश झाला . पण त्यांच्या लिडला ते implement करायला जमेना . मग मी त्याच्या मशीनवर implement करून दिले . त्याला तुमच्या टेस्टिंग सर्व्हर वर रिपलिकेट कर म्हणाले तर ते ही जमेना . शेवटी त्यांच्या दुसऱ्या डेवलपर करून दिले . तिलाही सर्वर वर जमेना . शेवटी मी रात्रभर जागून त्यांना त्यांच्या सर्वर करून दिले . रात्रभर का तर , सर्वर ला अॅक्सेस फक्त इन्फ्रा ला , त्यातही तो इन्फ्रा वाला अगदीच .. तरीही दिले करून . आता दुसऱ्या सर्वर वरून अॅक्सेस करायचे तर एजिपी पोर्ट ओपेन होत नव्हती , जेकेमाऊंट चालेना . तो का होत नाही हे पण सर्व शोधून सर्व सक्सेस झाले, हयात पंधरा दिवस घालवून त्या डिरेक्टरला साक्षात्कार झाला की असे केल्याने काही प्रॉब्लेम येवू शकतो , कारण त्याला काहीच माहीत नाही , कारण पण देईना आणि live पण करू देईना . 15 दिवस माझ्या झोपेचे खोबरे करून हा माणूस माझ्या हातापाया पडत होता . सोल्यूशन सक्सेस झाल्यावर त्याला हे नंतर काही प्रॉब्लेम देवू शकते ह्याचा साक्षात्कार का झाला तेच मला कळेना .
मग त्याने साऊथ इंडियन लॉबी चा यार दोस्त सिटीओ ला पिन मारली आणि हे असले काय शिट वापरले वैगेरे बरळून गेला , त्याला लेटेस्ट टेक्नॉलजी ट्रेंड माहीत नव्हते . मी जीव तोडून प्रेझेंटेशन बनवले , डॉक्युमेंट बनवले , प्रेझेंट केले .. तरीही असले काय नसते, मला सर्व कळते असे म्हणत राहीला . कंपनीचा एम्प्लॉयी काऊंट 20 के प्लस आहे तरीही त्या सिटीओला जर यार दोस्तीसाठी ऐकून घेत नसेल तर काय करायचे ? बर एवढ्याने काही तोडगा निघाला का तर नाही , सरल अत्यंत घाणेरड्या लेवल ची तडजोड करून ते पुढे चाललेत .
कंपन्या असले सिटीओ का ठेवतात ? माझ्याकडे अधिकार आहे म्हणजे मी म्हणेल तेच खरे ?
- वर्षातले सहा-आठ महिनेच काम करतो.
- त्याच कंपनीला आणि इतरही कंपन्यांना पाच-सात पट दराने सेवा पुरवतो.
- सिइओ व्यक्तिगत आणि व्यावसायिक घट्ट संपर्कात आहे.
- सिइओचा साला जेवढ्यास-तेवढ्या व्यावसायिक संपर्कात आहे.
क्लिशे वाटणारं, पण सत्य असलेलं मॉरल: नोकर आणि कंपनी हे सेवादाते आणि ग्राहक अश्या संबंधात असतात. सेवादात्याने ग्राहकाशी सेवेच्या मोबदल्यापुरता संबंध ठेवावा. बाकी, आयुष्य खूप मोठं आहे! - पूर्वी एकच ग्राहक असलेला आणि आता अनेक ग्राहक असलेला सेवादाता