Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मिपावर १२ वर्षे पूर्ण झाली...

श
शशिकांत ओक
Sun, 09/13/2020 - 10:08
💬 6 प्रतिसाद
सहज मिपावर नजर टाकताना लक्षात आले की मिपासदस्य होऊन मला १२ वर्षे झाली...! त्या काळात माझ्याकडून ३०० धागे सादर केले गेले. हा ३०१वा असेल... 1 या धाग्यावर प्रियालींनी आल्या आल्या माझा बोल्ड उडवला. म्हणाल्या, मिपाचा दिवाळी अंक २००८चा येण्याच्या आधीच हा लेख प्रकाशित केला आहे? आता पाहता ९८०० टिचक्या त्याला पडल्या. नाडी ग्रंथ विषयाने धमाकेदार एन्ट्री घेतली. त्यानंतर विविध विषयावर माझे लेखन सादर करायला हा मंच फारच उपकारक झाला. मिपाकरांच्या मेळाव्यात नवे मित्र झाले. मुंबईला जाऊन बोटीतील प्रवासकरून घारापुरीच्या लेण्याची माहितीपुर्ण सफर झाली. हवाईदलातील किस्से, अंधारछाया ही कादंबरी, गड आणि किल्ले या वरील घडलेल्या लढायांना मिपाकरांनी वाचले. मते मतांतरे सादर केली. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्र पोथीवर केलेले लेखन कार्य अजून मिपावर सादर केले नाही. यथावकाश करता येईल. या काळात २५ पेक्षा जास्त ब्लॉग्जवरून काही लेखनपण सादर केले गेले. त्यातील मंगला ओक यांच्या महाभारतावरील प्रवचनांच्या ब्लॉगवर मिसळपावच्या लोगोला तिथे संपर्कासाठी चिकटवला आहे. 1 मिपाकरांचा स्नेह असाच राहो. आणि लेखनाला सुयोग्य प्रतिसाद मिळत राहोत.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3173 views

💬 प्रतिसाद (6)
द
दुर्गविहारी Sun, 09/13/2020 - 12:22 नवीन
तीनशे धागा क्लबमध्ये प्रवेश केल्याबददल हार्दिक अभिनंदन ! :-)
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 09/14/2020 - 18:52 नवीन
तोळामासा असतो. तरीही ५शे टिचक्या पडल्या हेही नसे थोडके! धन्यवाद दुर्गविहारी जी... मिपाचा लोगो ब्लॉगर वर जोडलाय यावर काही प्रतिक्रिया अपेक्षित होती...
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 09/13/2020 - 13:11 नवीन
अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा! सं - दी - प
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 09/13/2020 - 13:27 नवीन
तपपुर्ती आणि त्रिशतकी धागेपुर्ती साठी हार्दिक अभिनंदन !
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 09/13/2020 - 13:44 नवीन
तपपुर्ती आणि त्रिशतकी धागेपुर्ती साठी हार्दिक अभिनंदन !
मुंबईला जाऊन बोटीतील प्रवासकरून घारापुरीच्या लेण्याची माहितीपुर्ण सफर झाली.
तुम्ही त्या कट्ट्याला याल असे कुणालाच वाटले नव्हते. एक एक करत सारे जमा झाल्यावर तुम्ही अचानक प्रकट झालात आणि सारे आश्चर्यचकित झाले होते.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 09/13/2020 - 20:58 नवीन
तुम्ही त्या कट्ट्याला याल असे कुणालाच वाटले नव्हते. एक एक करत सारे जमा झाल्यावर तुम्ही अचानक प्रकट झालात आणि सारे आश्चर्यचकित झाले होते.
आधी डांगोरा पिटायचा आणि नंतर काही न काही कारणाने जमले नाही तर मग इतरांनी विरस झाला म्हणण्याऐवजी, असे चकित करणे हे माझ्या स्वभावास जवळचे होते. व्हिटी च्या फलाटावर एकत्र आल्यावर फराळाचे पदार्थ अनुभवायला मिळाले आणि वयातील फरक कमी झाले... त्यात आपण देखील होता हे मला आत्ता माहिती झाले. असो. पुण्यातील लेणी पहायला प्रचेतसनी पुढाकार घेतला. डॉ म्हात्रे यांच्या ओळखीने चौफेर व्यक्तीला भेटल्याचा आनंद झाला होता.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा